एक्स्प्लोर

पुणे, लातूरमधील 14 नगरपालिकांसाठी आज मतदान

पुणे : नगरपालिकांच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांचं आज मतदान होत आहे. यामध्ये पुण्यातील 10 आणि लातूरमधील 4 नगरपालिकांचा समावेश आहे. त्यामुळे पुण्याच्या बालेकिल्ल्यात अस्तित्व टिकवण्यासाठी राष्ट्रवादीला चांगलाच जोर लावाला लागेल. बारामती म्हणजे पवार घराण्याचा बालेकिल्ला. पुण्यात पिछेहाट झाल्यास भविष्यात राष्ट्रवादीवर मोठा परिणाम पाहायला मिळू शकतो. 39 सदस्यीय नगरपालिकेत बहुमत मिळविण्याबरोबरच नगराध्यक्ष निवडून आणण्याचे आव्हान अजित पवार यांच्यासमोर आहे. पहिल्या टप्प्यातील 164 नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची पीछेहाट झाली. नगराध्यक्षपदांमध्ये राष्ट्रवादी चौथ्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे औरंगाबादमध्येही महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी आज निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी अर्ज भरले असल्यामुळे महापौर आणि उपमहापौर पदासाठी कोण बाजी मारणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. पहिल्या टप्प्यात काय? पहिल्या टप्प्यात झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळालं. तब्बल 31 नगरपालिका जिंकून भाजपनं मिनी विधानसभेत आघाडी घेतली आहे. सोबतच 52 ठिकाणी भाजपचे थेट नगराध्यक्षही निवडून आले आहेत. नगरपालिकेसाठी भाजपने आखलेली रणनीती पूर्णपणे यशस्वी झाल्याचं मानलं जात आहे. 27 नोव्हेंबर रोजी 147 नगरपरिषदा आणि 18 नगरपंचायतीसाठी एकूण 165 ठिकाणी मतदान पार पडलं. भाजपपाठोपाठ 20 नगरपालिका जिंकत काँग्रेसनं दुसऱ्या क्रमांकावर बाजी मारली आहे. काँग्रेसचेही 22 ठिकाणी थेट नगराध्यक्ष निवडून आले आहेत. तर राष्ट्रवादी 17 नगरपालिकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. शिवसेना 16 नगरपालिकांसह शेवटच्या नंबरवर आहे. विशेष म्हणजे यावेळी स्थानिक आघाड्यांनाही बऱ्यापैकी यश मिळालं आहे. कारण त्यांचीही 25 नगरपालिकांवर सद्दी असणार आहे. तर त्रिशंकू अवस्थेतील नगरपालिकांची संख्या तब्बल 34 आहे. नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत शिवसेना 25 जागांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर काँग्रेसचे 22 नगरपालिकांमध्ये नगराध्यक्ष निवडून आले आहेत. नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीचा सर्वात मोठा फटका राष्ट्रवादीला बसला आहे. आतापर्यंत 17 ठिकाणी राष्ट्रवादीला यश मिळालं आहे, तर 25 नगरपालिकांचं नगराध्यक्षपद हे इतर पक्ष आणि अपक्षांकडे गेलं आहे.

146 पालिकांमध्ये सत्ता कोणाची

भाजप - 31 काँग्रेस - 20 राष्ट्रवादी - 17 शिवसेना - 16 स्थानिक आघाडी - 25 त्रिशंकू- 34 शेकाप -2 भारिप- 1
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
PM Modi: सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
Advertisement
metaverse

व्हिडीओ

PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामनाCM Eknath Shinde, Devendra Fadnavs आणि अजित पवार यांची 'वर्षा' बंंगल्यावर बैठकABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 26 June 2024Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 07 AM: 25 June 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
PM Modi: सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
Embed widget