Pradosh Vrat 2024 : आज पितृपक्षातील सोम प्रदोष व्रत; आजच्या दिवशी चुकूनही करू नका 'या' गोष्टी, अन्यथा कोसळेल संकटांचा डोंगर
Som Pradosh Vrat 2024 : पितृपक्षातील सोम प्रदोष व्रत अत्यंत कडक मानलं जातं, या दिवशी काही चुका आवर्जून टाळल्या पाहिजे, अन्यथा त्याचे दीर्घ परिणाम भोगावे लागतात.
![Pradosh Vrat 2024 : आज पितृपक्षातील सोम प्रदोष व्रत; आजच्या दिवशी चुकूनही करू नका 'या' गोष्टी, अन्यथा कोसळेल संकटांचा डोंगर Som Pradosh Vrat 2024 precautions do not do these things on pradosh vrat follow these rules strictly otherwise lord shiva will get angry problems arise Pradosh Vrat 2024 : आज पितृपक्षातील सोम प्रदोष व्रत; आजच्या दिवशी चुकूनही करू नका 'या' गोष्टी, अन्यथा कोसळेल संकटांचा डोंगर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/25/ea8178e248a9cf92617ecbd4d6294a6e1721928695203499_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pradosh Vrat 2024 : हिंदू धर्मात प्रदोष व्रताला फार महत्त्व आहे. हा शुभ दिवस भगवान शंकराला (Lord Shiva) समर्पित आहे. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला हे व्रत पाळलं जातं. सोम प्रदोष व्रतादिवशी (Som Pradosh Vrat 2024) महादेवाची पूजा केल्याने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी धार्मिक मान्यता आहे.
आज, म्हणजेच 30 सप्टेंबर 2024 रोजी पितृ पक्षातील सोम प्रदोष व्रत पाळलं जात आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, या दिवशी काही गोष्टींचं पालन केलं पाहिजे, या दिवशी काही नियम मोडल्यास जीवनात समस्या उद्भवतात. प्रदोष व्रतादिवशी नेमके कोणते नियम पाळावे? जाणून घेऊया.
प्रदोष व्रताच्या दिवशी करू नये 'या' गोष्टी
- प्रदोष व्रताच्या दिवशी कोणालाही शिवीगाळ करू नये. कोणाविषयी वाईट चित्तू नये. प्रदोष व्रताच्या दिवशी शंकराला सिंदूर, हळद, तुळशी आणि नारळाचं पाणी अजिबात अर्पण करू नये. यामुळे या व्रताचा लाभ मिळत नाही,अशी मान्यता आहे.
- प्रदोष व्रताला महिलांनी महादेवाच्या पिंडीला हात लावू नये. असे केल्याने माता पार्वतीच्या क्रोधाला सामोरं जावं लागतं, असं म्हणतात.
- प्रदोष व्रतात तामसिक पदार्थांचं सेवन करू नये. व्रताच्या दिवशी सात्विक राहिल्यास मानसिक शांती लाभते. यामुळे या दिवशी मद्य, मांस, कांदा, लसूण, तामसिक पदार्थांचं सेवन करू नये.
- प्रदोष व्रताच्या दिवशी उशिरापर्यंत झोपू नये, कारण याचा दोष आपल्याला नंतर सहन करावा लागतो.
- उपवास करणाऱ्या व्यक्तीने भात आणि वातळ अन्न खाऊ नये. सकस आणि सात्विक आहार घ्यावा.
- काळा रंग नकारात्मकता आकर्षित करतो, यामुळे प्रदोष व्रतादिवशी काळे वस्त्र परिधान करू नये.
संध्याकाळी 'या' शुभ मुहूर्तावर करा शंकराची पूजा (Pradosh Vrat Shubh Muhurta)
प्रदोष व्रताच्या दिवशी प्रदोष काळातच भगवान शंकराची पूजा केली जाते. प्रदोष काल हा नेहमी सूर्यास्तापूर्वी 45 मिनिटं आणि सूर्यास्तानंतर 45 मिनिटं चालतो. पंचांगानुसार, आज महादेवाच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त संध्याकाळी 6:45 ते 7:34 पर्यंत असणार आहे. या काळात 108 वेळा 'ओम नमः शिवाय' मंत्राचा जप करून महादेवाची पूजा करावी.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)