Mohan Bhagwat on Mandir : राजकीय लाभ घेण्यासाठी मंदिरांचा वापर नको : RSS Panchjanya
Mohan Bhagwat on Mandir : राजकीय लाभ घेण्यासाठी मंदिरांचा वापर नको : RSS Panchjanya
मोहन भागवतांच्या वक्तव्यानंतर आरएसएसचे मुखपत्र पांचजन्यनेही बदलले सूर, मंदिरांचा राजकीय स्वार्थासाठी वापर होणं गैर असल्याचा पांचजन्यचा अग्रलेख, पांचजन्यनेकडून भागवतांच्या वक्तव्याचं समर्थन.
सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंदिरांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर आता आरएसएसचं मुखपत्र पांचजन्यचेही सूर बदलले आहेत. मंदिरांचा राजकीय स्वार्थासाठी वापर होणं गैर असल्याचं पांचजन्यने आपल्या अग्रलेखात म्हटलंय. राजकीय स्वार्थासाठी गल्ली मोहल्ल्यात असे वाद उकरून काढण्याचा प्रयत्न काही संघटना करत आहेत. मात्र असे वाद टाळणं गरजेचं आहे असं सांगत पांचजन्यने मोहन भागवतांच्या वक्तव्याचं समर्थन केलंय.
देशात शांतता राहावी यासाठीमोहन भागवतांनी मत व्यक्त केल्याचा काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास यांचा दावा, भागवत बोलतात तेव्हा ते अभ्यास करुनच बोलतात, सुधीरदास यांची प्रतिक्रिया.