संतोष देशमुखांची दीड कोटीसाठी हत्या, वाल्याकाका दीड नाहीतर 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचा हल्लाबोल
Suresh Dhas : संतोष देशमुख हत्याप्रकरणात आज 7 जणांना मोक्का लागला आहे. राहिलेला आठवा सुद्धा मोक्यात गेला पाहिजे. त्याच्यावर सुद्धा 302 झाला पाहिजे असे वक्तव्य भाजप आमदार सुरेश धस यांनी केलं आहे.
Suresh Dhas : संतोष देशमुख हत्याप्रकरणात आज 7 जणांना मोक्का लागला आहे. राहिलेला आठवा सुद्धा मोक्यात गेला पाहिजे. त्याच्यावर सुद्धा 302 झाला पाहिजे. यामध्ये सुद्धा आका आहे. तोच मेन असल्याचा हल्लाबोल भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. वरच्या आकाने 19 ऑक्टोबरला स्वत: सातपुडा बंगल्यावर बैठक घेतली. तो यामध्ये आरोपी का नाही? असा सवाल धसांनी केला. दीड़ कोटीसाठी संतोष देशमुखांची हत्या केली आहे. वाल्याकाका दीड नाहीतर संतोषसाठी आम्ही 3 कोटी गोळा करुन दिले असते असेही धस म्हणाले.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ धाराशिवमध्ये आज जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय द्यावा, या मागणीसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. यावेळी सुरेश धस बोलत होते. राजुरीत जामखेड नावाचं गाव आहे. तिथं एक अपघात झाला. यावेळी गाडीच्या चाकखाली कुत्रा मेला आम्ही गाडीत बसणाऱ्या सर्वांना वाईट वाटलं. पण संतोषला कुठल्या पद्धतीने मारलं. मारताना तो पाणी मागत होता पण त्याला पाणी दिलं नाही असे सुरेश धस म्हणाले. धाय मोकलून रडणाऱ्या माणसाच्या व्हिडिओ काढला आणि आकाला दाखवल्याचे धस म्हणाले. तुम्ही 100 लोकात मारुन त्याला घरी पाठवल्याचे सुरेश धस म्हणाले. तुमच्याकडे पैसा आणि माज आलाय असेही धस म्हणाले.
आका आणि आकाच्या आकाला दोघांनांही बिन भाड्याच्या खोलीत पाठवा
संतोष देशमुख आणि सोमनाथ सुर्यवंशी यांचा चेहरा बघितल्यावर तुम्हाला वाटतं का हा गुंड होऊ शकतो? असा सवाल सुरेश धस म्हणाले. चेहऱ्यावरुन माणसं ओळखता येतात. का त्याला एवढं मारलं? केवळ तुमच्या खंडणीच्या आड आला म्हणून तुम्ही असं मारता का? असा सवालही सुरेश धसांनी यावेळी केला. ज्यांनी खंडणी आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा घेऊ नका म्हटलं त्याला प्रमुख आरोपी करा. हा प्रमुख आरोपी म्हणजे आका. आका आणि आकाच्या आकाला दोघांनांही बिन भाड्याच्या खोलीत पाठवा असे सुरेश धस म्हणाले. हा विषय राजकारणाचा नाही. वडार, कैकडी समाजाच्या एखाद्या पोराचं जरी असं झालं असतं तरी एवढ्याच ताकदीने आम्ही आलो असतो असेही सुरेश धस म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
वाल्मिक कराडवर 302 दाखल करा; धनंजय मुंडेंचा निकटवर्ती असल्याने त्याला VIP ट्रीटमेंट मिळतेय का? आमदार संदीप क्षीरसागरांचा सवाल