कोरेगाव भीमा अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज, 8 ते 10 लाख अनुयायी येण्याचा अंदाज, 5000 पोलीस तैनात
कोरेगाव भीमा अभिवादन सोहळ्यासाठी आठ ते दहा लाख अनुयायी येणार, प्रशासन सज्ज, सजावटीसह जय्यत तयारी
Pune: पुण्यातील कोरेगाव भीमा येथे आज 207 वा शौर्यदिन साजरा केला जाणार आहे. शौर्य दिनानिमित्त कोरेगाव भीमा येथे जय्यत तयारी करण्यात आली आहे. प्रशासकीय यंत्रणांचे चोख नियोजन करण्यात आले असून तगडा बंदोबस्त राहणार आहे.कोरेगाव भीमा इथल्या विजय स्तंभावर लाखो अनुयायी अभिवादन करणार असून विजयस्तंभाला आकर्षक फुलांच्या सजावटीसह रोषनाईही करण्यात आली आहे. विजय स्तंभाला यंदा संविधानाच्या प्रतिकृतीची आकर्षक सजावट करण्यात आलीय.तर शौर्य दिनानिमित्त पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त करण्यात आलाय. या सोहळ्यासाठी जवळपास आठ ते दहा लाख अनुयायी येणार असल्याचा प्रशासनाकडून अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.सुमारे 5 हजार पोलीस सुरक्षिततेसाठी तैनात करण्यात आले आहेत.
विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखोंची गर्दी
कोरागाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी दरवर्षी लाखो अनुयायी येत असून गेल्या काही वर्षांमध्ये या संख्येत वाढ झालीय. मंगळवार 31 डिसेंबर व बुधवार 1 जानेवारी असे दोन दिवस होणार१या या सोहळ्यसाठी यंदा लाखोंची उपस्थिती राहणार असल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे.दरम्यान, राज्यमंत्री माधुरी मिसाळ कोरेगाव भीमा येथे दखल झाल्या आहेत.
शोर्य दिनानिमित्त त्या विजय स्तंभाला अभिवादन करणार आहेत.
जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा कुणीही प्रयत्न करू नये- माधूरी मिसाळ
बाबासाहेब आंबेडकर इथं येवून गेले आहेत .आज 207 वा हा शोर्य दिवस साजरा होतो आहे .सरकार म्हणुन लोकांची सगळया सोयी केल्या आहेत. येणाऱ्या लोकांची योग्य सोय व्हावी यासाठी सर्व प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे पोलीस देखील चोख बंदोबस्त बजावत आहेत.सामाजिक न्याय विभागाकडून सगळया सुविधा पुरवण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. बाबासाहेबांचं योगदान मोठ आहे .सगळ्यांना आवाहन आहे की सर्वांनी मानवंदना शांततेत द्यावी .बाबासाहेबांनी जातिवाद पसरू नये म्हणुन खुप प्रयत्न केले. त्यांच्या संवीधानावर देश चालतो जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा कुणीही प्रयत्न करू नये. असेही त्या म्हणाल्या.
पोलिसांचा कडक बंदोबस्त
यावर्षी कोरेगाव भीमा सभेसाठी पाच हजार पोलीस कर्मचारी,सातशे पन्नास पोलिस आधिकारी तैनात असणार आहेत. यासोबतच एक हजार होमगार्ड आणि आठ कंपन्या काम करणार. याशिवाय, येथील परिस्थितीवर देखरेख ठेवण्यासाठी 50 पोलिस टॉवर , 10 ड्रोन आणि चोरी रोखण्यासाठी विशेष पोलिस रथक असेल अशी माहिती पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. यावेळी शांतता राखण्यासाठी 31 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान ड्राय डे जाहीर करण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारची दंगल होऊ नये यासाठी सोशल मिडीयावर निर्बंध असणार असतील. काही आक्षेपार्ह पोस्ट आढळल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल.
पार्किंगसाठी सोय
कोणालाही अडचण होणार नाही यासाठी सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. ज्यात 45 पार्किंग सेंटर आहेत. 30 हजार चारचाकी आणि ३० दुचाकी क्षमता असलेले सेंटर आहेत.
वाहतूक मार्गात कोणते बदल होणार?
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कोरेगाव येथे शौर्यदिनानिमित्त सभेचे नियोजन करण्यात आले असून वाहतुकीतही बदल करण्यात आले आहेत. तरी कोणत्याही प्रकारचा गोंधळ होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे.