एक्स्प्लोर
पालघर LIVE : पैसे वाटपप्रकरणी 12 जणांवर गुन्हा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पालघरमधल्या कार्यकर्त्यांना साम, दाम, दंड, भेद अशा सगळ्या गोष्टींचा वापर करण्याचा सल्ला दिल्याचा दावा खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
पालघर: पालघर लोकसभा पोटनिवडणूक जिंकण्यासाठी भाजपने साम दाम दंड भेद वापरल्याचा आरोप अधिक गडद होत आहे. पैसे वाटपाच्या आरोपानंतर, आता मुख्यमंत्र्यांची कथित ऑडिओ क्लिप लीक झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पालघरमधल्या कार्यकर्त्यांना साम, दाम, दंड, भेद अशा सगळ्या गोष्टींचा वापर करण्याचा सल्ला दिल्याचा दावा खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
भाजपने हा आरोप फेटाळला आहे. तसंच हे शिवसेनेचं षडयंत्र असल्याचा दावा भाजपने केला आहे. मात्र मुख्यमंत्री याबाबत उत्तर देणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
LIVE UPDATE
- पैसै वाटप प्रकरणात अखेर गुन्हा दाखल, खासदार अनिल देसाईंची माहिती, कलम १७१ अंतर्गत पोलीसांनी गुन्हा दाखल केला. एकूण १२ युवकांवर डहाणू पोलिस स्थानकात झाला गुन्हा दाखल.
- काल रात्रीपासून शिवसेनेचे आमदार आणि खासदार पोलिस ठाण्यात ठाण मांडून बसले होते
- पैसे वाटणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा पालघर बंदची हाक देऊ, शिवसेनेचा इशार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
रायगड
Advertisement