एक्स्प्लोर

Miraj: वकिलांची फी देण्यास चालढकल, अतिरिक्त आयुक्तांची खुर्ची जप्त करण्याचे आदेश; रक्कमेचा चेक दिल्यानंतर प्रकरणावर पडदा 

Miraj: न्यायालयाचे बेलीफ अतिरिक्त आयुक्तांची खुर्ची जप्त करण्यासाठी गेल्यानंतर महापालिका प्रशासन जागे झाले. 

सांगली: वकिलांची फी दिली नाही म्हणून मिरज न्यायालयाने मिरज महापालिका अतिरिक्त आयुक्तांच्या खुर्चीसह  कार्यालयातील जंगम मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाने मिरज महापालिका प्रशासनाची मात्र तारांबळ उडाली. न्यायालयाचे बेलीफ अतिरिक्त आयुक्तांची खुर्ची जप्त करण्यासाठी गेल्यानंतर महापालिका प्रशासन जागे झाले. आयुक्तांची खुर्ची जप्त करण्याची कारवाई सुरू असतानाच अतिरिक्त आयुक्त यांनी मध्यस्थी करत फिर्यादीना त्यांच्या रक्कमेचा चेक दिल्यानंतर  या प्रकरणावर अखेर पडदा पडला.

मिरजेतील एका वकिलांची फी दिली नाही म्हणून मिरज महापालिका अतिरिक्त आयुक्तांच्या खुर्चीसह कार्यालयातील जंगम मालमत्ता जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याने मिरजेत एकच खळबळ उडाली. वसुलीसाठी जप्तीपथक मिरज मनपात आल्यानंतर  अतिरिक्त आयुक्त यांनी दोन लाखाचा चेक दिल्यानंतर न्यायालयाचे पथक माघारी गेले. 

मिरजेतील  वकील प्रशांत नरवाडकर हे गेले अनेक वर्षे महापालिकेच्या पॅनलवर काम करत होते. सदर कालावधीत त्याची फी महापालिकेने दिली नाही. याबाबत त्यानी मिरज न्यायालयात 2019 साली वसुलीचा दावा दाखल केला. न्यायालयाने 2021 रोजी महापालिकेची जंगम मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले होते. परिणामी महापालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयातील जंगम मालमत्ता जप्त करण्याचे आदेश मिरज न्यायालयाने दिल्यानंतर महापालिका कार्यालयात न्यायालयाचे बेलीफ हे अतिरिक्त आयुक्तांची खुर्ची जप्त करण्यासाठी आले होते. 

त्यानुसार बुधवारी सकाळी 11 वाजता न्यायालयाचे पथक महापालिकेत जप्तीसाठी दाखल झाले. यावेळी न्यायालयाचे बिलीफ यांनी अतिरिक्त आयुक्तांची खुर्ची जप्त करण्याची कारवाई सुरू करत असताना अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय लांघी यांनी मध्यस्थी करत फिर्यादी यांना दोन लाखात तडजोड करून सायंकाळी 2 लाखाचा चेक दिल्यानंतर प्रकरणावर पडदा पडला. मात्र महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांची खुर्ची जप्त करण्यास पथक आल्यामुळे महापालिका कार्यालयात एकच धावपळ उडाली होते. महापालिकेच्या कारभाराची लक्तरे निघाल्याने शहरात एकच खळबळ उडाली.

