एक्स्प्लोर
Advertisement
परभणीच्या रँचोकडून पोर्टेबल व्हेंटिलेटर विकसीत; आपत्कालीन परिस्थितीत होणार मदत
कोरोना व्हायरसचं संकट दिवसेंदिवस गडद होताना दिसत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात देशात मोठ्या प्रमाणात व्हेंटिलेटर्सची गरज पडू शकते. या पार्श्वभूमीवर परभणीच्या एका रँचोने पोर्टेबल व्हेंटिलेटर विकसीत केलंय.
परभणी : सध्या जगभरात कोरोना व्हायरसने हौदोस घातलाय. या विषाणुजन्य आजाराची लक्षणही श्वसनाशी निगडित आहेत. त्यामुळे पहिल्यांदा याच्या रुग्णाला आवश्यक आहे ते व्हेंटिलेटर. आता दिवसेंदिवस कोरोना बाधित आणि संशयित असे मिळुन मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढत आहेत. अशा परिस्थितीत आपल्याकडे उपलब्ध व्हेंटिलेटरची संख्या पाहिली तर अत्यंत कमी आहे. हेच जाणून परभणीतील रँचोने घरगुती उपलब्ध वस्तूंपासून पोर्टेबल व्हेंटिलेटर तयार केलंय. आपत्कालीन परिस्थितीत हे अत्यंत उपयुक्त ठरू शकते. प्रशासकीय स्तरावर असे व्हेंटिलेटर्स तयार करण्यात आल्यास मोठी मदत होणार आहे.
राज्यात कोरोनाबधितांची वाढती संख्या सरकारसमोरचं सर्वात मोठं आव्हान आहे. मुंबईसह राज्यभरातील रुग्णालयात या परिस्थितीशी सामना करण्यासाठी व्हेंटिलेटर्सची पुरेशी संख्या अत्यंत गरजेची आहे. मात्र, सध्या व्हेंटिलेटर्सचा मोठा तुटवडा असल्याचा दावा भाजपच्या आमदाराने केला आहे. राज्यात आज घडीला 116 जण कोरोना विषाणूचे संक्रमित आहेत. त्यामुळे आगामी काळात व्हेंटिलेटर्सची मोठ्या प्रमाणात गरज लागणार आहे. हेच जाणून परभणीतील शंकर लंगोटे या इलेट्रॉनिक्स अभियंत्याने घरगुती उपलब्ध वस्तूंपासून पोर्टेबल व्हेंटिलेटर तयार केलं आहे. या व्हेंटिलेटर्सची चाचणी घेणं अजून बाकी आहे. मात्र, या संशोधनाला मान्यता मिळाल्यास त्याची मोठ्या प्रमाणात मदत होईल.
Coronavirus | कोरोना बाधितांना वाचवण्यासाठी महाराष्ट्रात पुरेशी व्हेंटिलेटर्स आहेत का?
कोरोनाबधितांची वाढती संख्या पाहता येत्या काळात आरोग्य यंत्रणांवर प्रचंड ताण येण्याची शक्यता आहे. त्यात सध्या मुंबईसह राज्यभरातील शासकीय आणि खासगी रुग्णालयात साधारण एक हजार व्हेंटिलेटर्स उपबलब्ध असल्याचं आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. मात्र, येणाऱ्या परिस्थितीशी तोंड द्यायला ही संख्या पुरेशी आहे का? हा प्रश्न भाजप आमदार राम कदम यांनी उपस्थित केला आहे.
VIDEO | 'पप्पा, जाऊ नका, बाहेर कोरोना आहे' ड्युटीवर चाललेल्या पोलीस पित्याला चिमुकल्याची आर्त साद
राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील 4 कोरोनाच्या संशयीत रूग्णांच्या स्वॅबचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. याच कुटुंबातील आणखी 5 लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात 2 पुरुष, 2 स्त्रिया आणि एका लहान मुलीचा समावेश आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यात आता कोरोना रुग्णांची संख्या 4 वरून 9 झाली आहे. दुसरीकडे मुंबईत देखील आज चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. सांगलीत समोर आलेल्या अहवालानंतर ते रुग्ण कुणाच्या संपर्कात होते याची तपासणी करण्यात येत आहे. तसेच पुढे घ्यावयाची खबरदारी प्रशासन पूर्णत: घेत आहे. दरम्यान राज्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 116 वर पोहचला आहे.
Parbhani Rancho | परभणीच्या रँचोकडून पोर्टेबल व्हेंटिलेटर विकसीत | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रीडा
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement