एक्स्प्लोर
हत्येचे 30 गुन्हे, 20 लाखांचं बक्षीस असलेल्या नक्षली कमांडर कोल्हाचं आत्मसमर्पण
1 मे 2019 रोजी कुरखेडा तालुक्यात झालेल्या जांभूळखेडा स्फोटात पंधरा पोलीस जवान शहीद झाले होते. पोलिसांना या स्थळी येण्यासाठी जी जाळपोळीची घटना दादापूर येथे घडवली गेली. त्या वाहनांची जाळपोळ विलास कोल्हाच्या नेतृत्वात झाली होती.
गडचिरोली : जहाल नक्षली कमांडर विलास कोल्हा यानं गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे. विलास कोल्हा याच्यावर एकूण 147 गुन्हे दाखल आहेत. यात 30 गुन्हे हत्येचे तर पोलिसांवर हल्ल्याचे 40 गुन्हे दाखल आहेत. जांभुळखेड्यात झालेल्या नक्षलवादी हल्ल्याचा विलास हा मुख्य सूत्रधार होता. जांभुळखेड्यातल्या भुसुरुंग स्फोटात एकूण 15 पोलिस शहीद झाले होते. विलास कोल्हावर महाराष्ट्र आणि छत्तीसगड पोलिसांनी मिळून वीस लाखाचं बक्षीस ठेवलं होतं. विलास कोल्हा हा मूळचा गडचिरोली जिल्ह्यातल्या एटापल्ली परिसरातील रहिवासी आहे. त्यानं आज एके ४७ रायफल आणि काडतुसांसह आत्मसमर्पण केलं आहे.
गडचिरोलीत जहाल माओवादी विलास उर्फ दसरु कोल्हाने गडचिरोली पोलीसासमोर आत्मसमर्पण केल्याने नक्षल चळवळीला जबर हादरा बसला आहे. विलास कोल्हा हा नक्षलवाद्याच्या उत्तर गडचिरोली विभागीय समितीचा कमांडर इन चीफ आहे. जिल्ह्यातील सर्व हिंसक घटनाचे नेतृत्व विलास कोल्हाने केले आहे. गेले वीस वर्षापासून तो नक्षल चळवळीत आहे.
प्रफुल दादा, कुरखेडा मार्गावर आम्ही यशस्वी झालो, गडचिरोलीच्या रस्त्यावर गूढ संदेश
विलास कोल्हा मरकेगाव आणि हत्तीगोटा या दोन मोठ्या भुसुरुंग स्फोट घटनेत सहभागी होता. त्या दोन्ही घटनेत मिळून एकूण 29 जवान शहीद झाले होते. अन्य एका घटनेत सात जवान शहीद झाले होते. त्यातही विलास कोल्हा याचा सहभाग होता. 1 मे 2019 रोजी कुरखेडा तालुक्यात झालेल्या जांभूळखेडा स्फोटात पंधरा पोलीस जवान शहीद झाले होते. पोलिसांना या स्थळी येण्यासाठी जी जाळपोळीची घटना दादापूर येथे घडवली गेली. त्या वाहनांची जाळपोळ विलास कोल्हाच्या नेतृत्वात झाली होती.VIDEO | गडचिरोलीच्या कुरखेड्यातून एबीपी माझाचा ग्राऊंड रिपोर्ट | एबीपी माझा
जिल्ह्याच्या नक्षल चळवळीच्या इतिहासात AK 47 रायफल आणि 35 राउंडसह त्याने केलेले आत्मसमर्पण नक्षल चळवळीतील नैराश्य दर्शवून गेले आहे. महाराष्ट्र सरकारने कोल्हावर साडेआठ लाखांचे बक्षीस ठेवले होते. त्यात आणखी एक लाखांची भर सरकारतर्फे घातली जाणार आहे. गेल्या वर्षभरात गडचिरोली पोलिसांनी नक्षली कारवायांवर मोठा अंकुश आणत अबुजमाडसह नक्षली तळ असलेल्या विविध भागात परिणामकारक कारवाई केली आहे. या दबावामुळेच वर्षभरात नक्षल्यांचे चार डिव्हिजनल कमिटी सदस्य, दोन कमांडर ,दोन उपकमांडर यासह 26 सक्रिय नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
शिक्षण
Advertisement