एक्स्प्लोर
प्लास्टिकबंदी : चिप्स, कुरकुरे, बिस्कीट बनवणाऱ्या कारखान्यांना नोटीस
चिप्स, कुरकुरे आणि बिस्कीट पॅकिंगसाठी कव्हर तयार करणाऱ्यांना कारखान्यांना उत्पादन बंद करण्याची नोटीस आली आहे. यामुळे उद्योजक मोठ्या प्रमाणात नाराज आहेत.
उस्मानाबाद : प्लास्टिकबंदीनंतर आता अनेक कारखान्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. चिप्स, कुरकुरे आणि बिस्कीट पॅकिंगसाठी कव्हर तयार करणाऱ्यांना कारखान्यांना उत्पादन बंद करण्याची नोटीस आली आहे.
नांदेड जिल्ह्यातील देगलूरमधल्या चुन्याची डबी बनवणाऱ्या कारखान्याला उत्पादन बंद करण्याची नोटीस आली आहे. औरंगाबादच्या चिप्स, कुरकुरे आणि बिस्कीटसाठी कव्हर बनवणाऱ्या सर्वात मोठ्या कारखान्यालाही उत्पादन बंद करण्याची नोटीस आली.
लातूरमधल्या उद्योजकांनाही आपला दोन कोटी रुपयांचा कारखाना आज बंद केला. प्लास्टिकबंदीच्या निमित्ताने सगळीकडे इन्स्पेक्टर राज आले असा आता उद्योजक आरोप करू लागले आहेत.
मोठ्या कंपन्यांचे चिप्स, बिस्किटे, कुरकुरे यांच्या व्यवसायावरती बंदी न घालता जे पूर्णपणे रिसायकल केलं जाऊ शकतं यावर बंदी का, असा उद्योजकांचा सवाल आहे.
राज्यभरात कारवाईचा धडाका
प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी झाल्यानंतर राज्यभरात आज प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कारवाई सुरु आहे. प्लास्टिक वापरणाऱ्याला पाच हजार रुपये दंडाची पावती दिली जात आहे. पुण्यात महापालिकेच्या पथकाकडून सकाळपासून 73 कारवाया करत तीन लाख 69 हजार रुपयांची वसुली केली.
सांगलीतही प्लास्टिक बाळगणाऱ्या दुकानावर महापालिकेने छापे टाकून हजारो रुपयांचा प्लास्टिक आणि थर्माकोलचा साठा हस्तगत करून दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. महापालिकेने आपल्या 15 भरारी पथकाच्या माध्यमातून आज जवळपास 50 हजार रुपये दंड वसूल केला, तर अंदाजे एक टन प्लास्टिक पिशवी आणि अन्य प्लास्टिक जप्त केलं आहे.
यामध्ये सांगली शहरात मुख्य बाजार पेठेत छापे टाकून अनेक दुकानातून प्लास्टिक तसेच थर्माकोलचे साठे जप्त करण्यात आले आहेत. प्लास्टिक विरोधी कारवाई उद्यापासून अधिक तीव्र होणार असून मंगल कार्यालये, मटण आणि चिकन मार्केट, मंडई, बाजार येथेही तपासणी करण्यात येणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बीड
क्रीडा
क्रीडा
Advertisement