एक्स्प्लोर

Today In History : मुंबई लोकलमध्ये साखळी बॉम्बस्फोट, जागतिक लोकसंख्या दिन, इतिहासात आज

Din Vishesh : इतिहासात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.

On this day in history july 11th : आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या (Today History) असतात. आज म्हणजे 11 जुलै रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या. आजचा दिवस जगभरात जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून साजरा कऱण्यात येतो. आजच्या दिवशी 2006 मध्ये भारताची आर्थिक राजधानी समजल्या जाणार्‍या मुंबईमध्ये एकापाठोपाठ एक असे सात साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले. मुंबईतल्या रमाबाई आंबेडकर नगरमध्ये 11 जुलै 1997 रोजी गोळीबार झाला होता.  याशिवाय इतिहासात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.

सात ठिकाणी बॉम्बस्फोट! मुंबईची लाईफलाईन याच दिवशी हादरली

भारताची आर्थिक राजधानी समजल्या जाणार्‍या मुंबईमध्ये 11 जुलै 2006 या दिवशी एकापाठोपाठ एक असे सात साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले. हे सगळे स्फोट  पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवर अथवा ट्रेनमध्ये झाले. खार रोड, जोगेश्वरी, माहिम, मीरा रोड, माटुंगा रोड, बोरीवली, वांद्रे या ठिकाणी हे स्फोट झाले आणि मुंबईसह देश हादरुन गेला.  सरकारी आकडेवारीनुसार या हल्ल्यात 209 निष्पाप मुंबईकरांचा बळी गेला आणि 714 जण जखमी झाले. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख ह्यांनी मृतांच्या नातेवाईकांना 1लाख व जखमींना 50 हजार रुपये नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली. तर तत्कालीन रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांनी रेल्वेतर्फे मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपये व जवळच्या नातेवाईकाला नोकरी देण्याची घोषणा केली होती.  

या बॉम्बस्फोटासाठी  ‘सिमी’ आणि ‘लष्कर’ या अतिरेकी संघटनांनी योजनाबद्धरीत्या तयारी करुन हे स्फोट घडवून आणले. घटनेनंतर एटीएसनं  13 जणांना अटक केली.  एटीएसकडून  अटकेतल्या 13 आणि फरार 15 आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आलं. 11 सप्टेंबर 2015 रोजी खास न्यायालयाने 13 आरोपींना दोषी ठरवले आणि 30 सप्टेंबर 2015 रोजी न्यायालयाने कमाल अहमद अन्सारी, मोहंमद फैजल शेख, एहत्तेशाम सिद्दिकी, नावेद हुसेन खान,असिफ खान या पाच आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली, तर तन्वीर अहमद अन्सारी, मोहंमद माजिद शफी, शेख आलम शेख, मोहंमद साजिद अन्सारी, मुझ्झमील शेख,सोहेल मेहमूद शेख, जमीर अहमद शेख या सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा दिली.

रमाबाई आंबेडकर नगर गोळीबार प्रकरण -

मुंबईतल्या रमाबाई आंबेडकर नगरमध्ये 11 जुलै 1997 रोजी गोळीबार झाला होता. या घटनेत पोलिसांच्या गोळीबारात दहा जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर 23 जण जखमी झाले होते.  घाटकोपरमधील रमाबाई आंबेडकर नगरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यामुळे आंदोलन करण्यात आले होते.  आंदोलन चिघळण्याची स्थिती झाल्यामुळे गोळीबार गेल्याचे पोलिसांनी कोर्टात सांगितले. या गोळीबाराच्या घटनेने राज्याचं राजकारण बदललं होतं. 

जागतिक लोकसंख्या दिन (World Population Day) -

11 जुलै हा दिवस जगभरात जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जागतिक लोकसंख्या दिनाची सुरूवात संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या गव्हर्निंग कौन्सिलने 1989 मध्ये केली होती. वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि कुटुंब नियोजनाबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो.  11 जुलै 1990 रोजी हा दिवस पहिल्यांदा 90 पेक्षा जास्त राष्ट्रांमध्ये साजरा करण्यात आला.  दरवर्षी जागतिक लोकसंख्या दिनाची एक विशेष थीम असते. त्या थीमच्या आधारे पुढचे वर्षभर जनजागृती केली जाते. यंदाची थीम ही 'A world of 8 billion: Towards a resilient future for all' अशी आहे. 

सुरेश प्रभूंचा जन्म -

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचा जन्म 11 जुलै 1953 रोजी मुंबईत झाला होता. सुरेश प्रभु यांनी गेल्यावर्षी राजकारणातून निवृत्ती घेतली आहे. लोकसभेत राजापूर मतदारसंघाचं सलग चारवेळा प्रतिनिधित्व केले, अटलबिहारी वाजपेयी आणि मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद भूषवले. राजकारणातील स्वच्छ प्रतिमा असणारे नेते म्हणून त्यांना ओळखले जाते. 

नारायण हरी आपटे यांचा जन्म -
1889 : कादंबरीकार, चित्रपट कथालेखक नारायण हरी आपटे यांचा जन्म आजच्याच दिवशी झाला होता. सुखाचा मूलमंत्र, पहाटेपुर्वीचा काळोख, उमज पडेल तर, एकटी या त्यांच्या काही प्रसिद्ध सामाजिक कादंबर्‍या आहेत. कुंकू चित्रपट त्यांच्या न पटणारी गोष्ट या कादंबरीवर आधारलेला आहे. 

सुहास शिरवळकर यांचं निधन - 

 प्रसिद्ध मराठी कादंबरीकार आणि रहस्यकथालेखक सुहास शिरवळकर यांचं निधन आजच्याच दिवशी 2003 मध्ये झाले. त्यांच्या 'देवकी' या कथेवर आधारलेला मराठी चित्रपट बनला, तर 'दुनियादारी', 'कोवळीक' या कादंबऱ्यांवर मालिकाही प्रसिद्ध झाल्या आहेत. 2013 मध्ये त्यांच्या "दुनियादारी" कादंबरीवर आधारित चित्रपट प्रदर्शित झाला. 

7000 पेक्षा जास्त जणांचा नरसंहार 

11 जूलै 1995 रोजी, बोस्नियाची राजधानी सारायेवोपासून 80 किलोमीटर दूर असणाऱ्या सेब्रेनिस्ता येथे तब्बल सात हजार पेक्षा जास्त जणांची हत्या करण्यात आली. सर्व लोक आपापल्या कामात गुंतले होते. अचानक शहरात सर्ब सैनिकांच्या शेकडो गाड्या येऊन धडकल्या. गृहयुद्धामुळे पेटलेल्या बोस्नियात स्वातंत्र्याची मागणी करणारे प्रदर्शन करणाऱ्या लोकांना पाहताच क्षणी गोळ्या घालण्यात आल्या.

रामराव राणे यांचे निधन

1994 मध्ये आजच्याच दिवशी  मेजर (निवृत्त) रामराव राघोबा राणे यांचे निधन झाले होते.  त्यांना रणांगणावरील असामान्य कामगिरीबद्दलचा ’परमवीर चक्र’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.  हा सन्मान मिळवणारे ’बॉम्बे सॅपर्स’चे आणि महाराष्ट्रातील पहिले अधिकारी होते.

2002 : चांग शांग दक्षिण कोरियाच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. 

2008 : अॅप्पल कंपनीने आयफोन 3G लाँच केला

1994 : पोलिस महानिरीक्षक किरण बेदी यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला

1889 : सोवा बाजार क्लब हा फुटबॉल स्पर्धेत भाग घेणारा पहिला भारतीय संघ ठरला.

1921 : मंगोलियाला चीनपासून स्वातंत्र्य मिळाले. 

1973 : पॅरिसजवळ ब्राझिलचं बोईंग बोइंग विमान दुर्घटनाग्रस्त झालं, 122 जणांचा मृत्यू झाला. 

1977: मार्टिन लूथर किंग जूनियर यांना ‘मेडल ऑफ फ्रीडम’पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

2010:  स्पेनने नेदरलँड्सचा पराभव करून फुटबॉल विश्वचषक जिंकला.

1979 : अमेरिकेची स्कायलॅब ही अंतराळातील प्रयोगशाळा हिंदी महासागरात कोसळली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget