एक्स्प्लोर
आर्चीसाठी बीडकर सैराट, तरुणांचा 'झिंगाट'वर ठेका
बीड: 'सैराट'मुळे एका रात्रीत प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या आर्ची उर्फ रिंकू राजगुरूची एक झलक पाहायला मिळावी यासाठी बीडकरांची अक्षरश: झुंबड उडाली होती. रिलायन्स आणि नगर पालिकेच्या मोफत वाय-फायचे उदघाटन करण्यासाठी आलेल्या रिंकूनं बीडकरांना अक्षरशः याड लावलं. यावेळी हजारो तरुणांची आणि महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.
बीड नगरपरिषद आणि रिलायन्सच्या वतीने जिओ वाय-फाय सेवेचे उदघाटन करण्यात आले. यासाठी सैराट फेम रिंकू राजगुरू उर्फ आर्ची हिच प्रमुख आकर्षण होती. साधारणपणे 11 वाजताच्या कार्यक्रमासाठी बीडकरांनी सकाळी 9 वाजेपासून तुफान गर्दी केली होती. तरुण मुलं, मुली आणि महिलांची यावेळी लक्षणीय उपस्थिती होती.
राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर आणि अर्चीच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ करण्यात आला
अवघ्या तीन मिनिटांच्या भाषणात रिंकूनं या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या वेळी तरुणांनी बेधुंद होत सैराटच्या झिंगाट गाण्यावर डान्स केला. 'ए परश्या आर्ची आली आर्ची...' हाच आवाज परिसरात घुमत होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
कोल्हापूर
Advertisement