महत्त्वाच्या बातम्या: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गर्लफ्रेंडचा क्रूर शेवट ठरला लॉरेन्स बिश्नोईच्या गुन्हेगारीची सुरुवात, प्रेमकहाणीचा थरकाप उडवणारा अंत
गर्लफ्रेंडचा क्रूर शेवट ठरला लॉरेन्स बिश्नोईच्या गुन्हेगारीची सुरुवात, प्रेमकहाणीचा थरकाप उडवणारा अंत
70 कोटींच्या बजेटमध्ये कमावले 343 कोटी;  सिंघम किंवा गोलमाल नाही, तर 'हा' ठरला अजय देवगणचा ब्लॉकबस्टर सिनेमा
70 कोटींच्या बजेटमध्ये कमावले 343 कोटी; सिंघम किंवा गोलमाल नाही, तर 'हा' ठरला अजय देवगणचा ब्लॉकबस्टर सिनेमा
Lawrence Bishnoi gang: खोलीसाठी दुप्पट भाडं, शेजाऱ्यांच्या  कुत्र्याशी खेळायचे; सिद्दीकींच्या मारेकऱ्यांचे चेहरे टीव्हीवर पाहताच कुर्ल्यातील पटेल चाळ हादरली
लहान मुलांशी इंग्लिश टॉकिंग, शेजाऱ्यांच्या कुत्र्याशी खेळायचा; सिद्दीकींच्या मारेकऱ्याला पाहताच कुर्ल्यातील पटेल चाळ हादरली
Munawar Faruqui : बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर मुनव्वर फारुकीही बिष्णोई गँगच्या रडावर? जीवाला धोका असल्याची माहिती; सुरक्षेतही वाढ
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर मुनव्वर फारुकीही बिष्णोई गँगच्या रडावर? जीवाला धोका असल्याची माहिती; सुरक्षेतही वाढ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vashi Toll Plaza :  मुंबईतील टोलमाफीमुळे वाहनचालकांकडून आनंद व्यक्तMulund Toll Plaza :  मुलुंड टोनाक्यावरून वाहनं सुसाट; टोलमाफीचा आनंदMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  15 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 15 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गर्लफ्रेंडचा क्रूर शेवट ठरला लॉरेन्स बिश्नोईच्या गुन्हेगारीची सुरुवात, प्रेमकहाणीचा थरकाप उडवणारा अंत
गर्लफ्रेंडचा क्रूर शेवट ठरला लॉरेन्स बिश्नोईच्या गुन्हेगारीची सुरुवात, प्रेमकहाणीचा थरकाप उडवणारा अंत
70 कोटींच्या बजेटमध्ये कमावले 343 कोटी;  सिंघम किंवा गोलमाल नाही, तर 'हा' ठरला अजय देवगणचा ब्लॉकबस्टर सिनेमा
70 कोटींच्या बजेटमध्ये कमावले 343 कोटी; सिंघम किंवा गोलमाल नाही, तर 'हा' ठरला अजय देवगणचा ब्लॉकबस्टर सिनेमा
Lawrence Bishnoi gang: खोलीसाठी दुप्पट भाडं, शेजाऱ्यांच्या  कुत्र्याशी खेळायचे; सिद्दीकींच्या मारेकऱ्यांचे चेहरे टीव्हीवर पाहताच कुर्ल्यातील पटेल चाळ हादरली
लहान मुलांशी इंग्लिश टॉकिंग, शेजाऱ्यांच्या कुत्र्याशी खेळायचा; सिद्दीकींच्या मारेकऱ्याला पाहताच कुर्ल्यातील पटेल चाळ हादरली
Munawar Faruqui : बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर मुनव्वर फारुकीही बिष्णोई गँगच्या रडावर? जीवाला धोका असल्याची माहिती; सुरक्षेतही वाढ
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर मुनव्वर फारुकीही बिष्णोई गँगच्या रडावर? जीवाला धोका असल्याची माहिती; सुरक्षेतही वाढ
भारताने कॅनडाला खडसावले, उच्चायुक्त माघारी बोलावले; कॅनडाच्या अधिकाऱ्यांना दिल्ली सोडण्यासाठी 19 ऑक्टोबरपर्यंत वेळ
भारताने कॅनडाला खडसावले, उच्चायुक्त माघारी बोलावले; कॅनडाच्या अधिकाऱ्यांना दिल्ली सोडण्यासाठी 19 ऑक्टोबरपर्यंत वेळ
MNS activist killed : कट मारल्यामुळे बाचाबाची, रिक्षाचालक अन् फेरीवाल्यांनी मिळून मनसे कार्यकर्त्याला संपवल्याचा दावा, मालाड पूर्वेत आत्तापर्यंत काय घडलं?
कट मारल्यामुळे बाचाबाची, रिक्षाचालक अन् फेरीवाल्यांनी मिळून मनसे कार्यकर्त्याला संपवल्याचा दावा, मालाड पूर्वेत आत्तापर्यंत काय घडलं?
World War II Bomb : जर्मनीत सापडला दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब! 5 हजार लोकांना सुरक्षितस्थळी नेलं, निकामी करण्यास किती तास लागले?
जर्मनीत सापडला दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब! 5 हजार लोकांना सुरक्षितस्थळी नेलं, निकामी करण्यास किती तास लागले?
Atul Parchure Passes Away : अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन, 57व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Atul Parchure Passes Away : अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन, 57व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Embed widget