शरद पवार यांच्या हस्ते साने गुरुजींच्या स्मारकाचे ऑनलाईन लोकार्पण, पंढरपुरात पार पडला भव्य सोहळा
Sane Guruji memorial : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते साने गुरुजी (Sane Guruji) यांच्या स्मारकाचे ऑनलाईन लोकार्पण झाले. पंढरपुरात हा भव्य सोहळा पार पडला.
![शरद पवार यांच्या हस्ते साने गुरुजींच्या स्मारकाचे ऑनलाईन लोकार्पण, पंढरपुरात पार पडला भव्य सोहळा Online inauguration of Sane Guruji memorial in Pandharpur by NCP President Sharad Pawar शरद पवार यांच्या हस्ते साने गुरुजींच्या स्मारकाचे ऑनलाईन लोकार्पण, पंढरपुरात पार पडला भव्य सोहळा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/08/fc158c5242ee5d3aea1d0cbe186b23aa1667903761077328_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते आज पंढरपूर येथील साने गुरुजी (Sane Guruji) यांच्या स्मारकाचे ऑनलाईन लोकार्पण करण्यात आले. यावेळी संत तनपुरे बाबा यांच्या 37 व्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम देखील पार पडला. यावेळी शरद पवार यांनी आपल्या भाषणात साने गुरुजींच्या कार्याचा विस्ताराने उल्लेख करीत या कार्यक्रमाला किमान ऑनलाईन हजार राहता आले याबद्दल आयोजकांचे आभार मानले.
संत नामदेव यांनी चोखाबांची हाडे आणून विठ्ठल मंदिराबाहेर त्यांचे स्मारक उभे केले. तर साने गुरुजी यांनी जाती अंताचा लढा लढत दिनदलितांना मंदिरात प्रवेश मिळवून दिला. आज त्याच ठिकाणी साने गुरुजींच्या विचार स्मारकाचा भव्य लोकार्पण सोहळा पार पडला. साने गुरूजी यांच्या स्मारकाचे लोकार्पण शरद पवार यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले. या सोहळ्यासाठी शरद पवार पंढरपूरला येणार होते. परंतु, तब्येत बिघडल्याने त्यांना 31 ऑक्टोबर रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना न्यूमोनिया झाल्याचे निदान झाले. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना किमान आठवडाभर रुग्णालयात राहण्याची गरज असल्याचे सांगितले होते. कालच त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांनी घरूनच या कार्यक्रमाला ऑनलाईन हजेरी लावत लोकार्पण केले.
पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्व जातीच्या लोकांना खुले करण्यासाठी 1 मे 1947 ते 10 मे 1947 या काळात आमरण उपोषण केले होते. साने गुरुजींची तब्येत खालावू लागल्यावर अखेर विठ्ठल मंदिरात दलितांना प्रवेश देण्याचे मान्य करण्यात आले. हे आमरण उपोषण साने गुरुजी यांनी संत तनपुरे महाराज यांच्या मठात केले होते. या घटनेला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त साने गुरुजी यांच्या विचाराचे स्मारक तनपुरे मठात उभारण्यात आले आहे.
साने गुरूजी यांच्या स्मारकाचे शरद पवार यांच्या हस्ते ऑनलाईन लोकापर्ण झाल्यानंतर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी संत बद्रीनाथ महाराज तनपुरे, आमदार बबनदादा शिंदे, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, पन्नालाल सुराणा, विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आबरोबरच आज संत तनपुरे बाबा यांचा 37 वा पुण्यतिथी सोहळा असल्याने राष्ट्र सेवादलाच्या कार्यकर्त्यांसह शेकडो वारकरी या सोहळ्यासाठी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
Maharashtra : कोरोना संकटानंतर दोन वर्षांनी भरला देशातील पहिला घोडेबाजार! 51 लाखांचा 'सलमान' ठरतोय बाजाराचे आकर्षण
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)