एक्स्प्लोर

मोदींचा सोलापूर दौरा, 85 मिनिटांत सहा विकासकार्यांचा शुभारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरातील पार्क स्टेडियममध्ये इलेक्ट्रॉनिक बटण दाबून सहा विकासकामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण करतील. त्यानंतर ते उपस्थितांशी संवादही साधणार आहेत.

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूरच्या दौऱ्यावर असून 85 मिनिटांत सहा विकासकार्यांचा शुभारंभ ते करणार आहेत. देहू-आळंदी पालखी मार्ग, 30 हजार घरकुलांची पायाभरणी, स्मार्ट सिटी, ड्रेनेज योजना अशा विविध विकासकामांचं मोदींच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येणार आहे. सभेच्या माध्यमातून मोदी लोकसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकण्याची चिन्हं आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत राज्यपाल के. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते दळणवळण मंत्री नितिन गडकरी, केंद्रीय गृहनिर्माण विकास मंत्री हरजितसिंग गिरी सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. याशिवाय केंद्र आणि राज्यातील विविध वरिष्ठ अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. सकाळी 10 वाजून 50 मिनिटांनी पंतप्रधान मोदी यांचे हेलिकॉप्टरने बिदरहून सोलापूर विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर पार्क स्टेडियममध्ये इलेक्ट्रॉनिक बटण दाबून पंतप्रधान मोदी सहा विकासकामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण करतील. त्यानंतर ते उपस्थितांशी संवादही साधणार आहेत. दुपारी 12 वाजून 15 मिनिटांनी सोलापूर विमानतळावरुन  हेलिकॉप्टरने बिदरकडे रवाना होतील. कोणकोणत्या विकासकामांचं भूमिपूजन? उजनी ते सोलापूर या 360 कोटी रुपये खर्चून साकारण्यात येणाऱ्या समांतर जलवाहिनीचं भूमिपूजन स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत एबीडी एरियातील 190 कोटीच्या पाणीपुरवठा ड्रेनेज लाईन सुविधा कामाचं भूमिपूजन हद्दवाढ भागात महापालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या अमृत योजनेअंतर्गत 180 कोटींच्या भुयारी गटार योजनेचे भूमिपूजन महापालिकेच्या वतीने सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी उभारण्यात आलेल्या तीन एसटीपी प्रकल्पाचे लोकार्पण पंतप्रधान आवास योजनेतून रे नगर फेडरेशन या नियोजित 30 हजार गृहनिर्माण प्रकल्पाचे भूमिपूजन सोलापूर-उस्मानाबाद या चौपदरी राष्ट्रीय महामार्गाचे लोकार्पण सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून स्पेशल पोलिस गार्ड (एसपीजी) च्या 25 टीम्स सोलापुरात दाखल झाल्या आहेत. 500 जण आणि 30 संघटनांना नोटीस बजावण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा शासकीय असून अनुचित प्रकार टाळण्याची काळजी प्रत्येकाने घ्यावी, काळे झेंडे दाखवून सोलापूर शहर आणि राज्याचे नाव देशात बदनाम होईल अशी वर्तणूक करु नये, सुरक्षेसाठी महिलांनी पर्स, पाण्याची बाटली, बॅग सोबत कार्यक्रम स्थळी आणू नये, पिण्याच्या पाण्याची आयोजक सोय करतील, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
नाशिककरांसाठी पुढचे चार ते पाच तास महत्वाचे, 500 मिलीमीटर पाऊस पडण्याचा इशारा, NDRF च्या टीम तैनात
नाशिककरांसाठी पुढचे चार ते पाच तास महत्वाचे, 500 मिलीमीटर पाऊस पडण्याचा इशारा, NDRF च्या टीम तैनात
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ

व्हिडीओ

Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
Embed widget