एक्स्प्लोर

मी असल्यावर सर्वांची कॉलर सरळ : शरद पवार

आपल्यासमोर सर्वांच्या कॉलर खाली असतात, असं म्हणत खासदार उदयन राजे यांच्या स्टाईलवर शरद पवारांनी मार्मिक शेरेबाजी केली.

सातारा : साताऱ्यात राष्ट्रवादी अंतर्गत सुरु असलेल्या गटबाजीवर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मिश्किल शब्दात फटकेबाजी केली. आपल्यासमोर सर्वांच्या कॉलर खाली असतात, असं म्हणत खासदार उदयन राजे यांच्या स्टाईलवर पवारांनी मार्मिक शेरेबाजी केली. सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीतच उदयनराजे समर्थक आणि उदयनराजे विरोधक असे दोन गट आहेत. या मुद्द्यावरुन पत्रकारांनी शरद पवारांना जिल्ह्यात पक्षांतर्गत निर्माण झालेल्या पेचाबाबत प्रश्न केला.
दरवाजा न उघडल्याने शरद पवार आतच अडकले!
आपण आल्यावर सर्व पेच सुटतात असं म्हणत पवारांनी उदयनराजेंच्या कॉलरच्या स्टाईलवरुन हसत हसत टोला मारला. 'काही पेचबीच होत नाहीत. मी असल्यावर सगळं ठीक होतं. उतारा काढायची वेळच येत नाही. तुम्ही बघा त्यावेळेस सगळे सरळ असतात. अशी असते ती कॉलर अशी होते' असं सांगत उदयनराजेंप्रमाणे उभी असणारी कॉलर पवारांनी खाली करुन दाखवली. खरं तर उदयनराजेंवरुन निर्माण होणाऱ्या सर्व प्रश्नांना पवार शांतपणे उत्तरं देतात. मात्र आज पहिल्यांदाच त्यांनी उदयनराजेंच्या स्टाईलवरुन मिश्किलपणे भाष्य करत पत्रकारांमध्ये हशा पिकवला. शरद पवार कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी सकाळी 11 च्या सुमारास पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेनंतर शरद पवार सभागृहाच्या बाहेर पडण्यासाठी निघाले. मात्र दरवाजा पूर्णत: लॉक झाल्यामुळे पवारांना जवळपास 10 मिनिटं ताटकळत उभं राहावं लागलं. अनेक जण दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होते. मात्र काही केल्या दरवाजा उघडतच नव्हता. सुमारे दहा मिनिटाच्या प्रयत्नानंतर हा दरवाजा उघडला आणि शरद पवार बाहेर आले.
परंतु दहा मिनिटांच्या काळात पवारांच्या चेहऱ्यावर त्रासिक भाव नव्हते. ते सगळ्यांना शांत राहण्यास सांगत होते. तसंच त्यांनी मिश्किलपणे ही घटना हाताळली.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Suraj Chavan: ...तर उद्या कुणीही उठून मराठा कार्यकर्त्यांना मारतील, हिसाब बराबर होगा; शिंदे गटाच्या प्रवक्त्याचा सुरज चव्हाणांना थेट इशारा
...तर उद्या कुणीही उठून मराठा कार्यकर्त्यांना मारतील, हिसाब बराबर होगा; शिंदे गटाच्या प्रवक्त्याचा सुरज चव्हाणांना थेट इशारा
Ajit Pawar : कोपरापासून ढोपरापर्यंत, लाथा बुक्क्यांनी मारलं, अखेर सूरज चव्हाणांच्या मारहाणीवर अजित पवार बोलले, म्हणाले...
मोठी बातमी : कोपरापासून ढोपरापर्यंत, लाथा बुक्क्यांनी मारलं, अखेर सूरज चव्हाणांच्या मारहाणीवर अजित पवार बोलले, म्हणाले...
तू अजूनही कुंवारी, मी पण सुंदर, माझ्याशी लग्न कर, घरात नमाज पडायला परवानगी देतो, औवेसी मला दाजी म्हणेल; महिला खासदारावर गरळ ओकणाऱ्या करणी सेनेच्या नेत्याविरोधात कारवाई
तू अजूनही कुंवारी, मी पण सुंदर, माझ्याशी लग्न कर, घरात नमाज पडायला परवानगी देतो, औवेसी मला दाजी म्हणेल; महिला खासदारावर गरळ ओकणाऱ्या करणी सेनेच्या नेत्याविरोधात कारवाई
Donald Trump on Barack Obama: ट्रम्पनी ओबामांच्या अटकेचा AI व्हिडिओ शेअर केला; एफबीआयने कॉलर पकडत खूर्चीवरून खाली खेचत बेड्या ठोकल्या, बाजूला ट्रम्प खिदळू लागले
