एक्स्प्लोर

'आपण मला वेळ मागत आहात.. मी आपल्याला वेळ देणार आहे'; पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन

पंकजा मुंडेंनी एका फेसबुक पोस्टच्या माध्यामातून हे आवाहन केलं आहे. तसेच पुढिल राजकीय वाटचालीसंदर्भातही चर्चा करणार असल्याचं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितलं आहे. एवढच नाहीतर राजकारणात झालेले बदल, जबाबदारीत झालेले बदल या सगळ्या बदललेल्या समीकरणांबाबतही त्या बोलणार असल्याचं त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये सांगितलं आहे.

परळी : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका प्रचंड गाजल्या, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पण महाराष्ट्राचा सत्तापेच अखेर सुटला असून निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळालेला पक्ष भाजप विरोधी पक्षाच्या भूमिकेत असून महाविकासआघाडी म्हणजेच, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केलं आहे. विधानसभा निवडणुकीत काही मतदार संघातील लढत चुरशीची झाल्याचं पाहायला मिळालं. असाच एक मतदार संघ म्हणजे, परळी विधानसभा मतदारसंघ. या मतदार संघात भावा-बहिणीमधील लढत पाहायला मिळाली. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात झालेल्या आमदारकीच्या लढतीत धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेचा पराभव केला. अशातच विधानसभा निवडणुकीआधी पंकजा मुंडे पक्षाकार्यात सक्रिय होत्या, पण पराभवानंतर मात्र त्या बीड जिल्ह्यात किंबहुना परळी विधानसभा मतदारसंघात कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होताना दिसल्या नाहीत. पंकजा मुंडें आता पुन्हा एकदा सक्रिय होताना दिसत आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर येण्याचं निमंत्रण दिलं आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकांमध्ये पराभूत झालेल्या पंकजा मुंडे पुन्हा एकदा जोरदार कमबॅक करणार अशा चर्चांनी राजकीय वर्तुळात जोर धरला आहे. पंकजा मुंडेंनी एका फेसबुक पोस्टच्या माध्यामातून हे आवाहन केलं आहे. तसेच पुढिल राजकीय वाटचालीसंदर्भातही चर्चा करणार असल्याचं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितलं आहे. एवढच नाहीतर राजकारणात झालेले बदल, जबाबदारीत झालेले बदल या सगळ्या बदललेल्या समीकरणांबाबतही त्या बोलणार असल्याचं त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये सांगितलं आहे. त्यामुळे आता पंकजा मुंडे नेमकी कोणती भूमिका घेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. काय आहे पंकजा मुंडे यांच्या फेसबुक पोस्टमध्ये? पंकजा मुंडेंनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये सांगितले की, 'दुसऱ्याच दिवशी पार्टीच्या कोअर कमिटीच्या बैठकीस मी हजरही झाले. 'आधी देश,नंतर पार्टी आणि शेवटी स्वत:' हे संस्कार आमच्यावर लहानपणापासून झालेले आहेत. जनतेप्रती आपल्या कर्तव्यापेक्षा मोठं काहीही नसतं असं मुंडेसाहेबांनी लहानपणापासून शिकवलेलं आहे. त्यांच्या शिकवणी नुसार त्यांच्या मृत्युनंतर अगदी तिसऱ्याच दिवशी मी कामाला लागले.' पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, ' पाच वर्षे सत्तेच्या माध्यमातून तुमची सेवा केली. मला ही सेवेची संधी केवळ आणि केवळ तुमच्या विश्वासामुळे मिळाली आणि आज पराभवानंतर माझ्याहीपेक्षा व्यथित माझ्या लोकांनी मला इतके मेसेजेस केले, इतके फोन केले, इतके निरोप दिले. "ताई आम्हाला भेटायला वेळ द्या," .."ताई आम्हाला तुम्हाला बघून तरी जाऊ द्या "...किती संवेदना तुम्ही माझ्यासाठी व्यक्त केली.' पंकजा मुंडेंनी आपल्या फेसबुक पोस्टमधून मतदारांचे आभारही मानले आहेत. त्या म्हणाल्या की, 'मी तुम्हा सर्वांची खुप खुप आभारी आहे. मला याची पुर्ण जाणीव आहे की तुमचं प्रेम हे माझ्यावर आहे आणि तेच माझं कवचकुंडल आहे. मुंडेसाहेबांनी एका क्षणात मला राजकारणात आणलं. एका क्षणात ते आपल्यातून निघूनही गेले. पहील्यांदा मुंडेसाहेबांचा आदेश म्हणून मी राजकारणात आले आणि नंतर मुंडेसाहेबांच्या पश्चात जनते प्रती असलेल्या जवाबदारी म्हणुन राजकारणात राहीले. आज राजकारणामध्ये झालेले बदल, जबाबदारीत झालेले बदल या सगळ्या बदलत्या संदर्भांचा विचार करुन आपला सर्वांचा पुढचा प्रवास ठरवण्याची आवश्यकता आहे.' दरम्यान, गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीस्थळी म्हणजेच वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना परिसरात सुमारे अठरा एकर जागेवर भव्य-दिव्य स्वरूपाचे स्मारक उभारण्यात आले असून त्यालाच गोपीनाथ गड असं संबोधलं जातं. येथेच गोपीनाथ मुंडे यांचे समाधीस्थळ आहे. संबंधित बातम्या :  महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी नाना पटोले बिनविरोध, भाजपकडून उमेदवारी अर्ज मागे  साध्वी प्रज्ञांच्या वक्तव्यावरून उद्योगपती राहुल बजाज यांनी अमित शाहांना घेरले, शाह म्हणाले...    Aarey Metro Car Shed | आरेतील मेट्रो कारशेडचं काम मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या स्थगितीनंतरही सुरुच रब्बी हंगामाकरिता पीकविमा हप्ता भरण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत अंतिम मुदत
