एक्स्प्लोर

शेतकरी आंदोलन: जेव्हा राकेश टिकैत 92 वर्षीय शेतकऱ्याला खांद्यावर उचलून घेतात..

या फोटोत शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी 92 वर्षीय सेवा चंद बालयान यांना आपल्या खांद्यावर घेतलेलं आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्ली सीमेवर गेल्या 70 दिवसांहून अधिक काळ शेतकरी आंदोलन सुरू आहे. दरम्यान, भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत त्यांनी 92 वर्षीय सेवा चंद बालयान यांना आपल्या खांद्यावर घेतलं आहे. गाझीपूर सीमेवरूल हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. सेवाचंद बालयान हे मुझफ्फरनगरमधील असून त्यांनी शेतकरी आंदोलनात भाग घेतला आहे.

सेवाचंद बालयान यांचा राकेश टिकैत यांना आशीर्वाद

शेतकरी आंदोलन: जेव्हा राकेश टिकैत 92 वर्षीय शेतकऱ्याला खांद्यावर उचलून घेतात.. गाझीपूर सीमेवर भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी शेतकऱ्यांना आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी एक नवीन सूत्र दिले आहे. टिकैत म्हणाले की, प्रत्येक गावातून एका ट्रॅक्टरवर 15 माणसे 10 दिवसांचा वेळ घेऊन यावेत. अशा प्रकारे प्रत्येक शेतकरी या आंदोलनात सहभागी होईल आणि नंतर गावात परत जाऊन शेतीही करेल.

शेतकरी संघटनांचे नेते सरकारशी चर्चा करण्यासाठी नेहमीच तयार आहेत. मात्र, सरकारला चर्चा करायची नाहीय. सरकार या आंदोलनाला दीर्घकाळ चालू देण्याच्या मनस्थितीत नाही. मात्र, आपल्याला हे आंदोलन दीर्घकाळ चालवायचे आहे. त्यामुळं शेतकऱ्यांसाठी हा फॉर्म्युला आहे. यामुळं प्रत्येक शेतकरी हा आंदोलनात सहभाग घेईल आणि आंदोलन दीर्घकाळ चालू शकेल, असं टिकैत यांनी म्हटलं आहे.

Farmer Protest : 'एक ट्रॅक्टर, 15 शेतकरी, 10 दिवस!', आंदोलन दीर्घकाळ चालवण्यासाठी राकेश टिकैत यांचा नवा फॉर्म्युला

या सूत्रानुसार, गावांमधील लोकं आंदोलनात जास्तीत जास्त येतील. प्रत्येक गावातून 15 शेतकरी 10 दिवसांसाठी येतील. त्यानंतर दुसऱ्या 15 लोकांचा समूह येईल. त्यानंतर आधीपासून आंदोलनात असलेले शेतकरी आपल्या गावी जाऊन शेती करु शकतील, असं टिकैत म्हणाले.

कंगना रनौत देशप्रेमी आणि शेतकरी देशद्रोही? शिवसेना खासदार संजय राऊत यांचा केंद्रावर हल्लाबोल

सरकारसोबतच्या बैठका निष्फळ केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमधील 11 फेऱ्यांमध्ये बैठका झाल्या आहेत. मात्र, सर्व बैठका निष्फळ ठरल्या आहेत. शेतकऱ्यांनी सरकारची ऑफर नाकारली आहे. तीनही कृषी कायदे रद्द करावे या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. तर, पंतप्रधान मोदी म्हणाले की शेतकरी त्यांच्यापासून फक्त एक फोन कॉल दूर आहे.

महत्त्वाच्या बातम्या

चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण

Embed widget