एक्स्प्लोर
पाळण्याच्या दोरीचा फास लागल्याने बालिकेचा मृत्यू, अमरावतीतील दुर्दैवी घटना
घरी पाळण्यावर खेळत असताना दोराने तिला फास लागल्याने बालिकेचा मृत्यू झाला आहे. घटनेनंतर तिला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अमरावती : पाळण्यावर खेळताना दोरीने फास लागल्याने एका 12 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. अमरावतीच्या मोर्शी शहरातील गुरुदेवनगर येथे ही घटना घडली. या घटनेने शहरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
निकीता ताथोडकर असं मृत मुलीचं नाव आहे. शिवाजी उच्च माध्यमिक शाळेची सहावीची विद्यार्थिनी असलेल्या निकीताची परीक्षा सुरू आहे. परंतु, आज पेपर नसल्याने ती घरीच होती. दुपारी घरी पाळण्यावर खेळत असताना दोराने तिला फास लागला. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर तिला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
परंतु, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. घटनेची माहिती मिळताच शिवाजी उच्च माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. या घटनेने शहरात शोककळा पसरली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
भारत
भारत
क्राईम
Advertisement