एक्स्प्लोर

वाल्मिक कराडवर 302 दाखल करा; धनंजय मुंडेंचा निकटवर्ती असल्याने त्याला VIP ट्रीटमेंट मिळतेय का? आमदार संदीप क्षीरसागरांचा सवाल

ल्मिक कराड याचे नाव 302 मध्ये टाकून त्याला सह आरोपी केलं पाहिजे. एखाद्या आरोपाला व्हीआयपी सारखी ट्रीटमेंट दिली जात असल्याचा घणाघात आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला आहे.

Santosh Deshmukh Murder Case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ धाराशिवमध्ये आज जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय द्यावा, या मागणीसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे, या मोर्चासाठी संभाजी राजे छत्रपती, मनोज जरांगे पाटील, आमदार सुरेश धस, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार संदीप क्षीरसागर, नरेंद्र पाटील, देशमुख कुटुंबिय उपस्थित आहेत. धाराशिव शहरातील राजमाता जिजाऊ चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली आहे.

दरम्यान, हत्या प्रकरणातील आरोपींवर मोक्का अंतर्गत (MOCCA)कारवाईवर आमदार संदीप क्षीरसागर समाधानी नाहीत. या प्रकरणाचा मास्टर माईंड वाल्मिक कराड आहे. त्याला सहआरोपी करा ही मागणी त्यांनी पुन्हा केली आहे. तसेच धनंजय मुंडे यांच्यावरही निशाणा साधलाय. सात आरोपींवरती मोक्का लावलाय, पण वाल्मिक कराडवर मोक्का (MOCCA)लागला पाहिजे. वाल्मिक कराड याचे नाव 302 मध्ये टाकून त्याला सह आरोपी केलं पाहिजे. एखाद्या आरोपाला व्हीआयपी सारखी ट्रीटमेंट दिली जाते. धनंजय मुंडे यांनी स्वतः सांगितले आहे की तो माझा निकटवर्ती आहे. मग केवळ त्यामुळे त्यांना अशा पद्धतीने वागणूक दिली जातेय का? एखादा आरोपी सरेंडर होताना स्वतःच्या गाडीतून येतो हे राज्यातील पहिली केस असावी, असा घणाघात आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांनी केला आहे.

संतोष देशमुख हत्याकांडातील सुदर्शन घुलेसह 7 आरोपींवर मोक्का

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात CID कडून कारवाईला जोर आला असून सुदर्शन घुलेसह 7 आरोपींवर मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच या प्रकरणातील आरोपींवर संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत कारवाई करणाऱ्या असल्याचे सांगितलं होतं. त्यानंतर या प्रकरणातील सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार आणि कृष्णा आंधळे हे सहा आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. त्यामुळे या आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी सर्व दोषींवर खुनाचे गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत यावर प्रतिक्रिया देणार नसल्याचे सांगितलंय. (MOCCA)

हेही वाचा:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : स्वबळाच्या नाऱ्यानं महाविकास आघाडीत वितुष्ट येईल का? संजय राऊत यांचं दोन शब्दात उत्तर, तर्क वितर्क थांबणार?
स्वबळाच्या नाऱ्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, मविआच्या प्रश्नावर संजय राऊतांनी दोन शब्दात उत्तर देत सगळं स्पष्ट केलं
69 वर्षीय आजोबांचा नाद खुळा; संभाजीनगरहून सुरुवात, पूर्ण केली 4000 किमी सायकल वारी; तरुणाईला मोलाचा संदेश
69 वर्षीय आजोबांचा नाद खुळा; संभाजीनगरहून सुरुवात, पूर्ण केली 4000 किमी सायकल वारी; तरुणाईला मोलाचा संदेश
Devendra Fadnavis : संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
महाविकास आघाडी इतिहास जमा, फक्त अधिकृत घोषणा बाकी, शिंदे गटातील आमदाराच्या व्यक्तव्यानं भुवया उंचावल्या!
महाविकास आघाडी इतिहास जमा, फक्त अधिकृत घोषणा बाकी, शिंदे गटातील आमदाराच्या व्यक्तव्यानं भुवया उंचावल्या!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vasai Jewellers Robbery CCTV : हेल्मेट घालून आले थेट बंदूक काढली, ज्वेलर्स दुकानातील दरोड्याचा थरार!Sakshana Salgar on Santosh Deshmukh:देशमुखांची लेक 12वीत,न्यायासाठी दारोदारी जात रडतेय;वाईट वाटतंय!Beed Santosh Deshmukh Case MCOCA Update : संतोष देशमुख हत्याप्रकरणी सर्व आरोपींवर मकोकाSuresh Dhas on MCOCA : अजून बऱ्याच लोकांवर मकोका लागणार...सुरेश धसांचा रोख कुणावर?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : स्वबळाच्या नाऱ्यानं महाविकास आघाडीत वितुष्ट येईल का? संजय राऊत यांचं दोन शब्दात उत्तर, तर्क वितर्क थांबणार?
स्वबळाच्या नाऱ्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, मविआच्या प्रश्नावर संजय राऊतांनी दोन शब्दात उत्तर देत सगळं स्पष्ट केलं
69 वर्षीय आजोबांचा नाद खुळा; संभाजीनगरहून सुरुवात, पूर्ण केली 4000 किमी सायकल वारी; तरुणाईला मोलाचा संदेश
69 वर्षीय आजोबांचा नाद खुळा; संभाजीनगरहून सुरुवात, पूर्ण केली 4000 किमी सायकल वारी; तरुणाईला मोलाचा संदेश
Devendra Fadnavis : संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
महाविकास आघाडी इतिहास जमा, फक्त अधिकृत घोषणा बाकी, शिंदे गटातील आमदाराच्या व्यक्तव्यानं भुवया उंचावल्या!
महाविकास आघाडी इतिहास जमा, फक्त अधिकृत घोषणा बाकी, शिंदे गटातील आमदाराच्या व्यक्तव्यानं भुवया उंचावल्या!
प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याला ह्रदयविकाराचा झटका; प्रकृती गंभीर, तातडीनं रुग्णालयात दाखल
प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याला ह्रदयविकाराचा झटका; प्रकृती गंभीर, तातडीनं रुग्णालयात दाखल
Video: माझ्या परीक्षा आहेत, पण मला न्यायासाठी रस्त्यावर यावं लागतंय; धाराशिवमध्ये संतोष देशमुखांची लेक भावुक
Video: माझ्या परीक्षा आहेत, पण मला न्यायासाठी रस्त्यावर यावं लागतंय; धाराशिवमध्ये संतोष देशमुखांची लेक भावुक
Mutual Fund : सेबीचं छोट्या गुंतवणूकदारांसाठी मोठं पाऊल, 250 रुपयांची SIP आणणार, म्युच्यूअल फंडमध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढणार
सेबीचं छोट्या गुंतवणूकदारांसाठी मोठं पाऊल, 250 रुपयांची SIP आणणार, म्युच्यूअल फंडमध्ये पैसा वाढणार
Manikrao Kokate : भुजबळ साहेबांना माहितीय, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला माझ्याकडे उत्तर, पण...; नेमकं काय म्हणाले माणिकराव कोकाटे?
भुजबळ साहेबांना माहितीय, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला माझ्याकडे उत्तर, पण...; नेमकं काय म्हणाले माणिकराव कोकाटे?
Embed widget