Video: ट्रम्पनी ओबामांच्या अटकेचा AI व्हिडिओ शेअर केला; एफबीआयने कॉलर पकडत खूर्चीवरून खाली खेचत बेड्या ठोकल्या, बाजूला ट्रम्प खिदळू लागले
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mumbai Train Blast : मुंबई रेल्वे ब्लास्ट प्रकरणी मोठा झटका; सगळ्या दोषींची निर्दोष सुटका
Suraj Chavan Rada | मारहाण प्रकरणी Suraj Chavan यांची दिलगिरी, गैरसमज दूर करणार
Latur Bandh | छावा संघटनेच्या Vijaykumar Ghadge यांना मारहाण, आज Latur बंद!
Mumbai Rains | पुणे, Mumbai मध्ये जोरदार पाऊस, सखल भागात पाणी साचले, चाकरमान्यांना त्रास
Mumbai Heavy Rain | मुंबईत मुसळधार पाऊस, उपनगरांमध्ये पाणी साचले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Suraj Chavan: ...तर उद्या कुणीही उठून मराठा कार्यकर्त्यांना मारतील, हिसाब बराबर होगा; शिंदे गटाच्या प्रवक्त्याचा सुरज चव्हाणांना थेट इशारा
...तर उद्या कुणीही उठून मराठा कार्यकर्त्यांना मारतील, हिसाब बराबर होगा; शिंदे गटाच्या प्रवक्त्याचा सुरज चव्हाणांना थेट इशारा
Ajit Pawar : कोपरापासून ढोपरापर्यंत, लाथा बुक्क्यांनी मारलं, अखेर सूरज चव्हाणांच्या मारहाणीवर अजित पवार बोलले, म्हणाले...
मोठी बातमी : कोपरापासून ढोपरापर्यंत, लाथा बुक्क्यांनी मारलं, अखेर सूरज चव्हाणांच्या मारहाणीवर अजित पवार बोलले, म्हणाले...
तू अजूनही कुंवारी, मी पण सुंदर, माझ्याशी लग्न कर, घरात नमाज पडायला परवानगी देतो, औवेसी मला दाजी म्हणेल; महिला खासदारावर गरळ ओकणाऱ्या करणी सेनेच्या नेत्याविरोधात कारवाई
तू अजूनही कुंवारी, मी पण सुंदर, माझ्याशी लग्न कर, घरात नमाज पडायला परवानगी देतो, औवेसी मला दाजी म्हणेल; महिला खासदारावर गरळ ओकणाऱ्या करणी सेनेच्या नेत्याविरोधात कारवाई
Donald Trump on Barack Obama: ट्रम्पनी ओबामांच्या अटकेचा AI व्हिडिओ शेअर केला; एफबीआयने कॉलर पकडत खूर्चीवरून खाली खेचत बेड्या ठोकल्या, बाजूला ट्रम्प खिदळू लागले
Video: ट्रम्पनी ओबामांच्या अटकेचा AI व्हिडिओ शेअर केला; एफबीआयने कॉलर पकडत खूर्चीवरून खाली खेचत बेड्या ठोकल्या, बाजूला ट्रम्प खिदळू लागले
CRPF Jawan Kills ASI Girlfriend: सीआरपीएफ जवानानं ASI गर्लफ्रेंडचा गळा घोटला अन् ज्या पोलिस ठाण्यात कर्तव्यावर होती तिथंच जाऊन सरेंडर झाला!
सीआरपीएफ जवानानं ASI गर्लफ्रेंडचा गळा घोटला अन् ज्या पोलिस ठाण्यात कर्तव्यावर होती तिथंच जाऊन सरेंडर झाला!
Suraj Chavan Resignation: सूरज चव्हाणांना छावाच्या कार्यकर्त्यांच्या अंगावर हात टाकणं भोवलं, अजित पवारांनी राजीनामा द्यायला सांगितला
मारकुट्या सूरज चव्हाणला दादांचा दणका , अजित पवारांकडून राजीनामा देण्याचा आदेश
Mumbai 2006 Blast Case: 11 मिनिटांत 7 कुकर बॉम्बचा स्फोट, प्रेतांची रास रचली गेली, 'त्या' संध्याकाळी मुंबईत काय घडलं होतं?
11 मिनिटांत 7 कुकर बॉम्बचा स्फोट, प्रेतांची रास रचली गेली, 'त्या' संध्याकाळी मुंबईत काय घडलं होतं?
SIP : 2025 मध्ये 1 कोटीहून अधिक SIP बंद, जून मधील आकडेवारी समोर, बाजार उच्चांकावर असताना खातं बंद करणं फायद्याचं की तोट्याचं?
2025 मध्ये 1 कोटीहून अधिक SIP बंद, बाजार उच्चांकावर असताना खातं बंद करणं फायद्याचं की तोट्याचं?
Embed widget