एक्स्प्लोर
जयदत्त क्षीरसागर यांचा अखेर शिवसेनेत प्रवेश, उद्धव ठाकरेंनी शिवबंधन बांधलं
यावेळी राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय खूप आधी झाला होता. बीडमध्ये जो पक्ष वाढवला त्याच पक्षातील नेत्यांनी कोंडी केली, अशा भावना प्रवेशावेळी क्षीरसागर यांनी बोलून दाखवल्या. तर आनंदाने शिवसेनेत या, तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे काम करू शकाल, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले.
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी अखेर शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी क्षीरसागर यांना शिवबंधन बांधत त्यांचे पक्षात स्वागत केले.
यावेळी राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय खूप आधी झाला होता. बीडमध्ये जो पक्ष वाढवला त्याच पक्षातील नेत्यांनी कोंडी केली, अशा भावना प्रवेशावेळी क्षीरसागर यांनी बोलून दाखवल्या. तर आनंदाने शिवसेनेत या, तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे काम करू शकाल, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले.
शिवसेनेचा परिवार आणि विश्वासार्हता वाढत आहे. चांगले कार्यकर्ते शिवसेनेत येत आहेत. शिवसेनेच्या आणि शिवसेनाप्रमुखांच्या आकर्षणापोटी तुम्ही हा निर्णय घेतला आहे. शिवसेनेत आल्याचा आपल्याला कधीच पश्चाताप होणार नाही, असेही ते म्हणाले. शिवसेना वाढवणे आणि बलवान करण्याची जबाबदारी आता तुमच्यावर आहे. आपण बीडमध्ये कधी पेरणी केली नव्हती. आता तुमच्या माध्यमातून पेरणी करून पक्ष वाढवू, असेही ते म्हणाले. आनंदाने शिवसेनेत या, तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे काम करू शकाल, असेही ठाकरे म्हणाले.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या आदल्याच दिवशी सकाळी बीडमधील राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांची घुसमट बाहेर आली होती. राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीला कंटाळून पक्षाला रामराम ठोकत असल्याचा निर्णय क्षीरसागर यांनी जाहीर केला होता.
पक्षामध्ये होणाऱ्या अवहेलनेमुळे बऱ्याच दिवसांपासून घुसमट सुरु होती. ती कुठपर्यंत सहन करायची, हा प्रश्न कार्यकर्तेही विचारत होते. जिथे स्वाभिमानाला ठेच पोहचते तिथे राहण्यात स्वारस्य नव्हतं, अशा भावना जयदत्त क्षीरसागर यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना व्यक्त केल्या होत्या.
'वादळात दिव्याचं रक्षण केलं, आता दिव्यानेच हात पोळले' अशा शब्दात राष्ट्रवादीवर निशाणा साधतानाच 'हेचि फळ काय मम तपाला' असा काव्यात्मक सवालही क्षीरसागर यांनी उपस्थित केला होता.
संबंधित बातम्या
पक्षाने तुम्हाला काय कमी केले, आत्मचिंतन करा, संदीप क्षीरसागर यांचा जयदत्त क्षीरसागर यांना टोला
राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांचा पक्षाला रामराम, शिवसेनेच्या वाटेवर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement