एक्स्प्लोर

नागपूर भीषण स्फोट प्रकरण! मृतदेहांची ओळख पटवणं कठीण, प्रत्येक मृत कामगाराची डीएनए चाचणी होणार

नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे आज (1 मार्च 2026) सकाळच्या सुमारास एसबीएल एनर्जी लिमिटेड कंपनीमध्ये मोठा स्फोट झाल्याची घटना घडलीय. यामध्ये 17 जणांचा मृत्यू झाला आहे.

Nagpur SBL Company Blast : नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे आज (1 मार्च 2026) सकाळच्या सुमारास एसबीएल एनर्जी लिमिटेड कंपनीमध्ये मोठा स्फोट झाल्याची घटना घडलीय. बारुद आणि त्यापासून डेटोनेटरसह इतर स्फोटक बनवणाऱ्या कंपनीत हा मोठा स्फोट (SBL Blast Update) झालाय. दरम्यान या भीषण स्फोटातील मृतांचा आकडा वाढला आहे. (Nagpur SBL Company Blast News) आतापर्यंत या भीषण स्फोटत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. या स्फोटातील प्रत्येक मृत कामगाराची डीएनए प्रोफाइल चाचणी होणार आहे. ही प्रक्रिया दोन दिवसात पूर्ण होईल अशी शक्यता आहे. 

सर्व मृतकांचे शरीर जळून गेल्यामुळे मृतदेहांची ओळख पटविणे कठीण 

नागपूरचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी राऊळगाव येथील एसबीएल एनर्जी कंपनीत झालेल्या स्फोटानंतर घटनास्थळाला भेट देऊन सर्व माहिती जाणून घेतली. यावेळी नागपूरचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि प्रशासनिक अधिकारी उपस्थित होते. आज सकाळी 7 वाजताच्या सुमारास एसबीएल एनर्जी लिमिटेड या कंपनीमध्ये झालेल्या स्फोटात 17 कामगारांचा मृत्यू झाला होता. तर 24 कामगार गंभीर जखमी  झाले होते. सर्व मृतकांचे शरीर जळून गेल्यामुळे मृतदेहांची ओळख पटविणे कठीण जात आहे... त्यामुळे प्रशासनाने सर्व मृतांची डीएनए प्रोफाइलिंग चाचणी करण्याचे निर्णय घेतले असून त्यासाठी अनेक कामगारांच्या नातेवाईकांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. डीएनए प्रोफाइलिंग चाचणी दोन दिवसात पूर्ण होण्याची शक्यता आहे तोवर सर्व मृतदेह शासकीय वैद्यकीय रुग्णालयात शीतगृहात ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये जखमी झालेल्या कामगारांवर नागपुरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर सर्व मृत कामगारांचे पार्थिव वैद्यकीय आणि उत्तरीय  तपासणीसाठी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ॲम्बुलन्सद्वारे आणण्यात आले आहे.

स्फोटाची घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे स्फोटकांच्या एका फॅक्टरीत झालेल्या स्फोटाची घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद आहे. मी स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्कात आहे. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक हे तातडीने घटनास्थळी पोहोचले आहेत. एनडीआरएफ, एसडीआरएफचे पथक सुद्धा घटनास्थळी आहे. ‘पेसो’ आणि ‘डिश’ यांची पथके पोहोचली आहेत. मदतकार्याला वेग देण्यात आला असून आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत 18 जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने नागपूरला हलवण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: सलग दुसऱ्या आठवड्यात युद्धज्वर शिगेला, गॅस टंचाईमुळे राज्यभरात हॉटेल व्यवसाय संकटात
Maharashtra Live Blog Updates: सलग दुसऱ्या आठवड्यात युद्धज्वर शिगेला, गॅस टंचाईमुळे राज्यभरात हॉटेल व्यवसाय संकटात
Gas Cylinder Booking : सिलेंडर संपण्याची भीती, नवीन बुकिंग वेळी येताय अडचणी? काळजी नाही, घरबसल्या मोबाईलवरून वापरा या सोप्या ट्रिक्स
सिलेंडर संपण्याची भीती, नवीन बुकिंग वेळी येताय अडचणी? काळजी नाही, घरबसल्या मोबाईलवरून वापरा या सोप्या ट्रिक्स
मोठी बातमी : पेड पिरीयड लीव याचिकेवर सुप्रीम कोर्टाचं मोठं निरीक्षण, अशा महिलांना नोकरीवर....
पेड पिरीयड लीव याचिकेवर सुप्रीम कोर्टाचं मोठं निरीक्षण, अशा महिलांना नोकरीवर....
Nashik Crime News: पोलीस असल्याचं सांगत व्यापाऱ्याचं अपहरण, 25 लाखांची मागितली खंडणी; छळादरम्यान व्यापाऱ्याने सोडला जीव, नाशिकमधील खळबळजनक घटना
पोलीस असल्याचं सांगत व्यापाऱ्याचं अपहरण, 25 लाखांची मागितली खंडणी; छळादरम्यान व्यापाऱ्याने सोडला जीव, नाशिकमधील खळबळजनक घटना
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Politics On Gas Shortage : गॅस सिलिंडर टंचाईविरोधात काँग्रेस आक्रमक Special Report
Special Report Bomb Threat to Assembly : धमकीचा बॉम्ब, अफवांमुळे घाम! Special Report
Politics On Marathi Language : मराठीचा मुद्दा, मुनगंटीवारांचा गुद्दा Special Report
Queue For LPG Cylinder : मुबलकसाठा आणि रांगेतला आटापिटा, नागरिक चिंतेत Special Report
Special Rpeort Cockroach Spray On Fish : माशांवर लाल हिट, कारवाईचा स्प्रे कधी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
US inquiry into India: पुन्हा टॅरिफ लादून दंडित करण्याची तयारी सुरु! आता अमेरिकेनं भारताची थेट चौकशी लावली; रशियन तेल खरेदीला 30 दिवसांची परवानगी दिल्यानंतर नवा आदेश
पुन्हा टॅरिफ लादून दंडित करण्याची तयारी सुरु! आता अमेरिकेनं भारताची थेट चौकशी लावली; रशियन तेल खरेदीला 30 दिवसांची परवानगी दिल्यानंतर नवा आदेश
Video: नवरा नवरी घेऊन जाणाऱ्या स्कॉर्पिओवर ओपन जीपमधून चक्क नोटांची उधळण; मांडवापासून ते भर रस्त्यावर नोटांचा खच पडला
Video: नवरा नवरी घेऊन जाणाऱ्या स्कॉर्पिओवर ओपन जीपमधून चक्क नोटांची उधळण; मांडवापासून ते भर रस्त्यावर नोटांचा खच पडला
India on US bombing of Iranian school: अमेरिकेनं 'टॉमहॉक' मिसाईल डागत 7 ते 12 वयोगटातील 165 हून अधिक चिमुरड्या शाळकरी मुली मारून टाकल्या; भारतानं पहिल्यांदाच भूमिका स्पष्ट केली
अमेरिकेनं 'टॉमहॉक' मिसाईल डागत 7 ते 12 वयोगटातील 165 हून अधिक चिमुरड्या शाळकरी मुली मारून टाकल्या; भारतानं पहिल्यांदाच भूमिका स्पष्ट केली
USS Abraham Lincoln: जगाला धडकी भरवणाऱ्या अमेरिकेच्या अब्राहम लिंकन अण्वस्त्रवाहू युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला? घरवापसी करत असल्याचा दावा, इराकमध्ये लष्करी विमान कोसळलं
जगाला धडकी भरवणाऱ्या अमेरिकेच्या अब्राहम लिंकन अण्वस्त्रवाहू युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला? घरवापसी करत असल्याचा दावा, इराकमध्ये लष्करी विमान कोसळलं
Donald Trump on Israel Iran War: इराणचे आज काय हाल होईल, फक्त बघा...; डोनाल्ड ट्रम्प यांची नवीन धमकी, आखाती देशात धडकी, नेमकं काय काय घडतंय?
इराणचे आज काय हाल होईल, फक्त बघा...; डोनाल्ड ट्रम्प यांची नवीन धमकी, आखाती देशात धडकी, नेमकं काय काय घडतंय?
अमेरिकेची आता सर्व देशांना रशियन तेल खरेदी करण्याची 30 दिवसांची 'तात्पुरती परवानगी'; चार वर्षात प्रथमच कच्च्या तेलाचा भाव 100 डॉलर्सच्या पार
अमेरिकेची आता सर्व देशांना रशियन तेल खरेदी करण्याची 30 दिवसांची 'तात्पुरती परवानगी'; चार वर्षात प्रथमच कच्च्या तेलाचा भाव 100 डॉलर्सच्या पार
Deepika Padukone Concern Over Mumbai Air Quality: 'शहरातली लहान मुलं गुदमरतायत...'; मुंबईतल्या वाढत्या प्रदुषणानं दीपिका पादुकोणची धडधड वाढली, BMC ला आवाहन करत म्हणाली...
'शहरातली लहान मुलं गुदमरतायत...'; मुंबईतल्या वाढत्या प्रदुषणानं दीपिका पादुकोणची धडधड वाढली, BMC ला आवाहन करत म्हणाली...
Stock Market Today: शेअर बाजारात घसरगुंडी सुरूच; सेन्सेक्स 645 अंकांनी कोसळला, निफ्टीतही घसरण, गुंतवणूकदारांना मोठा झटका
शेअर बाजारात घसरगुंडी सुरूच; सेन्सेक्स 645 अंकांनी कोसळला, निफ्टीतही घसरण, गुंतवणूकदारांना मोठा झटका
Embed widget