एक्स्प्लोर

Datta Bharne on Dhananjay Munde : बीड प्रकरणात धनंजय मुंडेंचा कुठलाही संबंध असण्याची शक्यता नसावी; मंत्री दत्तामामांकडून धनूभाऊंची 'पाठराखण'

वाल्मिक कराडच्या मुसक्या आवळल्याने धनंजय मुंडेच्या अडचणी वाढल्याची चर्चा असतानाच क्रीडा खात्याचा पदभार अजूनही न स्वीकारलेल्या मंत्री दत्तामामा भरणे यांनी त्यांची पाठराखण केली आहे.

Datta Bharne on Dhananjay Munde : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडने पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आला. त्याला सीआयडीच्या 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी कराडवर गंभीर आरोप होत असून पवनचक्की प्रकल्पातीलल दोन कोटींच्या खंडणी प्रकरणात मुख्य आरोपी आहे. वाल्मिक कराडच्या मुसक्या आवळण्यासाठी दबाव असतानाच तो सीआयडीला शरण आला आहे. कराड हा धनंजय मुंडेंचा अत्यंत निकटवर्तीय समजला जातो. 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती.

बीड प्रकरणात धनंजय मुंडेंचा कुठलाही संबंध असण्याची शक्यता नसावी

दरम्यान, वाल्मिक कराडच्या मुसक्या आवळल्याने धनंजय मुंडेच्या अडचणी वाढल्याची चर्चा असतानाच क्रीडा खात्याचा पदभार अजूनही न स्वीकारलेल्या मंत्री दत्तामामा भरणे यांनी त्यांची पाठराखण केली आहे. अनेक मंत्र्यांचे मित्र असतात त्यांनी गुन्हा केला म्हणून मंत्र्यांवर आरोप करणे कितपत योग्य? अशी विचारणा दत्तामामांनी केली आहे. बीड प्रकरणात धनंजय मुंडे यांचा कुठलाही संबंध असण्याची शक्यता नसावी, असेही दत्ता मामा म्हणाले. 

मी लवकरच मंत्रीपदाचा पदभार स्वीकारणार

दरम्यान, क्रीडा खातं दिल्याने दत्तामामा नाराज असल्याची चर्चा आहे. मात्र, मी नाराज नाही मी पुढील आठवड्यात मुंबईला जाऊन नक्की माझा पदभार स्वीकारणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गेली दहा वर्ष मी काम करतो आहे. सुट्टीवर गेलो होतो, कुठल्याही प्रकारची नाराजी मंत्रीपदावरून नसल्याचा दावाही त्यांनी केला. त्यांनी सांगितले की, 2025 मध्ये मंत्री म्हणुन चांगल काम करणारं आहे. दरम्यान, यावेळी बोलताना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारच होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

