एक्स्प्लोर
महाराष्ट्र 'पाणीदार' करणाऱ्या वॉटर कप स्पर्धेचा निकाल जाहीर
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील टाकेवाडी आंधळी या गावाने बाजी मारत पहिला क्रमांक पटकावला. सातारा जिल्ह्यातील भांडवली आणि बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड यांना संयुक्तपणे दुसरा क्रमांक मिळाला आहे.

पुणे : महाराष्ट्राला पाणीदार करणाऱ्या पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचा निकाल जाहीर झालाय. यामध्ये सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील टाकेवाडी आंधळी या गावाने बाजी मारत पहिला क्रमांक पटकावला. सातारा जिल्ह्यातील भांडवली आणि बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड यांना संयुक्तपणे दुसरा क्रमांक मिळाला आहे. प्रथम क्रमांक मिळवणारं गाव हे अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचं गाव आहे. ती देखील गेल्या तीन वर्षांपासून पाणी फाऊंडेशनसोबत काम करत आहे. पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेता आमिर खान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, पाणी फाऊंडेशनचे सत्यजीत भटकळ यांच्यासह दिग्गजांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. वॉटर कप स्पर्धा 2018 ची विजेते गावं प्रथम क्रमांक - टाकेवाडी (आंधळी) ता. माण, जी सातारा 75 लाख आणि ट्रॉफी द्वितीय क्रमांक - भांडवली, (ता.माण, जी. सातारा) आणि सिंदखेड (ता. मोताळा जी. बुलडाणा) प्रत्येकी 25 लाख आणि ट्रॉफी तृतीय क्रमांक - आनंदवाडी (ता.आष्टी, जि. बीड) आणि उमठा (ता. नरखेड, नागपूर) प्रत्येकी 10 लाख आणि ट्रॉफी बीड जिल्ह्यातील तालुक्यातील बक्षिसे आष्टी तालुका प्रथम क्रमांक-करंजी द्वितीय क्रमांक-आनंदवाडी तृत्तीय क्रमांक-कासेवाडी अंबाजोगाई प्रथम क्रमांक-पठाण मांडवा द्वितीय क्रमांक-हातोला तृत्तीय क्रमांक-ममदापूर परळी केज तालुका प्रथम क्रमांक- दिपे वडगाव द्वितीय क्रमांक-आनंदगाव तृत्तीय क्रमांक-माळशी धारुर प्रथम क्रमांक-जायभायवाडी द्वितीय क्रमांक-सिंघनवाडी तृत्तीय क्रमांक-निमला परळी प्रथम क्रमांक-मोहा द्वितीय क्रमांक-इंदिरा नगर तांडा तृत्तीय क्रमांक-भिलेगांव संबंधित बातमी : एकाच व्यासपीठावर राज ठाकरेंचा अजित पवारांवर निशाणा
आणखी वाचा























