एक्स्प्लोर

दुष्काळाशी सामना करण्यासाठी 3 हजार कोटींची तरतूद

दुष्काळावर उपाययोजनांसाठी यापूर्वी 736 कोटी रुपयांची तरतूद केली असून पुरवणी मागण्यांद्वारे 2 हजार 263 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तसेच याच महिन्यात राज्य शासनाने केंद्र शासनाकडे 7 हजार 522 कोटी रुपयांचा मदतीचा प्रस्ताव पाठविला आहे.

मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासन सज्ज आहे. पिण्यासाठी पाणी, पशूधनासाठी पाणी व चारा, रोजगार हमी योजनेची कामे, सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत दुष्काळग्रस्तांना धान्यपुरवठा आदी सर्व उपाययोजनांच्या माध्यमातून शासन दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. दुष्काळाबाबतच्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. राज्य शासनाने अत्यंत योग्य वेळेत दुष्काळ जाहीर केला आहे. पूर्वी नजर आणेवारी आणि पीक कापणी प्रयोगानुसार दुष्काळ जाहीर केला जात असे. मात्र, आता केंद्र शासनाची नवीन दुष्काळ संहिता राज्यावर बंधनकारक आहे. त्यानुसार जून व जुलै महिन्यात सरासरीच्या 50 टक्केपेक्षा कमी आणि संपूर्ण मान्सून कालावधीत सरासरीच्या 75 टक्केपेक्षा कमी पाऊस झाल्यास तेथे आपोआप दुष्काळाचा ट्रीगर-1 लागू होतो. पर्जन्यमानात 3 ते 4 आठवड्याचा खंड, वनस्पती स्थितीशी निगडीत निर्देशांक, जलविषयक निर्देशांक, भूजल पातळी, जमिनीतील आर्द्रता, पीक कापणी प्रयोग आदी निर्देशांकानुसार ट्रीगर-2 लागू झाला आहे. जुलै अखेर 85 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस असल्यास दुष्काळस्थिती तर 75 टक्क्यांपेक्षा कमी असल्यास  तीव्र दुष्काळ जाहीर केला जातो. त्यानुसार राज्य शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. त्यानंतर दुष्काळ जाहीर केलेल्या महसुली मंडळांची अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पहाणी (ग्राउंड ट्रुथींग) केली गेली. त्यानुसार त्यात आणखी काही महसुली मंडळे समाविष्ट झाली. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, अजूनही काही  तालुक्यांची दुष्काळामध्ये समाविष्ट करण्याची  मागणी असून त्याबाबत विचार करण्यासाठी उपसमिती स्थापन केली आहे. मागणी असलेल्या भागातील पीक कापणी प्रयोगांची पुनर्तपासणी आणि 35 टक्केपेक्षा जास्त किंवा 50 टक्केपेक्षा जास्त नुकसान या निकषांमध्ये  बसत असल्यास संबंधित तालुका किंवा महसूल मंडळामध्ये मध्यम किंवा तीव्र दुष्काळ जाहीर करण्याचे अधिकार या उपसमितीला दिले आहेत. दुष्काळ जाहीर करतानाच जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती आदी आठ सवलती तात्काळ लागू केल्या. दुष्काळामुळे बाधित शेतकरी 82 लाख 27 हजार 166 इतके असून बाधित जिरायत, बागायत आणि बहुवार्षिक पिकाचे एकूण क्षेत्र 85 लाख 76 हजार 367  हेक्टर इतके आहे. तसेच भविष्यात अधिक पडताळणी केल्यानंतर यामध्ये वाढ होऊ शकते. दुष्काळ जाहीर केलेल्या भागातील उपलब्ध पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्यात येईल. आवश्यक तेथे टँकरने पाणीपुरवठा करण्यात येईल. रेशनकार्ड नसलेल्यांना रेशनकार्ड उपलब्ध करुन देऊन धान्यपुरवठा करण्यात येईल. तसेच दुष्काळी भागातील शालेय  मुलांसाठी उन्हाळी सुट्टयांमध्येही मध्यान्ह भोजन योजना राबविण्यात येईल. दुष्काळावर उपाययोजनांसाठी यापूर्वी 736 कोटी रुपयांची तरतूद केली असून पुरवणी मागण्यांद्वारे 2 हजार 263 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तसेच याच महिन्यात राज्य शासनाने केंद्र शासनाकडे 7 हजार 522 कोटी रुपयांचा मदतीचा प्रस्ताव पाठविला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut :शिंदे गटाचा दसरा मेळावा सुरत किंवा गुवाहाटीत व्हायला हवा, संजय राऊतांची बोचरी टीका
