एक्स्प्लोर
यापुढे सबनीसांच्या व्यासपीठावर जाणार नाही- सदानंद मोरे
पुणेः श्रीपाल सबनीस यांनी जरा बोलताना तोल सांभाळावा असं म्हणत माजी संमेलनाध्यक्ष आणि संत साहित्याचे अभ्यासक सदानंद मोरे यांनी सबनीसांना चांगलच फैलावर घेतलं आहे. रविवारी अक्षरधाराच्या मुलाखतीत सबनीस यांनी आजवरच्या संमेलनाध्यक्षांनी केवळ व्यासपीठावर पत्नीसह मिरवून घेतलं, असं म्हणत खळबळ उडवून दिली होती.
सबनीसांच्या या वक्तव्याला उत्तर देताना मोरेंनी हा आजवरच्या सगळ्या संमेलनाध्यक्षांच्या पत्नींचा अवमान असल्याचं म्हटलं आहे. तसंच आपण याआधीही सबनीस यांना शब्द जपून वापरण्याचा सल्ला दिला होता. मात्र त्यांनी तो अंमलात आणलेला नाही, अशा शब्दात मोरेंनी सबनीसांवर निशाणा साधला आहे.
श्रीपाल सबनीस अभ्यास न करता वाटेल ते बोलत राहतात. त्यामुळं यापुढं आपण त्यांच्यासोबत व्यासपीठावर जाणार नाही, अशा शब्दात मोरेंनी तीव्र नाराजी देखील व्यक्त केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement