एक्स्प्लोर
Advertisement
पिंपरी चिंचवड : ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगाराला वाचवताना अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू
ड्रेनेजसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडलेल्या मुलाला वाचवण्यासाठी गेलेल्या दोन अग्निशामक जवानांच्या अंगावर मातीचा ढिगारा पडला. या मातीच्या ढिगाऱ्याखाली तीन जण गाडले गेले. या घटनेत पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू झाला.
पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये सुरु असलेल्या अमृत योजनेच्या कामावेळी खड्ड्यात अडकलेल्या कामगाराला बाहेर काढताना अग्निशमन दलाच्या एका जवानाचा मृत्यू झालाय. तर दोन जवानांसह चौघे जखमी झालेत. तर एक कामगार अद्यापही अडकलेला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेकडून दापोडीत अमृत योजनेअंतर्गत खोदकाम सुरू आहे. ही घटना रविवारी ( 1 डिसेंबर) सायंकाळी सव्वासहा वाजता घडली. याठिकाणी एनडीआरएफ दाखल झाले असून मतदकार्य सुरु आहे.
दापोडी येथे अमृत योजनेअंतर्गत नागेश जमादार हे कामगार त्या 15 फूट खड्ड्यात काम करत होते. सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास अचानक त्यांच्या अंगावर मातीचा ढिगारा कोसळल्याने ते कंबरेपर्यंत गाडले गेले. त्यांना बाहेर काढण्यासाठी ईश्वर बडगे आणि सीताराम सुरवसे हे स्थानिक नागरिक खाली उतरले. नागेश यांना वाचवतानाच पुन्हा मातीचा ढिगारा खाली कोसळला. हे तिघे त्या ढिगाऱ्यात अडकल्याची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सरोज पुंडे, निखिल गोगावले आणि विशाल जाधव हे तीन जवान बचावकार्यासाठी खड्ड्यात उतरले. शिडीच्या साह्याने ईश्वर आणि सीताराम यांना जखमी अवस्थेत बाहेर काढले. पुन्हा नागेशला सुखरूप बाहेर काढण्यात तिन्ही जवान व्यस्त झाले.
पण तितक्यात आणखी एक ढिगारा चौघांच्या अंगावर पडला. तेव्हा विशाल यांचे तोंड खाली आणि पाय वर अशा परिस्थितीत ते ढिगाऱ्याखाली दबले गेले. त्यानंतर आणखी अग्निशमन आणि एनडीआरएफच्या जवानांची कुमक मागवण्यात आली. या बचावकार्यात सरोज आणि निखिल या कार्यक्षम जवानांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. मात्र, विशाल यांचा यात दुर्दैवी मृत्यू झालाय. तर सुरुवातीला फसलेले कामगार नागेश यांना बाहेर काढण्यासाठी अद्याप ही बचावकार्य सुरू आहे. नागेश हे रंग कामगार आहेत. मात्र त्यांना काही पैश्यांची गरज असल्याने ते आज सुट्टी असताना ही या कामासाठी आले आणि त्यांच्यासोबत ही दुर्दैवी घटना घडली. पालिकेने एम बी पाटील या ठेकेदाराला अमृत योजनेचे काम दिलेलं आहे. भोसरी पोलिसांकडून या सर्व घटनेचा तपास केला जातोय.
दोषींवर कारवाई होणार
घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाले आहे. या घटनेचा तपास सुरु आहे, जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती डीसीपी स्मिता पाटील यांनी दिली. दरम्यान, या प्रकरणी ठेकेदाराच्या सुपरव्हायजरला भोसली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
संबंधित बातम्या :
Pune Accident | पुणे-सोलापूर रस्त्यावर भीषण अपघात, नऊ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
Fire brigade I ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगाराला वाचवताना अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू I एबीपी माझा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement