समीर वानखेडे प्रकरणात रामदास आठवलेंची एन्ट्री, म्हणाले, 'पिक्चर में मेरा रोल अभी बाकी'!
Ramdas Athawale : नवाब मलिक दररोज समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत आहेत. क्रांती रेडकर यांनी मला सर्व कागदपत्रं दाखवली. कागदपत्र अधिकृत आहेत.
Ramdas Athawale : मुंबई ड्रग्ज प्रकरणानंतर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. समीर वानखेडे यांच्यावर बोगस जातप्रमाणपत्राच्या आधारावर नोकरी मिळवल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला. नवाब मलिकांच्या आरोपांची मालिका सुरु असतानाच समीर वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर आणि वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली. या भेटीनंतर रामदास आठवले यांनी नवाब मलिक यांच्यावर टीकास्त्र सोडलं. समीर वानखेडे यांच्या केसाला धक्का लागणार नाही, आमची पार्टी त्यांच्यासोबत आहे, असं अश्वासन यावेळी रामदास आठवले यांनी दिलं. नवाब मलिक म्हणतात पिक्चर अजून बाकी आहे. पण या पिक्चरमध्ये माझा रोल बाकी आहे, असं रामदास आठवले पत्रकार परिषदेत म्हणाले.
नवाब मलिक दररोज समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत आहेत. क्रांती रेडकर यांनी मला सर्व कागदपत्रं दाखवली. कागदपत्र अधिकृत आहेत. वानखेडे कुटुंबीय बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी आहेत. समीर वानखेडेंविरोधात मोठं षडयंत्र रचलं जात आहे. जर तुमचे काही आरोप असतील तर कोर्टात जा. जावयावरील कारवाईमुळे मलिकांकडून आरोप करण्यात येत आहेत. मलिकांसाठी आमच्याकडे वेळ नाही, असे रामदास आठवले म्हणाले.
आर्यन खान याने ड्रग्स घेतले नव्हते तर मग कोर्टाने 22 दिवस जमीन का दिला नाही? असा सवाल यावेळी नवाब मलिक यांनी उपस्थित केला. तसेच पंच प्रभाकर साईल याला पैसे देऊन वानखेडेंविरोधात उभं केल्याचा आमचा आरोप असल्याचं आठवले म्हणाले. समीर वानखेडे यांची बाजू घेताना आठवले म्हणाले की, समीर वानखेडे यांच्याविरोधात मोठं षडयंत्र रचलं जातेय. त्यांच्यावर अन्याय होता कामा नये. समीर वानखेडे यांना पैसे घ्यायचे असते तर मग त्यानी 19 जणांना अटक केली नसती. समीर वानखेडे यांच्या केसाला धक्का लागणार नाही, आमची पार्टी त्यांच्यासोबत आहे. नवाब मलिक म्हणतात, यांना भेटणं योग्य नाही त्यांना मला सांगयच की माझं भाग्य आहे की हे सगळे माझ्याकडे आलेत. नवाब मलिक जरी माझ्या घरी आले त्याना सुद्धा मी भेटेल असं आठवले यांनी यावेळी सांगितलं.
यावेळी पत्रकार परिषदेत समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, 'कोणाचा नवरा कोण आहे? हे नवाब मलिक याना काय करायचं आहे. त्यांना पार्न्सल लाइफमध्ये काय करायचं आहे.' नवाब मलिक यांच्या आरोपांना उत्तर देताना क्रांती रेडकर यांना राग अनावर झाला होता. त्या म्हणाल्या की, 'नवाब मलिक यांना माणुसकी नाही. आता पाणी डोक्यावरून जातंय. आम्ही आठवले यांच्याशी भेटलो हे जर दुर्दैव असेल तर आम्ही जायचं कुठे. आठवले यांना आम्ही सगळं पुरावे दाखवले आहेत. त्यांना विश्वास बसलाय. प्लिज डोळे उघडा. आम्ही सगळे खरे डॉक्युमेंट दाखवतोत. आता तुम्हाला कळेल समीर वानखेडे फ्रॉड आहेत की नवाब मलिक.'
यावेळी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांना इशारा दिला. ते म्हणाले की, भंगारवाला माणूस कोटी रुपये कसा कमावतो ? याची सुद्धा चौकशी व्हायला हवी. आता जर नवाब मलिक यांनी माझ्यावर सुनेवर, मुलावर, मुलीवर आरोप केले तर मी अब्रुनुकसानीचा दावा करणार आहे.