PCMC Crime news : कुख्यात गुंड नीलेश घायवळला शुभेच्छा देणारे बॅनर्स लावणं पडलं महागात; तिघांवर गुन्हा दाखल
PCMC : पिंपरी चिंचवड पोलिसांनी कुख्यात गुंड नीलेश घायवळ याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर्स लावण्यात आले होते. मात्र या बॅनर्स लावणाऱ्य़ा अतिउत्साही कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
PCMC Crime news : पिंपरी चिंचवड पोलिसांनी कुख्यात गुंड नीलेश घायवळ (Nilesh gaywal) याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर्स लावण्यात आले होते. मात्र या बॅनर्स लावणाऱ्या अतिउत्साही कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी नीलेश घायवळ युथ फाऊंडेशनच्या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. घायवळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शहरात बेकायदेशीर पोस्टर लावल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी गुंड नीलेश घायवळ टोळीच्या सदस्यांसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश घायवळ युथ फाऊंडेशनतर्फे पुणे-बेंगलोर महामार्गालगत चांदणी चौक परिसरात हे बेकायदा पोस्टर्स लावण्यात आले होते. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या अधिकार्यांनी पुणे महानगरपालिकेच्या बावधन प्रभाग कार्यालयातील सदस्यांसह ही पोस्टर्स हटविण्याची संयुक्त कारवाई सुरू केली होती. महापालिकेने घटनास्थळावरून बेकायदेशीर पोस्टर्स हटवले आहेत, तर हिंजवडी पोलिसांनी नीलेश घायवळ युथ फाऊंडेशनच्या तीन सदस्यांवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींवर भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 188 सोबत मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नीलेश घायवळ हा पिंपरी-चिंचवडमधील कुख्यात गुंड आहे. येत्या काही दिवसांत त्याचा वाढदिवस आहे. त्यामुळे त्यांच्या अति उत्साही कार्यकर्त्यांनी असे बॅनर्स लावले. त्यात अनेकांचे शुभेच्छूक म्हणून फोटोदेखील लावण्यात आले होते. या बॅनर्सवर थेट कारवाई केली आहे.
दोनच दिवसांपूर्वी कुख्यात गुंड जेरबंद
पिंपरी चिंचवडमधील कुख्यात गुंड (Pune Crime News) बाळा वाघेरे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. पैशाच्या व्यवहारातून बाळा वाघेरे आणि त्याच्या साथीदारांनी एकाचे अपहरण केल्याची तक्रार पोलिसांकडे प्राप्त झाल्यानंतर चिंचवड पोलिसांनी (Chinchwad Police) वाघेरेला त्याच्या घरातून ताब्यात घेतले होते. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली होती. यासंदर्भात 29 वर्षीय व्यापाऱ्याने तक्रार दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी बाळा वाघेरे, राहुल उणेचा आणि हरीश चौधरी (रा.वाल्हेकरवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हेगारीत वाढ
पुण्यात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारीत वाढ झाली आहे. अनेक टोळ्या सक्रिय आहेत. त्यामुळे दहशतदेखील निर्माण झाली आहे आणि नागरिकांना धास्ती बसली आहे. त्यात अशा प्रकारच्या कुख्यात गुंडांना किंवा गुन्हेगारांना पडकण्यात पोलिसांना यश आलं आहे. रोज नव्या गुन्ह्यांचा उलगडा करणं आणि अशा प्रकारच्या कुख्यात गुन्हेगारांना जेरबंद करणं हे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे.