एक्स्प्लोर
Coronavirus | कोरोना बाधितांना वाचवण्यासाठी महाराष्ट्रात पुरेशी व्हेंटिलेटर्स आहेत का?
कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या महाराष्ट्रात वेगाने वाढत आहे. मात्र, ही संख्या अशीच वाढत राहिली तर राज्यातील आरोग्य व्यवस्था या संकटाला सामोरे जाण्यास तयार आहे का? कारण, सध्या राज्यात व्हेंटिलेटर्सचा मोठा तुटवडा असल्याचा दावा भाजपचे आमदार राम कदम यांनी केला आहे.

मुंबई : राज्यात कोरोनाबधितांची वाढती संख्या सरकारसमोरचं सर्वात मोठं आव्हान आहे. मुंबईसह राज्यभरातील रुग्णालयात या परिस्थितीशी सामना करण्यासाठी व्हेंटिलेटर्सची पुरेशी संख्या अत्यंत गरजेची आहे. मात्र, सध्या व्हेंटिलेटर्सचा मोठा तुटवडा असल्याचा दावा भाजपचे आमदार राम कदम यांनी केला आहे. राज्यात आज घडीला 97 जण कोरोना विषाणूचे संक्रमित आहेत. शिवाय या हा आकडा आता वेगाने वाढताना दिसत आहे. अशा परिस्थितीत राज्यातील आरोग्य व्यवस्था या संकटाला सामोरे जाण्यासाठी तयार आहे का? यासाठी सरकारकडून काय पावलं उचलली जात आहेत याचा आढावा घेणारा एक रिपोर्ट. कोरोनाबधितांची वाढती संख्या पाहता येत्या काळात आरोग्य यंत्रणांवर प्रचंड ताण येण्याची शक्यता आहे. त्यात सध्या मुंबईसह राज्यभरातील शासकीय आणि खासगी रुग्णालयात साधारण एक हजार व्हेंटिलेटर्स उपबलब्ध असल्याचं आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. मात्र, येणाऱ्या परिस्थितीशी तोंड द्यायला ही संख्या पुरेशी आहे का? हा प्रश्न भाजप आमदार राम कदम यांनी उपस्थित केला आहे. राम कदम यांनी दोन आठवड्यांपूर्वी विधानसभेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार मुंबईतील रुग्णालयात व्हेंटिलेटर्सची संख्या किती आहे हे पुढील आकडेवारीतून पाहुयात. Curfew in maharashtra | राज्यात संचारबंदी! काय सुरु राहणार आणि काय बंद? राजावाडी रुग्णालय, घाटकोपर एकूण व्हेंटिलेटर = 13 केईएम हॉस्पिटल (बीएमसी), परळ एकूण व्हेंटिलेटर = 225 सायन हॉस्पिटल (बीएमसी), सायन एकूण व्हेंटिलेटर = 126 नायर हॉस्पिटल (बीएमसी), मुंबई सेंट्रल एकूण व्हेंटिलेटर = 90 जे.जे. रुग्णालय (शासन महा.), भायखळा एकूण व्हेंटिलेटर = 89 भाभा हॉस्पिटल (बीएमसी), वांद्रे एकूण व्हेंटिलेटर = 17 व्ही. एन. देसाई हॉस्पिटल (बीएमसी), सांताक्रूझ एकूण व्हेंटिलेटर = 15 बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालय (बीएमसी), कांदिवली एकूण व्हेंटिलेटर = 30 भाभा रुग्णालय (बीएमसी), कुर्ला एकूण व्हेंटिलेटर = 10 लीलावती हॉस्पिटल, वांद्रे एकूण व्हेंटिलेटर = 44 प्रिन्स अली हॉस्पिटल, माझगाव एकूण व्हेंटिलेटर = 17 बॉम्बे हॉस्पिटल, सीएसटी एकूण व्हेंटिलेटर = 25 एसआरसीसी हॉस्पिटल, हजियाली एकूण व्हेंटिलेटर = 18 हिरानंदी रुग्णालय, पवई एकूण व्हेंटिलेटर = 16 भाटिया हॉस्पिटल, तारदेव एकूण व्हेंटिलेटर = 10 ब्रीच कँडी, महालक्ष्मी एकूण व्हेंटिलेटर = 22 हिंदू महासभा रुग्णालय, घाटकोपर एकूण व्हेंटिलेटर = 10 मात्र, त्यापैकी कोरोनाबधितांच्या उपचारासाठी किती उपलब्ध आहेत हा खरा प्रश्न आहे. याबाबत आज वर्षा निवास्थानी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत व्हेंटिलेटर्सचा आढावा घेण्यात आला. माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत या बैठकीला उपस्थित होते. जगभरातील कोरोनाव्हायरस ग्रस्त देशांमधील अभ्यासातून दिसून आले आहे की 25 ते 30 टक्के रुग्णांना श्वसनासाठी व्हेंटिलेटर्सची गरज भासते. त्यात देशात महाराष्ट्राचा लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा क्रमांक आणि कोरोनाबाधित्यांच्या संख्येत पहिला क्रमांक आहे. अशात येत्या काळात धोका वाढल्यास राज्यातील रुग्णांना व्हेंटिलेटर्स अभावी शेवटचा श्वास घेण्याची वेळ येऊ नये यासाठी सरकारने तात्काळ पावलं उचलावीत असे कळकळीचं आवाहन एबीपी माझाच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. coronavirus | संचारबंदीच्या घोषणेनंतर खरेदीसाठी झुंबड, मुंबई, नाशिक, पुण्यात लोकं घराबाहेर !
आणखी वाचा























