एक्स्प्लोर

विखे पाटील अंतरवाली सराटीत दाखल, जरांगे पाटलांची घेतली भेट, बंद दाराआड दोघांमध्ये चर्चा सुरु

मराठा उप समितीचे अध्यक्ष आणि राज्याचे  राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil ) यांनी आज मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांची भेट घेतली.

Radhakrishna Vikhe Patil met Manoj jarange Patil : मराठा उप समितीचे अध्यक्ष आणि राज्याचे  राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil ) यांनी आज मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांची भेट घेतली. यासाठी ते अंतरवाली सराटीत दाखल झाले आहे. 2 सप्टेंबरला मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या शासन निर्णयावर दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. एकीकडे राज्यभरामध्ये ओबीसी समाज मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या जीआरला विरोध करत असताना दुसरीकडे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील हे मनोज जरांगे यांच्या भेटीला अंतरवाली सराटीत दाखल झाल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. 

 राधाकृष्ण विखे पाटील आणि मनोज जरांगे पाटलांमध्ये नेमकी काय होणार चर्चा?

दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील आणि मनोज जरांगे पाटील या दोघांच्या भेटीमध्ये नक्की काय चर्चा होती हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण केलं होतं. यानंतर सरकारनं त्यांच्या काही मागण्या मान्य केल्या होत्या. त्यानंतर जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले होते. उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यावेळी देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी रुग्णालयात जरांगे पाटीलयांची भेट घेऊन तब्बेतीची विचारपूस केली होती. मिळालेल्या माहितीनुसार राधाकृष्ण विखे पाटील आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये पंधरा मिनिटांपासून बंद दाराआड चर्चा सुरु आहे. 

दोघांमध्ये सव्वा तास बंद दाराआड चर्चा

मराठा उप समितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज अंतरवाली सरायटीमध्ये जाऊन मनोज रंगे यांची भेट घेतली यावेळी दोघांनी एकमेकांचा सत्कार केला जवळपास सव्वा तास दोघांमध्ये बंद दारावर चर्चा झाली. ही व्यक्तिगत भेट असून त्यांच्या तब्येतीची आपण विचारपूस केली असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. 2 सप्टेंबरच्या जीआर बाबत न्यायालयाने स्थगिती दिली नसून, उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वांनी मान्य केला पाहिजे असे म्हणत ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागत नाही त्यामुळे याची प्रक्रिया पुढे जाऊ द्या असा आवाहन विखे पाटील यांनी ओबीसी नेत्यांना केले आहे. 1994 ला शरद पवार साहेबांनी मंडल आयोगाची अंमलबजावणी  करताना समाजाचा समावेश केला असता तर हा प्रश्न आला नसता, असेही विखे पाटील म्हणाले आहेत. 
दरम्यान आज सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार असल्याचा आरोप देखील विखे पाटील यांनी यावेळी केला. हैदराबाद गॅझिटिअरच्या जीआर संदर्भामध्ये प्रकरण न्यायालयात असताना, गावी दाखल करून मोर्चे काढणे योग्य नाही, असं देखील विखे पाटील ओबीसी नेत्यांना उद्देशून बोलले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

Laxman Hake on Manoj Jarange : मनोज जरांगे बावळट अन् मूर्ख, कुठून शोधलं दिवटं? जरांगेंनी पाचवीला ॲडमिशन घ्यावं लक्ष्मण हाकेंचा जोरदार हल्लाबोल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ajit Pawar : तोंडी परीक्षा, उमेदवारीची प्रतीक्षा, इच्छुकांवर प्रश्नांची सरबत्ती Special Report
Shivaji Park Sabha:शिवाजीपार्कसाठी रस्सीखेच,शिवाजी पार्क मैदानावर कुणाचा आवाज घुमणार? Special Report
Latur News : विम्याच्या पैशासाठी स्वत:च्या मृत्यूचा बनाव, वद्धाच्या जीववर बेतला Special Report
Manrega Name Change : मनरेगा, 'जी राम जी' मध्ये फरक काय? विरोधकांचा गदारोळ Special Report
Mahapalika Mahasangram Akola : अकोल्यात पालिका निवडणुकीत कोणते मुद्दे महत्त्वाचे ठरणार?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
Prithviraj Chavan VIDEO: राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
Girish Mahajan: साधू महंतांना गांजा प्यायला सरकार पैसे देते हे बोलणं चूक, एकही अवाक्षर खपवून घेणार नाही: गिरीश महाजन
साधू महंतांना गांजा प्यायला सरकार पैसे देते हे बोलणं चूक, एक अवाक्षरही खपवून घेणार नाही: गिरीश महाजन
Embed widget