शिंदे गटाचा दसरा मेळावा सुरत किंवा गुवाहाटीत व्हायला हवा, संजय राऊतांची बोचरी टीका
Maharashtra Weather Alert: मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील या जिल्ह्यांना यलो अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज, पुढील दोन दिवस..
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील या जिल्ह्यांना यलो अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज, पुढील दोन दिवस..
Sharad Pawar : शरद पवारांचा व्हिडीओ व्हायरल, अहमदनगरमध्ये मुस्लीम समुदायाच्या गराड्यातून मागणी,
शरद पवारांचा व्हिडीओ व्हायरल, अहमदनगरमध्ये मुस्लीम समुदायाच्या गराड्यातून मागणी, "अहिल्यानगर नको अहमदनगर हवं"
PM Kisan Scheme : अखेर प्रतीक्षा संपणार, 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचे 20 हजार कोटी येणार, मोदी स्वत: महाराष्ट्राच्या दौऱ्यावर
पीएम किसानचे 2 हजार पाच दिवसात मिळणार, मोदींच्या हस्ते महाराष्ट्रात होणार 18 व्या हप्त्याचा वितरण सोहळा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narhari Zirwal : धनगर समाज आदिवासीत येत नाही; सरकारने जबाबदारी स्वीकारावी - नरहरी झिरवाळSupriya Sule on Nitin Gadkari :  नितीन गडकरींच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंचा प्रतिटोलाRamdas Kadam : आदित्य ठाकरे बेईमान, माझ्याकडून शिकला आणि मलाच बाजूला केलंABP Majha Headlines :  11 AM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut :शिंदे गटाचा दसरा मेळावा सुरत किंवा गुवाहाटीत व्हायला हवा, संजय राऊतांची बोचरी टीका
शिंदे गटाचा दसरा मेळावा सुरत किंवा गुवाहाटीत व्हायला हवा, संजय राऊतांची बोचरी टीका
Maharashtra Weather Alert: मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील या जिल्ह्यांना यलो अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज, पुढील दोन दिवस..
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील या जिल्ह्यांना यलो अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज, पुढील दोन दिवस..
Sharad Pawar : शरद पवारांचा व्हिडीओ व्हायरल, अहमदनगरमध्ये मुस्लीम समुदायाच्या गराड्यातून मागणी,
शरद पवारांचा व्हिडीओ व्हायरल, अहमदनगरमध्ये मुस्लीम समुदायाच्या गराड्यातून मागणी, "अहिल्यानगर नको अहमदनगर हवं"
PM Kisan Scheme : अखेर प्रतीक्षा संपणार, 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचे 20 हजार कोटी येणार, मोदी स्वत: महाराष्ट्राच्या दौऱ्यावर
पीएम किसानचे 2 हजार पाच दिवसात मिळणार, मोदींच्या हस्ते महाराष्ट्रात होणार 18 व्या हप्त्याचा वितरण सोहळा
Maharashtra School Uniform: धड खिसा नाही, एकाचा हात दुसऱ्या शर्टाला; सरकारने विद्यार्थ्यांना दिलेले गणवेश पाहून विरोधक संतापले
धड खिसा नाही, एकाचा हात दुसऱ्या शर्टाला; सरकारने विद्यार्थ्यांना दिलेले गणवेश पाहून विरोधक संतापले
MHADA: म्हाडाच्या दोन घरांसाठी 27 मराठी कलाकारांचे अर्ज , संस्कृती बालगुडेचा अर्ज लॉटरी पूर्वीच बाद
म्हाडाच्या दोन घरांसाठी 27 मराठी कलाकारांचे अर्ज , संस्कृती बालगुडेचा अर्ज लॉटरी पूर्वीच बाद
Mumbai Local :मुंबईकरांसाठी मोठी बातमी, सलग पाच दिवस पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल रद्द होणार, जाणून घ्या नेमकं कारण...
मोठी बातमी, पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल 4 ऑक्टोबरपर्यंत रद्द, जाणून घ्या कारण...
Pradosh Vrat 2024 : आज पितृपक्षातील सोम प्रदोष व्रत; आजच्या दिवशी चुकूनही करू नका 'या' गोष्टी, अन्यथा कोसळेल संकटांचा डोंगर
आज पितृपक्षातील सोम प्रदोष व्रत; आजच्या दिवशी चुकूनही करू नका 'या' गोष्टी, अन्यथा कोसळेल संकटांचा डोंगर
Embed widget