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मंदिराच्या दानपेटीत चुकून आयफोन पडला, परत मागताच देवस्थान कमिटीनं दिलेल्या उत्तराने डोक्यावर हात मारायची वेळ आली!
मंदिराच्या दानपेटीत चुकून आयफोन पडला, परत मागताच देवस्थान कमिटीनं दिलेल्या उत्तराने डोक्यावर हात मारायची वेळ आली!
Major Reshuffle in the Maharashtra Administration : मंत्र्यांच्या खातेवाटपाची चर्चा असताना प्रशासनात तगडी खांदेपालट; एका दणक्यात तब्बल 23 अधिकाऱ्यांचा बदल्या!
मंत्र्यांच्या खातेवाटपाची चर्चा असताना प्रशासनात तगडी खांदेपालट; एका दणक्यात तब्बल 23 अधिकाऱ्यांचा बदल्या!
Video: साहेब, वाल्मिक कराडच मास्टरमाईंड, त्यानेच काशी केलीय; शरद पवारांसमोरच संदीप क्षीरसागरांनी पत्ता उलगडला
Video: साहेब, वाल्मिक कराडच मास्टरमाईंड, त्यानेच काशी केलीय; शरद पवारांसमोरच संदीप क्षीरसागरांनी पत्ता उलगडला
Video : लाजवणारी शिव्यांची लाखोली, भर रस्त्यात झिंज्यांना हात घातला, लाथा घातल्या, अंगावरील कपड्यांचेही भान सूटले! दोन तरुणींचा तुफानी राडा
Video : लाजवणारी शिव्यांची लाखोली, भर रस्त्यात झिंज्यांना हात घातला, लाथा घातल्या, अंगावरील कपड्यांचेही भान सूटले! दोन तरुणींचा तुफानी राडा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sandeep Kshirsagar Speech : वाल्मिक कराडच मास्टरमाईंड, त्यानेच काशी केलीय, पवारांसमोर आक्रमक भाषणCM And DCM PC | हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर शिंदे-फडणवीसांची पत्रकार परिषद ABP MajhaSharad Pawar Parbhani : शरद पवारांनी घेतली Somnath Suryawanshi यांच्या कुटुंबीयांची भेट ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 02 PM 21 December 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मंदिराच्या दानपेटीत चुकून आयफोन पडला, परत मागताच देवस्थान कमिटीनं दिलेल्या उत्तराने डोक्यावर हात मारायची वेळ आली!
मंदिराच्या दानपेटीत चुकून आयफोन पडला, परत मागताच देवस्थान कमिटीनं दिलेल्या उत्तराने डोक्यावर हात मारायची वेळ आली!
Major Reshuffle in the Maharashtra Administration : मंत्र्यांच्या खातेवाटपाची चर्चा असताना प्रशासनात तगडी खांदेपालट; एका दणक्यात तब्बल 23 अधिकाऱ्यांचा बदल्या!
मंत्र्यांच्या खातेवाटपाची चर्चा असताना प्रशासनात तगडी खांदेपालट; एका दणक्यात तब्बल 23 अधिकाऱ्यांचा बदल्या!
Video: साहेब, वाल्मिक कराडच मास्टरमाईंड, त्यानेच काशी केलीय; शरद पवारांसमोरच संदीप क्षीरसागरांनी पत्ता उलगडला
Video: साहेब, वाल्मिक कराडच मास्टरमाईंड, त्यानेच काशी केलीय; शरद पवारांसमोरच संदीप क्षीरसागरांनी पत्ता उलगडला
Video : लाजवणारी शिव्यांची लाखोली, भर रस्त्यात झिंज्यांना हात घातला, लाथा घातल्या, अंगावरील कपड्यांचेही भान सूटले! दोन तरुणींचा तुफानी राडा
Video : लाजवणारी शिव्यांची लाखोली, भर रस्त्यात झिंज्यांना हात घातला, लाथा घातल्या, अंगावरील कपड्यांचेही भान सूटले! दोन तरुणींचा तुफानी राडा
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता, 17 विधेयकांना मंजुरी; पुढील अधिवशेन मुंबईत, तारीखही ठरली
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता, 17 विधेयकांना मंजुरी; पुढील अधिवशेन मुंबईत, तारीखही ठरली
ABP माझा दिवसभरातील टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर; 21 डिसेंबर 2024
ABP माझा दिवसभरातील टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर; 21 डिसेंबर 2024
Ajit Pawar : मस्साजोगमध्ये गेलेल्या अजित पवारांना धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडबाबत प्रश्न, दादा म्हणाले...
मस्साजोगमध्ये गेलेल्या अजित पवारांना धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडबाबत प्रश्न, दादा म्हणाले...
Arvind Kejriwal : दिल्लीच्या राजकारणात 'खेला होबे'! निवडणुकीच्या तोंडावरच राज्यपालांचा माजी सीएम अरविंद केजरीवालांविरोधात ईडीला ग्रीन सिग्नल!
दिल्लीच्या राजकारणात 'खेला होबे'! निवडणुकीच्या तोंडावरच राज्यपालांचा माजी सीएम अरविंद केजरीवालांविरोधात ईडीला ग्रीन सिग्नल!
Embed widget