एक्स्प्लोर

मुंबई-पुण्यासह राज्यातील विकास कामांना गती मिळणार, केंद्राकडून सहा प्रकल्पांसाठी 652 कोटींची तरतूद

Central Government: केंद्र शासनाने मान्यता दिलेल्या महाराष्ट्रातील सहा प्रकल्पांसाठी नगर विकास विभागाने निधीची भरभरून तरतूद केल्याची माहिती समोर आली आहे.

Central Government: केंद्र शासनाने मान्यता दिलेल्या महाराष्ट्रातील (Maharashtra) सहा प्रकल्पांसाठी नगर विकास विभागाने निधीची भरभरून तरतूद केल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील सहा विविध प्रकल्पांसाठी केंद्र शासनाने 1 हजार 304 कोटी रुपयांच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. त्यातील पहिल्या टप्प्यामध्ये 50 टक्के अर्थात 652 कोटी रुपयांचा निधी केंद्र शासनाकडून राज्याला मिळणार आहे. त्यानुसार राज्याच्या नगर विकास विभागाने एमएमआरडीए (Mmrda), पीएमआरडीए (Pmrda) आणि सिडको (Cidco) प्रशासनांना 652 कोटी रुपयांचा निधी वळता केला आहे. परिणामी केंद्राची नजर असलेल्या राज्यातील सहा प्रकल्पांना आता गती मिळणार आहे. 

या प्रकल्पांत मुंबईतील (MUmbai) एमएमआरडीएच्या (MMRDA) शिवडी-वरळी उन्नत मार्ग (Shivdi-Worli Elevated Road), कुर्ला ते वाकोला उड्डाणपूल (Kurla to Vakola Flyover ) आणि बीकेसी ते एलबीएस उड्डाणपूल ( Bkc to Lbs Flyover) यांवरील उन्नत मार्गिका, तसेच बीकेसी ते वाकोला जंक्शन उन्नत मार्गिकेचा (BKC to Vakola Junction Elevated Line) समावेश आहे. याशिवाय पुणे विद्यापीठ चौकातील पीएमआरडीए अंतर्गत येणाऱ्या मेट्रो रेल मार्गिकेसोबत (Metro Rail Route) एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाची उभारणी होणार आहे. दरम्यान, सिडको अंतर्गत येणाऱ्या कोंढाणे प्रकल्प पाणी पुरवठा योजना आणि बाणगंगा प्रकल्प पाणी पुरवठा योजना मार्गी लावण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. एकूणच मुंबई (Mumbai), नवी मुंबई (Navi Mumbai) आणि पुणे  महापालिका (Pune Municipal Corporation) काबीज करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार (Maharashtra Government) कामाला लागल्याचे दिसत आहे.

कुठल्या प्रकल्पासाठी किती तरतूद?

एमएमआरडीए (MMRDA)

- शिवडी वरळी उन्नत मार्गसाठी 250 कोटी रुपये.
- कुर्ला ते वाकोला उड्डाणपूल आणि बीकेसी ते एलबीएस उड्डाणपूल उन्नत मार्गासाठी 87 कोटी 50 लाख रुपये.
- बीकेसी ते वाकोला जंक्शनसाठी 22 कोटी 50 लाख रुपये.

पीएमआरडीए (PMRDA)

- पुणे विद्यापीठ (University of Pune) चौकात मेट्रो रेल मार्गिकेसोबत एकात्मिक दुमजली उड्डाणपुलासाठी 37 कोटी 50 लाख रुपये

सिडको (Cidco)

- कोंढाणे प्रकल्प पाणी पुरवठा योजनेसाठी 125 कोटी रुपये
- बाणगंगा प्रकल्प पाणी पुरवठा योजनेसाठी 129 कोटी 50 लाख रुपये

इतर महत्वाच्या बातम्या: 

पेन्शन, मेडिकल कॉलेजमध्ये राखीव जागा, म्हाडामध्ये घरे; सीमाभागातील नागरिकांसाठी शिंदे-फडणवीस सरकारच्या मोठ्या घोषणा 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Karnataka : कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली, डीके शिवकुमार अन् मल्लिकार्जुन खर्गे एकाच कारमधून प्रवास
कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली, डीके शिवकुमार अन् मल्लिकार्जुन खर्गे एकाच कारमधून प्रवास
रेल्वेचे अधिकारी मस्तवालपणे स्वतःच्या कार्यालयात बसून राहतात, प्रवाशांना सुविधा नाहीत; खासदारांची रेल्वेमंत्र्यांकडे तक्रार
रेल्वेचे अधिकारी मस्तवालपणे स्वतःच्या कार्यालयात बसून राहतात, प्रवाशांना सुविधा नाहीत; खासदारांची रेल्वेमंत्र्यांकडे तक्रार
ह्रदयद्रावक... लग्नानंतर अर्ध्या तासाच नवरदेव कोसळला, ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; लग्नमांडवात शोककळा
ह्रदयद्रावक... लग्नानंतर अर्ध्या तासाच नवरदेव कोसळला, ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; लग्नमांडवात शोककळा
जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा शब्द
जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा शब्द
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sonali Bendre Cancer : कॅन्सरवर मात, निसर्गोपचाराची साथ? सोनाली बेंद्रे  चर्चेत Special Report
MVA On MNS : मनसेविना मविआला मुंबईत बहुमत मिळवणं कठीण? मतांचं इक्वेशन संपवणार टशन? Special Report
Ayodhya Dhwaj :पंतप्रधान मोदी, सरसंघचालकांच्या हस्ते ध्वजरोहण  राममंदिराच्या शिखरावर धर्मध्वजाचा साज
Special Report Highly Gubbi : हायली गुब्बी ज्वालामुखीचा अचानक स्फोट, इथोपियात ज्वालामुखी भारतात स्फोट
Kunal Kamra Special Report : कुणाल कामराच्या पोस्टवरून वाद  टीशर्टवरील फोटोवरून भाजप नेत्यांची टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karnataka : कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली, डीके शिवकुमार अन् मल्लिकार्जुन खर्गे एकाच कारमधून प्रवास
कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली, डीके शिवकुमार अन् मल्लिकार्जुन खर्गे एकाच कारमधून प्रवास
रेल्वेचे अधिकारी मस्तवालपणे स्वतःच्या कार्यालयात बसून राहतात, प्रवाशांना सुविधा नाहीत; खासदारांची रेल्वेमंत्र्यांकडे तक्रार
रेल्वेचे अधिकारी मस्तवालपणे स्वतःच्या कार्यालयात बसून राहतात, प्रवाशांना सुविधा नाहीत; खासदारांची रेल्वेमंत्र्यांकडे तक्रार
ह्रदयद्रावक... लग्नानंतर अर्ध्या तासाच नवरदेव कोसळला, ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; लग्नमांडवात शोककळा
ह्रदयद्रावक... लग्नानंतर अर्ध्या तासाच नवरदेव कोसळला, ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; लग्नमांडवात शोककळा
जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा शब्द
जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा शब्द
मोठी बातमी! मुंबई महापालिकेच्या मतदार यादीत तब्बल 11 लाख दुबार मतदार; यादी जाहीर, कोणत्या वार्डात सर्वाधिक?
मोठी बातमी! मुंबई महापालिकेच्या मतदार यादीत तब्बल 11 लाख दुबार मतदार; यादी जाहीर, कोणत्या वार्डात सर्वाधिक?
T 20 World cup 2026: मोठी बातमी! टी-20 विश्वचषक स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर; 10 वर्षानंतर मायदेशात, भारत-पाकिस्तान सामना कधी?
मोठी बातमी! टी-20 विश्वचषक स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर; 10 वर्षानंतर मायदेशात, भारत-पाकिस्तान सामना कधी?
नगरपालिका निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडेल; 'सर्वोच्च' सुनावणीनंतर काय म्हणाले CM फडणवीस
नगरपालिका निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडेल; 'सर्वोच्च' सुनावणीनंतर काय म्हणाले CM फडणवीस
आठवड्यापूर्वी लग्न, देवदर्शनासाठी निघाले अन् लोणावळा स्टेशनवर तोल गेला; RPF पोलिसामुळे तरुण बचावला
आठवड्यापूर्वी लग्न, देवदर्शनासाठी निघाले अन् लोणावळा स्टेशनवर तोल गेला; RPF पोलिसामुळे तरुण बचावला
Embed widget