एक्स्प्लोर
भगवानगडावर शुकशुकाट, सावरगावातील पंकजांच्या सभेला तुफान गर्दी
एरवी दसऱ्याला भक्तांनी फुलुन जाणाऱ्या भगवानगडावर नेहमीसारखी गर्दी पाहायला मिळाली नाही. मात्र यंदा ते चित्र उलट पाहायला मिळालं. यंदा भगवानगडावर शुकशुकाट पाहायला मिळाला, तर सावरगावात पंकजा मुंडे यांच्या सभेला प्रचंड जनसागर लोटला
![भगवानगडावर शुकशुकाट, सावरगावातील पंकजांच्या सभेला तुफान गर्दी Pankaja Munde Addressed People At Sawargaon Latest Updates भगवानगडावर शुकशुकाट, सावरगावातील पंकजांच्या सभेला तुफान गर्दी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/09/30175952/Pankaja-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बीड : मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यापेक्षा आज जास्त समाधानी आहे, असे पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यात म्हटले. सावरगावातील सभेचा प्रतिसाद बघून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे भारावल्या. तर तिकडे महंत नामदवेशास्त्रींच्या विरोधानंतर भगवानगडाची गर्दी ओसरल्याचं चित्र पाहायला मिळालं.
भगवानगडावर मला जायला विरोध केला जातो. मी काय आतंकवादी आहे का?, असा सवाल पंकजा मुंडे यांनी केला.
महंत नामदेवशास्त्रींनी भगवानगडावर दसरा मेळाव्याला पंकजा मुंडे यांना विरोध केल्यानंतर, पंकजा मुंडेंनी यंदाचा दसरा मेळावा भगवानगडाच्या जन्मगावी म्हणजे बीडमधील सावरगावात घेण्याचा निर्णय घेतला. या मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी समजाबांधवांना भावनिक साद देत, त्यांना सर्वांगीण विकासाचं आश्वासनही दिले.
एरवी दसऱ्याला भक्तांनी फुलुन जाणाऱ्या भगवानगडावर नेहमीसारखी गर्दी पाहायला मिळाली नाही. यंदा ते चित्र उलट पाहायला मिळालं. यंदा भगवानगडावर शुकशुकाट पाहायला मिळाला, तर सावरगावात पंकजा मुंडे यांच्या सभेला प्रचंड जनसागर लोटला
या मेळाव्याला महादेव जानकर, राम शिंदे यांच्यासह पंकजा मुंडेंचे अनेक समर्थकही हजर होते.
![भगवानगडावर शुकशुकाट, सावरगावातील पंकजांच्या सभेला तुफान गर्दी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/09/30180004/Pankaja-21-580x395.jpg)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)