ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 मार्च 2026 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 मार्च 2026 | सोमवार
1.किल्ले रायगडाच्या पायथ्याशी मनसेचा 20 वा वर्धापन दिन साजरा, राज ठाकरेंकडून सहकुटुंब शिवरायांना अभिवादन, तर मनसेकडून आजपासून सदस्य नोंदणीचा शुभारंभ https://tinyurl.com/2x9u5pb8 जात, धर्म यापेक्षा महाराष्ट्र वेडाने झपाटून जा, मनसेच्या वर्धापनदिनी मनसैनिकांना राज ठाकरेंचं काळजाला साद घालणारं आवाहन https://tinyurl.com/bdffruty
2. उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेत जावं, संजय राऊतांची आग्रही मागणी, महाविकास आघाडीचा सावध पवित्रा https://tinyurl.com/3vefvw8a
3. राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना ब्रेक, आजपासून परवाने स्थगित, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा निर्णय https://tinyurl.com/mwk4e4nf मुंबईत अवैध पेट्रोल बाईक टॅक्सीवर कडक कारवाई; रॅपिडो-ओला-उबरचा परवाना तात्पुरता रद्द https://tinyurl.com/y9u3ujtz
4. व्हीएसआर विमान कंपनीच्या मालकाच्या मुलाच्या लग्नात प्रफुल पटेल उपस्थित होते, रोहित पवारांचा थेट आरोप, जय पवारांकडे अधिकची माहिती असल्याचा दावा https://tinyurl.com/mw7mhd84 प्रफुल पटेल त्या लग्नाला नव्हते, राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांचे रोहित पवारांना उत्तर, महाराष्ट्राचा 'पप्पू' म्हणत टीका https://tinyurl.com/3prskbbz अजित पवारांच्या विमानातील क्रू मेंबर पिंकी मालीच्या आईची अमोल मिटकरींनी घेतली भेट, कुटुंबावर विमान कंपनी मालक व्ही के सिंहचा दबाव असल्याचा दावा https://tinyurl.com/bdehuk5m
5. संजय शिरसाटांच्या सामाजिक न्याय विभागात घोटाळ्याचा आरोप, निधी वितरण प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत मनसेच्या अविनाश जाधवांचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र https://tinyurl.com/wwztcv7m
6. बुलढाण्यात पतीनेच दिली शिक्षक पत्नीच्या हत्येची सुपारी, अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक देत अपघाताचा रचला बनाव, आरोपी पतीसह तिघांना अटक, अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने केली हत्या https://tinyurl.com/45rea8z4 ऑन ड्युटी सफाई कामगाराची हत्या, धक्कादायक बातमी ऐकताच पत्नीची आत्महत्या, उल्हासनगरमध्ये खळबळ https://tinyurl.com/3b23ch9x पोलीस कर्मचाऱ्याने संपवलं जीवन, जळगावात खळबळ, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तपास सुरू https://tinyurl.com/4ydhdc4u
7. फक्त जळालेली हाडं सापडली, कोल्हापूरमधील पाटगावचे सरपंच दोन महिन्यांपासून बेपत्ता, मस्साजोगच्या संतोष देशमुख प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा https://tinyurl.com/4zzaaft3 कोल्हापूरमध्ये विवस्त्र व्यक्तीचा मृतदेह सापडला, चेहरा-मानेवर खोल वार, मनेरमळा परिसरात खळबळ https://tinyurl.com/3b7dmsj6
8. आमचं भविष्य एपस्टीन गँग निश्चित करू शकत नाही, जनता करेल, सुप्रीम लीडर निवडताच ट्रम्प, नेत्यानाहूंच्या धमकी सत्रावर इराणचा पलटवार https://tinyurl.com/et3cn5bs इराण युद्धावरून दोन्ही सभागृहात विरोधकांकडून चर्चेची मागणी, केंद्र सरकार म्हणाले, लोकसभा सभापतींना हटवण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यास तयार https://tinyurl.com/26jvdpxn
9. ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक जिंकल्यानंतर देशभरात जल्लोष, विजयी ट्रॉफी उचलताच टीम इंडियाचे भन्नाट सेलीब्रेशन, सूर्याने नेमकं काय केलं? पाहा संपूर्ण Video https://tinyurl.com/3wc57z2t भारताचा विश्वविजय राहुल द्रविड आणि व्ही व्ही एस लक्ष्मण यांना समर्पित करतो, त्यांनी खेळाडूंची एक मजबूत पीढी तयार केली, गौतम गंभीरच्या भावना https://tinyurl.com/y3stadt5
10. अहमदाबादमध्ये मिळालेला विजय हा अभूतपूर्व, विराट कोहलीकडून खास शब्दात भारतीय संघाचं कौतुक https://tinyurl.com/ydsdcy2k फायनलच्या एकदिवसाआधी सचिनचा फोन, विश्वचषक जिंकल्यानंतर संजू सॅमसनने सांगितलं गुपित, सगळं बोलताना भावूकही झाला https://tinyurl.com/3kxwb4hd
एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w
महत्त्वाच्या बातम्या





















