UCC: समान नागरी कायद्यावर शीख, जैन आणि पारशी समूदायांचं मत लक्षात घ्यावं, मग आम्ही भूमिका मांडू: शरद पवार
Sharad Pawar On UCC: समान नागरी कायद्याला शीख समूदायाचा विरोध असल्याची माहिती आहे, त्यांचं मत विचारात घ्यावं असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी केंद्र सरकारला सांगितलं.
मुंबई: केंद्र सरकारने देशात समान नागरी कायदा लागू करण्याची तयारी सुरू केली असताना आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार त्यावर प्रतिक्रिया (Sharad Pawar On Uniform Civil Code) दिली. समान नागरी कायद्यावर कोणताही निर्णय घेण्याआधी तो शीख, जैन आणि पारशी समूदायाला मान्य आहे का हे पाहा असा सल्ला शरद पवारांनी केंद्र सरकारला दिला आह. त्यानंतर राष्ट्रवादीची भूमिका आम्ही मांडू असंही ते म्हणाले. समान नागरी कायद्याला शीख समूदायाचा विरोध असल्याची मला माहिती आहे असं शरद पवारांनी सांगितलं.
शरद पवार म्हणाले की, एकाच देशात दोन कायदे नको असं पंतप्रधानांनी म्हटल्याची माहिती आहे. त्यासाठी केंद्र सरकारचा देशात समान नागरी कायदा लागू करण्याचा विचार सुरू आहे. पण त्यासाठी नेमण्यात आलेल्या कायदा आयोगाच्या शिफारशींकडे सरकारने लक्ष द्यावं. कायदा आयोगाने सांगितल्याप्रमाणे यावर सर्व समूदायांशी चर्चा करावी आणि मग निर्णय घ्यावा.
शरद पवार पुढे म्हणाले की, मला मिळालेल्या माहितीनुसार, शीख समाजाचा या समान नागरी कायद्याला विरोध आहे. त्यावर अजून माहिती घेण्याचं माझं काम सुरू आहे. समान नागरी कायद्यावर शीख समाज, जैन आणि इतर समाजांची भूमिका काय आहे हे स्पष्ट व्हावी. शिख समाजाचं वेगळं मत असल्याचं माझ्या कानावर आलं आहे. समान नागरी कायद्याला विरोध करण्याची भूमिका त्यांनी घेतल्याची माहिती आहे. कायदा आयोगाने सांगितल्याप्रमाणे सर्वांचं मत लक्षात घेऊन यावर निर्णय घ्यावं.
समान नागरी कायदा लागू करण्याची बातमी सगळीकडे पसरवली जातेय, हे कुठल्यातरी महत्त्वाच्या प्रश्नावरुन लक्ष विचलित करण्यासाठी केलं जातंय का हे पाहावं लागेल असंही शरद पवारांनी म्हटलंय.
विकेट दिलीच तर सोडणार कसं? शरद पवारांचं फडणवीसांना उत्तर
देवेंद्र फडणवीसांनी एका वाहिणीला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर आज टीका केली. त्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले की, 2014 च्या निवडणुकीत भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याची राष्ट्रवादीची भूमिका होती. त्यामागं भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये अंतर पाडण्याचं राजकारण होतं. देवेंद्र फडणवीस म्हणतात की पहाटेचा शपथविधी हा शरद पवारांचा डाव होता. मला गुगली कशी टाकायची हे माहिती आहे. फडणवीसांनी विकेट दिली तर सोडणार कशी? विकेट गेलेला माणूस विकेट गेल्याचं कसं सांगू शकतो.
ही संबंधित बातमी वाचा: