दहशतवादयांचा जुना नांदेड पॅटर्न, पंजाबात गुन्हे अन् नांदेडमध्ये आश्रय
1988, 1990 च्या काळात पंजाबमध्ये खलिस्तानी दहशतवादयांनी धुडगूस घातला होता. त्यावेळी सरकारने कारवाई करत अनेकांना बेड्या घातल्या होत्या.
नांदेड : नांदेड शहरात काल खलिस्तान जिंदाबाद या अतिरेकी संघटनेचा दहशतवादी गुरपिंदर सिंग उर्फ ग्यानी सापडल्याने पुन्हा एकदा नांदेडचे खलिस्तानवाद्यांशी असलेले कनेक्शन उघडकीस आले आहे. त्यामुळे दहशतवाद्यांचा जुना नांदेड पॅटर्न समोर आले. त्यामुळे पंजाबमध्ये गुन्हे करायचे व नांदेडमध्ये आश्रय घ्यायचा हे नेहमीचेच झालंय.
गेल्या दोन वर्षापासून खंडणी, खून, गोळीबार या घटनांमध्ये पंजाब पोलीस व नांदेड पोलिसांच्या रडारवर असणाऱ्या बबर खालसा संघटनेचा आरोपीची दहशत अद्याप नांदेड येथे कायम आहे. मात्र अद्याप तो पोलिसांच्या हाती लागला नाही. त्यात आता खलिस्तान जिंदाबादचा अतिरेकी नांदेड मध्ये सापडल्याने नांदेडकरांचा थरकाप उडाला आहे.
गेल्या दोन वर्षापासून नांदेड शहरात गोळीबार, खून, खंडणी, गॅंगवार सारख्या घटनांमुळे सर्वसामान्य नांदेडकरांची घाबरगुंडी उडाली आहे. 1988, 1990 च्या काळात पंजाबमध्ये खलिस्तानी दहशतवादयांनी धुडगूस घातला होता. त्यावेळी सरकारने कारवाई करत अनेकांना बेड्या घातल्या होत्या, तर अनेकांचा खात्मा केला होता. याच काळात शहरातील वाजीराबाद पोलीस ठाण्यात बॉम्बस्फोट करण्यात आला होता. त्यावेळी मोंढा भागातील हॉटेलमध्ये खलिस्तानवादी अतिरेक्याला पकडण्यात आले होते. त्यानंतर पंजाब पोलिसांना वॉन्टेड असणारे गुन्हेगार नांदेडमध्ये आश्रयास येणे सुरूच आहे. आणि आता त्याच संघटनेचा खलिस्तानी दहशतवादी सापडल्याने नांदेडात खळबळ उडाली आहे.
त्यामुळे नांदेड पोलीस आणखी सतर्क झालेयत. पंजाब मध्ये मोस्ट वॉन्टेड असणारे अनेक आरोपी आजही नांदेडमध्ये असल्याचे नाकारता येत नाही. त्यामुळे पंजाब पोलीस आणि एटीएस नेहमी नांदेड पोलिसांच्या संपर्कात राहतात.
संबंधित बातम्या :