MHADA: म्हाडाच्या दोन घरांसाठी 27 मराठी कलाकारांचे अर्ज , संस्कृती बालगुडेचा अर्ज लॉटरी पूर्वीच बाद
मुंबईत स्वतःचं घर हवं हे प्रत्येकाचे स्वप्न असते यासाठी अनेक जण महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडाच्या घरांना पसंती देतात.
MHADA flats Marathi actors applications:काही दिवसांपूर्वी म्हाडाने (MHADA) मुंबईतील विविध ठिकाणी 2030 घरांची जाहिरात काढली होती. या घरांसाठी अनेकांनी अर्ज केले असून यात राजकारणी व कलाकारांचाही समावेश आहे . गोरेगावमधील दोन घरांसाठी तब्बल 27 मराठी कलाकारांचे अर्ज आल्याचं सांगण्यात आलं आहे . या कलाकारांमध्ये प्रसिद्ध लेखक व दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी , गौतमी देशपांडे , किशोरी वीज तसेच महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता निखिल बने अशा 27 कलाकारांनी अर्ज केले आहेत .
म्हाडाने पात्र अर्जदारांची एक यादी 27 तारखेला प्रसिद्ध केली होती यात साधारण 13 लाख अर्जांपैकी 500 हून अधिक अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहेत . या अपात्र अर्जांमध्ये लोकप्रिय अभिनेत्री संस्कृती बालगुडेचाही समावेश असल्याचा सांगण्यात आलंय .
गोरेगावच्या दोन घरांसाठी 27 कलाकारांचे अर्ज
म्हाडाच्या गोरेगाव भागातील दोन घरांसाठी 27 मराठी कलाकारांनी अर्ज केले असून कलाकार गटासाठी फक्त दोन घरे आहेत. त्यामुळे कलाकारांच्या अर्जांमध्ये चुरशीची लढत आहे . 27 सप्टेंबर रोजी पात्र अर्जदारांची प्रसिद्ध झालेल्या म्हाडाच्या यादीत एक लाख 13 हजार 235 अर्ज पात्र ठरले आहेत .
कोणत्या कलाकारांनी केले अर्ज?
मुंबईत स्वतःचं घर हवं हे प्रत्येकाचे स्वप्न असते यासाठी अनेक जण महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडाच्या घरांना पसंती देतात. मुंबईतील विविध भागात म्हाडा ने 2030 घरांसाठी जाहिरात काढली होती . यातील गोरेगाव भागातील कलाकार कोट्यातील दोन घरांसाठी 27 मराठी कलाकारांनी अर्ज केलेत .
यामध्ये बिग बॉस मराठी पर्वतींचा विजेता विशाल निकम , लेखक निर्माता निपुण धर्माधिकारी , अभिनेत्री गौतमी देशपांडे , नारायणी शास्त्री ,अभिनेत्री किशोरी विज , रोमा बाली , तनया मालजी , अनिता कुलकर्णी , संचित चौधरी , शेखर नार्वेकर इत्यादी कलाकारांनी घरासाठी अर्ज केले आहेत
संस्कृती बालगुडेचा अर्ज लॉटरी आधीच अपात्र
लोकप्रिय अभिनेत्री संस्कृती बालगुडे हिनही म्हाडाच्या घरासाठी अर्ज केला होता . म्हाडाच्या कलाकार कोटामधून तिने हा अर्ज केला होता पणकलाकार प्रमाणपत्र अवैध ठरल्याने ती अपात्र ठरली . शुक्रवारी पात्र अर्जदारांची याची प्रसिद्ध झाल्यानंतर जे अर्जदार अपात्र ठरले आहेत, त्यांना सूचना-हरकती नोंदविण्यासाठी मंडळाने दोन दिवसांची मुदत दिली आहे. या विहित मुदतीत आलेल्या सूचना-हरकतींचा विचार करून 03 ऑक्टोबर रोजी पात्र अर्जदारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे.
मुंबईतील म्हाडा लॉटरी 2024 साठी 09 ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मुंबई उपनगरांमधील पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर, विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड इ. गृहनिर्माण प्रकल्पामधील विविध उत्पन्न गटातील 2 हजार 30 सदनिका विक्रीसाठी तयार आहेत.