राकेश टीकैत यवतमाळच्या महापंचायतमध्ये सहभागी होणार नाहीत, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
किसान महापंचायतसाठी काही शेतकरी नेते वेगवेगळ्या राज्यातून आज बुट्टीबोरी येथून येणार होते. आता महापंचायतीला यायचं की नाही याबाबत आज सकाळी निर्णय घेणार आहेत.

यवतमाळ : शेतकरी नेते राकेश टीकैत यवतमाळच्या महापंचायतमध्ये सहभाही होण्यासाठी येणार होते. मात्र कोरोनाचं वाढतं संक्रमण लक्षात घेत ते आता येणार नाहीत अशी माहिती. संयुक्त किसान मोर्चाचे नेते संदीप गिड्डे यांनी दिली आहे. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सुद्धा राकेश टिकेत यांची चर्चा झाली.
आज राकेश टिकैत यवतमाळच्या महापंचायत सभेसाठी येणार होते मात्र जिल्हा प्रशासनाने कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याने त्यांच्या सभेस परवानगी नाकारली होती. प्रशासनाने परवानगी नाकारली तरी आयोजक सभा घेण्याच्या निर्णयावर ठाम होते. दरम्यान काल सायंकाळी राकेश टिकैत यांना कोणीतरी फेक कॉल करत यवतमाळ पोलीस अधीक्षक बोलतो म्हणून सांगून कोरोना संसर्ग वाढतोय असे सांगून आपण यवतमाळमध्ये आल्यास 14 दिवस क्वॉरंटाईन व्हावं लागेल असं सांगितलं. असं झाल्यास गाझीपूर येथील आंदोलनवर परिणाम होऊ शकतो या सर्वांचा सारासार विचार करत असतांनाच राकेश टिकैत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीं चर्चा केली आणि कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता त्यांनी ही महापंचायत पुढे ढकलावी असं सुचवलं.
राकेश टिकैत यांची गाझीपूर सीमेवर गांधीगिरी, जिथं सरकारनं ठोकले खिळे तिथेच..
त्यामुळे राकेश टिकैत यांनी यवतमाळच्या महापंचायतला न जाण्याचा निर्णय घेतला असं संदीप गिड्डे यांनी सांगितले. किसान महापंचायतसाठी काही शेतकरी नेते वेगवेगळ्या राज्यातून आज बुट्टीबोरी येथून येणार होते. मात्र आता यवतमाळच्या महापंचायतसाठी यायचे की नाही हे आज सकाळी 10 वाजता नागपूरच्या बुट्टीबोरी येथे निर्णय घेणार आहेत, असेही संदीप गुड्डे यांनी सांगितले.
शेतकरी आंदोलन: जेव्हा राकेश टिकैत 92 वर्षीय शेतकऱ्याला खांद्यावर उचलून घेतात..
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
