एक्स्प्लोर
Advertisement
Pune Accident | पुणे-सोलापूर रस्त्यावर भीषण अपघात, नऊ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
सर्वजण शुक्रवारी सकाळी रायगड जिल्ह्यात फिरायला गेले होते. रायगडावरून परत येत असताना कदम वाक वस्ती या गावाजवळ गाडी चालवणाऱ्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी दुभाजक तोडून समोरच्या दिशेने येणाऱ्या ट्रकला जाऊन धडकली.
पुणे : पुणे-सोलापूर रस्त्यावर झालेल्या मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात नऊ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. पुणे-सोलापूर रस्त्यावरील कदम वाक वस्ती ग्रामपंचायतीजवळ ही घटना घडली. रात्री एक वाजेच्या सुमारास अर्टिगा कारच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी दुभाजक तोडून समोरच्या दिशेने येणाऱ्या ट्रकला जाऊन धडकली. या भीषण अपघातामध्ये चार चाकी वाहनामधील 9 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. सर्व मयत यवत येथील रहिवासी आहेत.
या घटनेत मृत्युमुखी पडलेले नऊ जण पुणे जिल्ह्यातील यवतचे राहणारे असून सर्वजण महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी आहेत. हे सर्वजण शुक्रवारी सकाळी रायगड जिल्ह्यात फिरायला गेले होते. रायगडावरून परत येत असताना कदम वाक वस्ती या गावाजवळ गाडी चालवणाऱ्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी दुभाजक तोडून समोरच्या दिशेने येणाऱ्या ट्रकला जाऊन धडकली. यामध्ये अर्टिगा कारमधील नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला.
अपघात इतका भयानक होता की यामध्ये कारचा अक्षरश: चुराडा झाला. या घटनेत अक्षय भारत वाईकर, विशाल सुभाष यादव, निखिल चंद्रकांत वाबळे, सोनू ऊर्फ नूर महमद अब्बास दाया, परवेज आशपाक अत्तार, शुभम रामदास भिसे, अक्षय चंद्रकांत घिगे, दत्ता गणेश यादव आणि जुबेर अजिज यांचा मृत्यू झाला आहे.
मृतकांमधील दत्ता गणेश यादव हा हडपसर ( उंड्री) भागातील JSPMS महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. निखिल चंद्रकांत वाबळे हा विश्वराज हॉस्पिटलमध्ये बाऊन्सर
चे काम करायचाय तर विशाल सुभाष यादव हा वाघोली गावातील JSPMS महाविद्यालयात शिकत होता. शुभम भिसे हा उरळी कांचन जवळील कासुर्डी गावातील महात्मा गांधी महाविद्यालयात BCS चे शिक्षण घेत होता तर अक्षय चंद्रकांत दिघे हा हडपसरमधील अण्णासाहेब मगर महाविद्यालयात BSC च्या शेवटच्या वर्षाला होता.
नुर मोहम्मद दारा हा लोणी काळभोर मधील महाविद्यालयात बी एच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. परवेज अशपाक आत्तार आझम कॅपसमधील पुणा कॉलेजमधे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. अक्षय वायकरचा स्वत:चा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत होता तर जुबेर मुलाणी हा लोणी काळभोर जवळ नोकरी करत होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नाशिक
निवडणूक
निवडणूक
Advertisement