ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 मार्च 2026 | रविवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 मार्च 2026 | रविवार
1. अमेरिका, इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनींचा मृत्यू, खामेनींच्या घरातील चार सदस्यांचाही मृत्यू https://tinyurl.com/yan2bn67 इस्त्रायल-अमेरिकेनं सर्वोच्च धर्मगुरु खामेनींना ठार केल्यानंतर इराणचा आक्रमक पवित्रा, यूएई, कतार, बहरिनसह 27 ठिकाणी जबर हल्ला, दुबईतील बुर्ज खलिफा रिकामा करावा लागला, विमानतळ सुद्धा बंद https://tinyurl.com/3r44sneu
2. वरिष्ठ नेत्यांसोबत गुप्त बैठक सुरू असतानाच अचानक अमेरिका अन् इस्त्रायलचा हल्ला, इराणचे सर्वोच्च नेते खामेनींच्या मृत्यूची इनसाइड स्टोरी https://tinyurl.com/ybtrets6 वारसदार निवडण्यापूर्वीच अयातुल्लाह खामेनींचा लष्करी कारवाईत अंत झाल्याने इराण गंभीर वळणावर https://tinyurl.com/yuj6u5sp
3. वयाच्या 11व्या वर्षी मौलवी, अमेरिकेचे तब्बल सात राष्ट्राध्यक्ष आणि इस्त्रायलच्या टार्गेटवर; झुंजले, झुंजवलं, पण अखेर सर्वोच्च धर्मुगुरु कुटुंबासह सापडले https://tinyurl.com/2h9zuwxw इस्रायल-अमेरिका पेटून उठले, इराणवर धडाधड मिसाईल हल्ले, पण युद्धामागचं नेमकं कारण काय? A टू Z माहिती https://tinyurl.com/2xc85c3y
4. अमेरिका–इस्रायलच्या इराणवरील हल्ल्याचा जागतिक पातळीवर परिणाम, शेअर बाजारातील घसरण, महागाई वाढीसह दहा मोठ्या गोष्टींमध्ये बदल, भारतावरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता https://tinyurl.com/y63jerea दोन दिवस पुणे ते दुबई अन् दुबई ते पुणे विमानसेवा बंद राहणार, दुबईत अडकलेल्या नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर जारी https://tinyurl.com/3ke5h6va
5. इराण- इस्त्रायल युद्धाचा भडका, सोन्या-चांदीचा भाव कडाडला, सोन्याच्या दरात 11 हजारांची वाढ, तर चांदीचा दर 25 हजारांनी वाढून तीन लाखांच्या पार https://tinyurl.com/mu9jfvd3 'उमरा'साठी मक्का-मदीनामध्ये गेलेले महाराष्ट्रातील 50 हजार मुस्लिम बांधव अडकले, सौदीतून सुरक्षित आणण्यासाठी मोहीम सुरू https://tinyurl.com/49edsc3a
6. नागपुरातील राऊळगावजवळ दारुगोळा बनवणाऱ्या एसबीएल कंपनीत भीषण स्फोट, 17 जणांचा मृत्यू https://tinyurl.com/3aaxctma मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्फोटातील मृतांना श्रद्धांजली अर्पण, मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत जाहीर, घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश https://tinyurl.com/3edbs99u
7. राज्यभरातील सर्व सरकारी आणि खासगी कार्यालयांचे 30 दिवसांत PoSH ऑडिट करा, महिलांच्या लैंगिक छळासंबंधी स्थितीची माहिती द्या, राज्य महिला आयोगाचे जिल्हाधिकाऱ्यांना कडक निर्देश https://tinyurl.com/ycx3v5r2
8. गैरवर्तनाचा बदला घेण्यासाठी महिलेच्या नावे इन्स्टाग्राम खातं उघडून तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं अन् निर्जनस्थळी बोलावून त्याला संपवलं मृतदेह नीरा नदीत फेकला, साताऱ्यातील घटनेने खळबळ, एकाच कुटुंबातील चौघांना अटक https://tinyurl.com/kmz749xb बारा वर्षांचा संसार, पण सोशल मीडियावर झालं दुसऱ्यासोबत प्रेम, इग्नोर केल्यानं प्रियकरानं घरी येऊन तिच्यावर झाडली गोळी, स्वतःही आत्महत्या केली, जळगावातील प्रेमप्रकरणाचा रक्तरंजित शेवट https://tinyurl.com/5232kma2
9. अकोल्यात आयशरची दुचाकीला जोरदार धडक, तीन अल्पवयीन मुलांचा जागीच मृत्यू https://tinyurl.com/4khjkxz4 अतिक्रमण कारवाईला विरोध करत अधिकाऱ्यांना अन् कर्मचाऱ्यांना शिवीगाळ; एमआयएमच्या14 नगरसेवकांसह 40 ते 50 जणांविरुद्ध गुन्हा दाखल https://tinyurl.com/5dstaarm चुलत्यानेच 13 महिन्यांच्या चिमुकलीचे तुकडे करुन जमिनीत पुरले, धाराशिव हादरलं https://tinyurl.com/3u5n2tdw
10. ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात आज भारत विरुद्ध वेस्ट इंडिजमध्ये सामना, कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर दोन्ही संघामध्ये क्नॉक आऊट मॅच, जो जिंकेल त्याला सेमिफायनलची संधी https://tinyurl.com/2p9k9npb बॉलिवूड कलाकार, खेळाडू अन् सेलिब्रेटींचं दुसरं घर असलेल्या दुबईमध्ये थरकाप, भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू शनिवारपासून दुबई विमानतळावर अडकली https://tinyurl.com/427zzcsw
एबीपी माझा स्पेशल
IND vs WI T20 World Cup Match : टी-20 विश्वचषकात भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये आज 'करो या मरो'ची लढत https://www.youtube.com/watch?v=muj3TRanpM4
एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w
























