एक्स्प्लोर

थिएटर सुरु करण्याबाबत सकारात्मक, लवकरच चित्र स्पष्ट होईल : अमित देशमुख

राज्यात थिएटर सुरु करण्याबाबत सकारात्मक असून महाराष्ट्र सरकार गांभीर्याने विचार करत आहे. तसेच या संदर्भात लवकरच चित्र स्पष्ट होईल, असं सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सांगितलं आहे.

मुंबई : केंद्रीय गृहमंत्रालयाने अनलॉक 5 अंतर्गत गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. (Unlock 5 Guidelines) अनलॉक पाचमध्ये 15 ऑक्टोबरपासून सिनेमा हॉल, चित्रपटगृह उघड्यास परवानगी दिली आहे. अशातच केंद्र सरकारच्या वतीने आज चित्रपटगृह सुरु करण्यासाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. सिनेमागृह सुरु करण्याबाबत केंद्र सरकारने आज निर्णय घेतला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र सरकार गांभीर्याने विचार करत असल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सांगितलं.

केंद्र सराकारच्या परवानगीनंतर राज्यातील सिनेमागृह कधी सुरु करणार यांसदर्भात विचारल्यानंतर सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख म्हणाले की, 'सिनेमागृह सुरु करण्याबाबत केंद्र सरकारने आज निर्णय घेतला असून आज नियमावलीही जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र सरकार गांभीर्याने विचार करत आहे. नवरात्र, दसरा, दिवाळी हा चित्रपटांसाठी, नाट्यगृहासाठी मौसम असतो, त्यामुळे चित्रपगृह सुरु करण्यासाठी परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे. यासंदर्भात आम्ही सकारात्मक असून लकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत.'

'महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे. त्यामुळे शिथीलता देण्याआधी विचार करू मगच निर्णय घेऊ. गेल्या सहा महिन्यांपासून बंद असल्यामुळे सिनेसृष्टी आणि नाट्यसृष्टी अडचणीत आहे. त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळलं आहे. त्यामुळे त्यांना त्यातून बाहेर कढण गरजेचं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात चित्रपटगृ सुरु होण्यासंदर्भात काही दिवसांतच चित्र स्पष्ट होईल.' असं सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी बोलताना सांगितलं.

पाहा व्हिडीओ : 15 ऑक्टोबरपासून सिनेमागृह पुन्हा सुरु होणार! केंद्र सरकारची नियमावली जाहीर

15 ऑक्टोबरपासून चित्रपटगृह सुरु करण्यास केंद्र सरकारची परवानगी

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनच्या लागू केल्यापासून बंद असलेली चित्रपटगृहे आता लवकरच सुरु होणार आहेत. केंद्र सरकारतर्फे चित्रपटगृहे सुरु करण्यासाठी माहिती व प्रसारण मंत्रालयाद्वारे नियमावली जारी करण्यात आली आहे. त्यानुसार, चित्रपटगृहात सुरुवातीला केवळ 50 टक्केच प्रेक्षकांना उपस्थिती देता येणार आहे. सिनेमा, थेटर्स, मल्टीप्लेक्स टॉकीज 15 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरु करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिल्याचे, माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.

चित्रपटगृह सुरु करण्यासाठी नियमावली :

  • चित्रपटगृहात केवळ 50 टक्के प्रेक्षकांची उपस्थिती बंधनकारक
  • चित्रपट पाहताना आसनव्यवस्थेत फिजिकल डिस्टन्सिंग पाळणं बंधनकारक असणार आहे.
  • आसनव्यवस्था राखीव ठेवू नये
  • प्रेक्षकांना हँडवॉश किंवा हँड सॅनिटायझर पुरवण्यात यावं
  • आरोग्य सेतू अॅपचा वापर करण्याचा सल्ला प्रेक्षकांना देण्यात यावा
  • थर्मल स्क्रिनिंग करावी, केवळ लक्षणं नसलेल्या व्यक्तींनाचा चित्रपटगृहांमध्ये प्रवेश देण्यात यावा
महत्त्वाच्या बातम्या : 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
Ram Mandir : पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Raj Thackeray MNS Meeting : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनसेची आज मुंबई बैठक संपन्न! ABP MajhaMedha Kulkarni On Drugs : पुण्यात ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश, मेधा कुलकर्णींचा धंगेकरांना सवाल!NEET Exam Scam : 'माझा'च्या प्रतिनिधीला 'नीट'चा आरोपी गंगाधरक़डून धमकावण्याचा प्रयत्नMaharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा धावता आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
Ram Mandir : पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
K P Patil : 'मी अजून दिशा बदलली नाही, पण लोकांनी...' के पी. पाटलांनी विधानसभेला शड्डू ठोकला! प्रकाश आबिटकरांवर जोरदार हल्लाबोल
'मी अजून दिशा बदलली नाही, पण लोकांनी...' के पी. पाटलांनी विधानसभेला शड्डू ठोकला! प्रकाश आबिटकरांवर जोरदार हल्लाबोल
चंद्रकांतदादांच्या काळातच पुण्यात हफ्ते वसुली, पब्ज संस्कृतीला उधाण; मिटकरींचे गंभीर आरोप, महायुतीत तणाव?
चंद्रकांतदादांच्या काळातच पुण्यात हफ्ते वसुली, पब्ज संस्कृतीला उधाण; मिटकरींचे गंभीर आरोप, महायुतीत तणाव?
Ahmednagar MLA List : विखे की थोरात, अहमदनगरमध्ये कुणाचं वर्चस्व? पाहा आमदारांची संपूर्ण यादी
Ahmednagar MLA List : विखे की थोरात, अहमदनगरमध्ये कुणाचं वर्चस्व? पाहा आमदारांची संपूर्ण यादी
Embed widget