एक्स्प्लोर

संभाजी भिडे पुन्हा वादात! लिव्ह इन रिलेशनशिपच्या निर्णयावरुन न्यायाधीशांवर केली आगपाखड 

Sambhaji Bhide : मी हे बोलल्याने माझ्यावर गुन्हे दाखल होतील, काय गुन्हे दाखल करायचे ते करु देत, असंही भिडे यांनी पुढं म्हटलं

सांगली :   शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे पुन्हा वादात सापडण्याची चिन्हं आहेत.  राज्यात सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याच्या निर्णयावर  संभाजी भिडे यांनी टीका केली आहे. वाईनविक्रीचा निर्णय धर्मविरोधी असल्याचे भिडे यांनी म्हटलं आहे. या संदर्भात लवकरच राज्यपालांची भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तर नाईट लाईफ संकल्पनेवरही भिडे यांनी हल्लाबोल केला आहे.  नाईट लाईफ म्हणजे सर्वनाश असल्याचे भिडे यांनी म्हटलं आहे. लिव्ह इन रिलेशनशिपचा निर्णय देणाऱ्या न्यायमूर्तींवरही त्यांनी आगपाखड केली आहे.

या वक्तव्यामुळे संभाजी भिडे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. लिव्ह इन रिलेशनशीप अयोग नाही, असं म्हणणाऱ्या न्यायालये देखील वैध नाहीत, अशा न्यायाधीशांना त्या जागेवरून संपवले पाहिजे, असं त्यांनी म्हटलं आहे. संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे की, मी हे बोलल्याने माझ्यावर गुन्हे दाखल होतील, काय गुन्हे दाखल करायचे ते करु देत, असंही भिडे यांनी पुढं म्हटलं. त्यामुळे न्यायव्यवस्था आणि न्यायाधीश यांच्यावर थेट अशा पध्दतीने आक्षेपार्ह टीका केल्याने भिडे पुन्हा वादात सापडले आहेत.

वाईनला परवानगी देण्याच्या निर्णयावरुनही हल्लाबोल

राज्य सरकारने वाईनला परवानगी देण्याचा घेतलेला निर्णय हा संतापजनक, समाजाला हानिकारक असल्याचं संभाजी भिडे यांनी म्हटलं होतं. सरकारने वाइन सुरू करून जुगार लावलेला आहे. मला आर आर आबांची आठवण होते. आज ते असते तर हा वाईनचा निर्णय झाला नसता असेही भिडे यावेळी म्हणाले. सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी डान्सबार बंदी करण्याचा निर्णय घेतला होता असेही भिडे यावेळी म्हणाले. राज्य सरकारने किराणा दुकाने आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी दिली आहे. यावरुन भिडे यांनी राज्य सरकारवर निशाणा लगावला.

राज्यपालांकडे मंत्रीमंडळ बरखास्त करण्याची मागणी करणार

आरक्षणासाठी हापापलेल्या संस्थानी या निर्णयाविरोधात आवाज उठवला पाहिजे. महाराष्ट्राने देशाला देशपन, इतिहास दिला आहे. महाराष्ट्र शासन जर असे काहीही निर्णय घेत असेल तर महाराष्ट्र कुठे जातोय असे भिडे यावेळी म्हणाले. ज्या मंत्रीमंडळाने हा निर्णय घेतलाय त्यांना कोणती शिक्षा द्यावी असे ते म्हणाले. मंत्रिमंडळावर पुढच्या पिढीला प्रकाश वाट दाखवण्याची जबाबदारी असून, त्यांनीच हा निर्णय घेतला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटून हे मंत्रीमंडळ बरखास्त करा असे सांगणार असल्याचे भिडे यांनी सांगितले. नरेंद्र मोदी यांच्यासारखा चांगल पंतप्रधान देशाला लाभला आहे.  मोदींनी लोकसभेत दारू बंदीचा ठराव करून दारूला तिलांजली द्यावी असे भिडे यावेळी म्हणाले. एक मराठा लाख मराठा हे वाक्य प्रेरणादायी आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी मागणीही यावेळी भिडेंनी केली.  मुंबईला नाईट लाईफ देणार ही भाषा म्हणजे समाजला व्यभिचाराकडे नेणारी असल्याचं त्यांनी सांगितले.
 
दारुला मुक्तता तर मग गांजा शेतीला का आडवे

दारूला जर मुक्तता दिली जात असेल तर मग गांजा शेतीला का आडवे लावले जातेय? असा सवालही संभाजी भिडे यांनी केला. गांजा शेतीला परवानगी द्या असे म्हणाणारा हा समाज असल्याचे ते म्हणाले. दारुच्या निर्णयाबाबत मुख्यमंत्र्यांसह सगळ्या मंत्रिमंडळशी बोलणार आहे. वाईनचा निर्णय मागे घ्यावा याबाबतची मागणी करणार आहे. देशासाठी हा निर्णय कसा घातक आहे हे त्यांना सांगणार असल्याचे भिडे म्हणाले. लिव्ह-इन रिलेशनशिप योग्य आहे असे सांगणारे न्यायालय देखील चूक आहे. माझ्यावर भले गुन्हे दाखल झाले तरी चालतील असेही भिडे म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या

Harshwardhan Sapkal: राहुल गांधींच्या 'छात्रों की गूंज' कार्यक्रमाआधीच पुण्यात मोठा राडा; हर्षवर्धन सपकाळ भडकले, म्हणाले, 'भाडोत्री गुंडांचा हा स्टंट; कार्यक्रम तर होणारच'
राहुल गांधींच्या 'छात्रों की गूंज' कार्यक्रमाआधीच पुण्यात मोठा राडा; हर्षवर्धन सपकाळ भडकले, म्हणाले, 'भाडोत्री गुंडांचा हा स्टंट; कार्यक्रम तर होणारच'
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: डोंगरावर गेला, 3 तास कड्यावर उभा राहिला; उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, आता जीवन संपवण्यामागचं धक्कादायक कारण आलं समोर
डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू; जीवन संपवण्यामागचं धक्कादायक कारण आलं समोर
बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget