एक्स्प्लोर
सेवा देण्यास पुढे या अन्यथा मेस्मा लावू, खासगी डॉक्टरांना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफांचा इशारा
सेवा देण्यास पुढे या अन्यथा मेस्मा लावू, असा इशारा खासगी डॉक्टरांना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला आहे.
कोल्हापूर : कोरोनाचा कहर वाढतच आहे. अशा परिस्थितीत टोकाचे प्रयत्न करूनही सरकारी यंत्रणेवर प्रचंड ताण पडत आहे. त्यामुळे 'खाजगी डॉक्टरांनो, सेवा देण्यासाठी पुढे या अन्यथा नाईलास्तव मेस्मा कायदा लावावा लागेल', असा सबुरीचा सल्ला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला आहे. एमबीबीएस आणि एमडी डॉक्टर जर सरकारी कोविड केअर सेंटरमधून सेवा देणारच नसतील तर मग मात्र नाइलाजाने त्यांना मेस्मा लावावा लागेल, असे पत्रकात म्हटले आहे.
या पत्रकात पुढे मुश्रीफ म्हणाले आहेत की, अत्यवस्थ रुग्णाला रुग्णालयात जाताक्षणीच आधी उपचार, नंतर बेड मिळण्यासाठी आणि रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू टाळण्यासाठी शेवटपर्यंत लढूया, अशी भावनिक साद ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासनासह कोरोना योद्ध्यांना घातली आहे. मृत्यूदर कमी करणे, पॉझिटिव्ह रेट कमी करणे आणि टेस्टिंग वाढविणे यावर भर द्या, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
कोरोना चाचणी बंधनकारक केल्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या घटली!
रुग्णांवर वेळीच उपचार व्हायला हवेत : मुश्रीफ
आजार अंगावरच काढून उशीराने येणारे, वयाने जास्त असणारे किंवा इतर आजाराचे रुग्ण यांना ज्यावेळी बेड मिळत नाहीत आणि आम्हाला फोन येतात त्यावेळी आम्ही अक्षरशः अस्वस्थ होतो. या सगळ्यांना आधी उपचार व नंतर बेड मिळालेच पाहिजेत. सरकारी अधिकाऱ्यांनी त्यासाठी आवश्यक ती कमिटी तयार करावी, डॅशबोर्ड तयार करा. काहीही झाले तरी रुग्णाला रुग्णालयात जाताक्षणीच उपचार सुरु व्हायलाच पाहिजेत. मृत्यू मग तो कोणाचाही असो दुर्दैवीच आहे. त्याला वाचविण्यासाठी शेवटपर्यंत संघर्ष करा.
महाराष्ट्र राज्याच्या तुलनेत कोल्हापूर जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट 35 टक्के आहे. म्हणजेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे आपल्याकडे कमी आहे. तसेच मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे, याबद्दलही मुश्रीफ यांनी चिंता व्यक्त केली आहे.
Kolhapur Patil-Mahadik Supporters Ruckus | कोल्हापुरात सतेज पाटील आणि धनंजय महाडिक समर्थक आमनेसामने
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement