jayant patil :.... तर चंद्रकांत पाटलांना सोडायला हिमालयात जाणार, जयंत पाटील यांनी काढला चिमटा
jayant patil on chandrakant patil : चंद्रकांत पाटील हिमालयात जाणार असतील तर मी पण सोबत जाणार, कारण उन्हाळा येतोय... भला माणूस आहे..
jayant patil on chandrakant patil : चंद्रकांत पाटील हिमालयात जाणार असतील तर मी पण सोबत जाणार, कारण उन्हाळा येतोय... भला माणूस आहे... माझ्या ओळखीचे आहेत, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेक्षाध्यक्ष जयंत पाटील यांना लगावला. मुंबईमध्ये मनसेसोबत आघाडी केली तर त्याचा फटका भाजपला बसेल, असेही पाटील म्हणाले. ते साताऱ्यात बोलत होते. संवाद यात्रा 230 मतदार संघात फिरलो. आम्ही लढवत नव्हतो तिथं सुद्धा स्वागत झालं आहे. आम्हाला बऱ्याच ठिकाणी सुधारणा करयची गरज आहे, असे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील म्हणाले.
भोंगे उतरवताना गुजरात अथवा इतर राज्यात काय परिस्थीती पाहावी, असा टोला जयंत पाटील यांनी राज ठाकरेंना लगावला आहे. राज ठाकरे सर्वांचं लक्ष वेधत आहेत. राज ठाकरे कोणाच्या हातचं भावल झालेत. नकलाकार आहेत त्यांच्या कडून काय अपेक्षा करणार त्यांचं कौतुक करतो, असा टोलाही जयंत पाटील यांनी राज ठाकरेंना लगावला. साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या कामगिरीवरही त्यांनी वक्तव्य केले. सातारा जिल्हयात थोडी पडझड झाली आहे. साताऱ्यात एकटं जायचं की वेगळं लढायचं? याचा निर्णय शरद पवार घेतील, असे जयंत पाटील म्हणाले.
अर्धवट राहिलेल्या राष्ट्रवादीच्या संवाद यात्रा हा पूर्ण करण्याचा प्रयत्न जयंत पाटील यांनी सुरू केला आहे. साताऱ्यातील वाई, मेढा, त्याचबरोबर सातारा असं त्यांनी दौरा केला. या दौऱ्या दरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना चिमटे काढले. चंद्रकांत पाटील हे हिमालयाच्या दौऱ्यावर जाणार का? असा प्रश्न विचारला असता चंद्रकांत दादांबरोबर मी हिमालयाच्या दौर्यात जाणार असल्याचं सांगत उन्हाळा खूप वाढलेला आहे. त्यांची इच्छा असली तर मी त्यांना तेथे सोडून येईन, असं मिश्किल उत्तर देऊन चंद्रकांत दादांना चिमटा काढलाच. शिवाय भाजप अध्यक्ष पदावरून काढू नये त्यांना तिथेच ठेवावं ते चांगलं काम करत आहेत, असं सांगितलं. शिवाय चंद्रकांत पाटील यांचे माझे चांगले संबंध हे सांगायलाही ते विसरले नाही. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात पोटनिवडणुक घ्या, जर त्या निवडणूकीत पराभव झाला तर राजकरण सोडून हिमालयात जाईल, असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते.