एक्स्प्लोर

पुण्यातील मूकबधिरांचं आंदोलन मागे, राज्यमंत्री दिलीप कांबळेंकडून मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन

मूकबधिरांच्या उच्च शिक्षणासाठी पाच विभागात उच्च माध्यमिक विद्यालय सुरु करण्यात आले आहेत. लातूर, नाशिक विभागात उच्च माध्यमिक विद्यालय सुरु करण्यासंदर्भात निर्देश देण्यात आले आहेत.

पुणे : मूकबधिर आंदोलकांच्या मागण्यांवर सहमती झाल्याने अखेर पुण्यात सुरु असलेलं मूकबधिरांचं आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. राज्य सरकारने सभागृहात काही मागण्या मान्य केल्याचं लेखी आश्वासन दिलं आहे. तसेच उर्वरित मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीनंतर पूर्ण करणार असल्याचं आश्वासनही देण्यात आलं आहे. शासनाच्या वतीने सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आंदोलकांशी संवाद साधला. गेल्या दोन दिवसांपासून मूकबधिर आंदोलक पुण्यातील समाज कल्याण आयुक्तालयासमोर आंदोलनाला बसले होते. आंदोलक तरुणांवर लाठीचार्ज करुन पोलिसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. रात्रीपर्यंत आंदोलक उपाशी पोटी बसून होते. या प्रकाराचा सर्वच स्तरातून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला होता. सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी आज विधिमंडळात कर्णबधिरांच्या मागण्यांसंदर्भात निवेदन सादर केलं. त्यानंतर दिलीप कांबळे यांनी आंदोलकांना त्या मागण्या मान्य झाल्याचं निवेदन वाचून दाखवलं. संघर्ष संपला नाही, पण ही चांगली सुरुवात आहे असं सांगून हे आंदोलन मागे घेण्यात आलं. हे आंदोलक आता आपापल्या घरी जाणार आहेत. पण येत्या काळात जर उर्वरित मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिला. कोणकोणत्या मागण्यांवर सहमती? मूकबधिरांच्या उच्च शिक्षणासाठी पाच विभागात उच्च माध्यमिक विद्यालय सुरु करण्यात आले आहेत. लातूर, नाशिक विभागात उच्च माध्यमिक विद्यालय सुरु करण्यासंदर्भात निर्देश देण्यात आले आहेत. सामान्य शासकीय शाळांमध्ये सांकेतिक भाषातज्ज्ञांची नियुक्ती करण्यात येण्याचं आश्वासन देण्यात आलं. प्रत्येक जिल्ह्यातील दोन औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधे सांकेतिक भाषातज्ज्ञांची नियुक्ती करण्यात येईल. सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पात्र ठरवलेल्या मूकबधिरांना वाहन चालक परवाना देण्यात येईल. शासकीय नोकरीत मूकबधिर प्रवर्गात नियुक्त झालेल्या उमेदवारांची बेरा तपासणी करण्यासंदर्भात आठ दिवसांत परिपत्रक काढण्यात येणार आहे. मूकबधिर आंदोलकांच्या उर्वरित मागण्यांवर अधिवेशन संपण्यापूर्वी म्हणजेच आठ दिवसांत निर्णय घेण्यात येईल. 28 तारखेला मुख्यमंत्र्यांसोबत कर्णबधिर असोसिएशनच्या प्रतिनिधींची बैठक होणार आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल कर्णबधिर आंदोलकांची भेट घेतली होती. मूकबधिर आंदोलकांवर लाठीचार्ज केल्यामुळे सुप्रिया सुळे आणि राज ठाकरे या दोघांनीही राज्य सरकारवर ताशेरे ओढले होते. तरुणांवर झालेल्या हल्ल्याबाबत सखोल अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी पुणे पोलिस आयुक्तांना दिले आहेत. सुरुवातीला आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे नोंदवले होते, मात्र फडणवीसांच्या आदेशानंतर हे गुन्हे मागे घेण्यात आले. पुण्यातील मूकबधिरांचं आंदोलन मागे, राज्यमंत्री दिलीप कांबळेंकडून मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी, राज्य सरकारकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अन् पदोन्नती, सूरज मांढरे कृषी विभागाचे नवे आयुक्त
मोठी बातमी, राज्य सरकारकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अन् पदोन्नती, सूरज मांढरे कृषी विभागाचे नवे आयुक्त
Walmik Karad : दोन्ही बाजूनं 30 मिनिटं जोरदार युक्तिवाद,केज कोर्टात काय घडलं? सरकारी वकील अन् कराडांचे वकील काय म्हणाले?
खंडणीच्या तक्रारीत 2 कोटींचा उल्लेखचं नाही, वाल्मिक कराडांच्या वकिलांचा कोर्टात कोणता युक्तिवाद?
New Year 2025 Wishes : नवीन वर्षाच्या प्रिय व्यक्तींना द्या 'या' हटके शुभेच्छा; पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश
नवीन वर्षाच्या प्रिय व्यक्तींना द्या 'या' हटके शुभेच्छा; पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश
पर्यटकांचा कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईतील पर्यटकांनी स्थनिकांना केली मारहाण, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात
पर्यटकांचा कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईतील पर्यटकांनी स्थनिकांना केली मारहाण, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Police Custody : कराड गजाआड! पोलीस कोठडीनंतर वाल्मिकच्या वकिलांची मोठी प्रतिक्रियाWelcome 2025 : वेलकम 2025, नव्या वर्षाचं उत्साहात स्वागत, उत्साह शिगेलाRajikya Shole Special Report Walmik Karad : वाल्मिक कराड शरण, A टू Z घटनाक्रम काय?Rajikya Shole Special Report on Walmik Karad : वाल्मिक कराडची शरणागती, विरोधकांचा संशय कुणावर?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी, राज्य सरकारकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अन् पदोन्नती, सूरज मांढरे कृषी विभागाचे नवे आयुक्त
मोठी बातमी, राज्य सरकारकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अन् पदोन्नती, सूरज मांढरे कृषी विभागाचे नवे आयुक्त
Walmik Karad : दोन्ही बाजूनं 30 मिनिटं जोरदार युक्तिवाद,केज कोर्टात काय घडलं? सरकारी वकील अन् कराडांचे वकील काय म्हणाले?
खंडणीच्या तक्रारीत 2 कोटींचा उल्लेखचं नाही, वाल्मिक कराडांच्या वकिलांचा कोर्टात कोणता युक्तिवाद?
New Year 2025 Wishes : नवीन वर्षाच्या प्रिय व्यक्तींना द्या 'या' हटके शुभेच्छा; पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश
नवीन वर्षाच्या प्रिय व्यक्तींना द्या 'या' हटके शुभेच्छा; पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश
पर्यटकांचा कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईतील पर्यटकांनी स्थनिकांना केली मारहाण, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात
पर्यटकांचा कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईतील पर्यटकांनी स्थनिकांना केली मारहाण, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात
वाल्मिक अण्णा उज्जैनला होते, तिथून चाकू फेकून हाणला काय? कराडच्या हाडाच्या कार्यकर्त्याचा सवाल
वाल्मिक अण्णा उज्जैनला होते, तिथून चाकू फेकून हाणला काय? कराडच्या हाडाच्या कार्यकर्त्याचा सवाल
IPO Update : यूनिमेक एअरोस्पेसनं शेवट गोड केला, 85 टक्के प्रीमियमसह लिस्ट, गुंतवणूकदारांचं लक्ष इंडो फार्मच्या आयपीओकडे, GMP कितीवर?
यूनिमेक एअरोस्पेसचा आयपीओ 85 टक्के प्रीमियमसह लिस्ट, इंडो फार्मचा IPO पहिल्याच दिवशी 17 पट सबस्क्राइब, GMP कितीवर?
चिमण्या 'कोंबड्यावर जडला जीव', चिकन खाणंही सोडलं; 31 डिसेंबर दिवशीच साजरा झाला 5 वा बर्थ डे
चिमण्या 'कोंबड्यावर जडला जीव', चिकन खाणंही सोडलं; 31 डिसेंबर दिवशीच साजरा झाला 5 वा बर्थ डे
सूर्यास्त रोजचाच, पण आज जरा वेगळा; 2024 चा ढलता सूरज धीर धीरे, भावूक क्षण  कॅमेऱ्यात कैद
सूर्यास्त रोजचाच, पण आज जरा वेगळा; 2024 चा ढलता सूरज धीर धीरे, भावूक क्षण कॅमेऱ्यात कैद
Embed widget