दरम्यान, धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून हटवण्याची मागणी होत आहे. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून हटवण्याचे निर्देश देण्याची विनंती करणारी याचिका सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या प्रकरणाच्या निष्पक्ष तपासासाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने धनंजय मुंडे यांना मंत्रीपदावरून हटवण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती याचिकेत केली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये भूमिका बजावणाऱ्या बीडमधील गुन्हेगारी टोळीच्या प्रमुखाशी मुंडेंचा संबंध असल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने त्यांची याचिका स्वीकारावी, अशी विनंती याचिकाकर्त्याने केली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोरेगाव भीमा अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज, 8 ते 10  लाख अनुयायी येण्याचा अंदाज, 5000 पोलीस तैनात
कोरेगाव भीमा अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज, 8 ते 10 लाख अनुयायी येण्याचा अंदाज, 5000 पोलीस तैनात
Walmik Karad : दोन्ही बाजूनं 30 मिनिटं जोरदार युक्तिवाद,केज कोर्टात काय घडलं? सरकारी वकील अन् कराडांचे वकील काय म्हणाले?
खंडणीच्या तक्रारीत 2 कोटींचा उल्लेखचं नाही, वाल्मिक कराडांच्या वकिलांचा कोर्टात कोणता युक्तिवाद?
Walmik Karad: वाल्मिक कराड प्रकरणात सरकारवर प्रेशर, देवेंद्र फडणवीसांनी बळी पडू नये: प्रकाश आंबेडकर
वाल्मिक कराड प्रकरणात सरकारवर प्रेशर, देवेंद्र फडणवीसांनी बळी पडू नये: प्रकाश आंबेडकर
मोठी बातमी, राज्य सरकारकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अन् पदोन्नती, सूरज मांढरे कृषी विभागाचे नवे आयुक्त
मोठी बातमी, राज्य सरकारकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अन् पदोन्नती, सूरज मांढरे कृषी विभागाचे नवे आयुक्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Koregaon Bhima Shaurya Din : 207 वा शौर्यदिन, विजय स्तंभाला संविधानाच्या प्रतिकृतीची आकर्षक सजावटNew Year Celebration : शिर्डी, शेगाव,मुंबईतील सिद्धिवानायक; नववर्षाचं स्वागतासाठी मंदिरांमध्ये गर्दीTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 01 जानेवारी 2025 : ABP MajhaTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 01 January 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोरेगाव भीमा अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज, 8 ते 10  लाख अनुयायी येण्याचा अंदाज, 5000 पोलीस तैनात
कोरेगाव भीमा अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज, 8 ते 10 लाख अनुयायी येण्याचा अंदाज, 5000 पोलीस तैनात
Walmik Karad : दोन्ही बाजूनं 30 मिनिटं जोरदार युक्तिवाद,केज कोर्टात काय घडलं? सरकारी वकील अन् कराडांचे वकील काय म्हणाले?
खंडणीच्या तक्रारीत 2 कोटींचा उल्लेखचं नाही, वाल्मिक कराडांच्या वकिलांचा कोर्टात कोणता युक्तिवाद?
Walmik Karad: वाल्मिक कराड प्रकरणात सरकारवर प्रेशर, देवेंद्र फडणवीसांनी बळी पडू नये: प्रकाश आंबेडकर
वाल्मिक कराड प्रकरणात सरकारवर प्रेशर, देवेंद्र फडणवीसांनी बळी पडू नये: प्रकाश आंबेडकर
मोठी बातमी, राज्य सरकारकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अन् पदोन्नती, सूरज मांढरे कृषी विभागाचे नवे आयुक्त
मोठी बातमी, राज्य सरकारकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अन् पदोन्नती, सूरज मांढरे कृषी विभागाचे नवे आयुक्त
New Year 2025 Wishes : नवीन वर्षाच्या प्रिय व्यक्तींना द्या 'या' हटके शुभेच्छा; पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश
नवीन वर्षाच्या प्रिय व्यक्तींना द्या 'या' हटके शुभेच्छा; पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश
पर्यटकांचा कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईतील पर्यटकांनी स्थनिकांना केली मारहाण, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात
पर्यटकांचा कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईतील पर्यटकांनी स्थनिकांना केली मारहाण, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात
वाल्मिक अण्णा उज्जैनला होते, तिथून चाकू फेकून हाणला काय? कराडच्या हाडाच्या कार्यकर्त्याचा सवाल
वाल्मिक अण्णा उज्जैनला होते, तिथून चाकू फेकून हाणला काय? कराडच्या हाडाच्या कार्यकर्त्याचा सवाल
IPO Update : यूनिमेक एअरोस्पेसनं शेवट गोड केला, 85 टक्के प्रीमियमसह लिस्ट, गुंतवणूकदारांचं लक्ष इंडो फार्मच्या आयपीओकडे, GMP कितीवर?
यूनिमेक एअरोस्पेसचा आयपीओ 85 टक्के प्रीमियमसह लिस्ट, इंडो फार्मचा IPO पहिल्याच दिवशी 17 पट सबस्क्राइब, GMP कितीवर?
Embed widget