एक्स्प्लोर
प्रफुल दादा, कुरखेडा मार्गावर आम्ही यशस्वी झालो, गडचिरोलीच्या रस्त्यावर गूढ संदेश
कडोली-कुरखेडा मार्गात रस्त्यावरच पांढऱ्या रंगाने मजकूर लिहिलेला आढळला. यात एक मे रोजी झालेल्या घटनेचा उल्लेख आहे.

गडचिरोली : गडचिरोलीमध्ये नक्षलींनी भूसुरुंग स्फोट घडवून 15 जवानांचा जीव घेतल्यानंतर या घटनेशी संबंध जोडणारी एक गोष्ट समोर आली आहे. 'प्रफुल दादा, कुरखेडा मार्गावर आम्ही यशस्वी झालो, अशीच माहिती देत राहा' या आशयाचा मजकूर रस्त्यावर लिहिण्यात आला आहे.
महाराष्ट्र दिनी नक्षलींनी गडचिरोलीतील जांबुडखेडा मार्गावरील लेंडारी पुलावर भीषण स्फोट घडवला होता. या दुर्घटनेत गडचिरोली पोलिसांच्या शीघ्र कृती दलाच्या 15 जवानांसह एका खाजगी वाहन चालकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर, आज कडोली-कुरखेडा मार्गात रस्त्यावरच पांढऱ्या रंगाने मजकूर लिहिलेला आढळला. यात एक मे रोजी झालेल्या घटनेचा उल्लेख आहे.
काय लिहिलं आहे?
प्रफुल दादा पिलावन, तुम्ही माहिती दिल्याप्रमाणे आम्ही कुरखेडा मार्गावर स्फोटात सक्सेस झालो आहे. असेच आम्हाला माहिती देत रहा... लाल सलाम
आता प्रश्न निर्माण होतो, की हे नक्षलवाद्यांनीच लिहिले आहे का? की कोणी वैयक्तिक राग काढण्यासाठी या घटनेचा वापर करत आहे. कारण नक्षली आपल्या खबऱ्यांचं नाव कधी लिहित नसतात. दुसरं म्हणजे ते अशाप्रकारे रस्त्यावर लिहित बसत नाहीत. ते प्रिंटेड कागदावर किंवा लाल कपड्यावर लिहितात आणि पत्रकात लाल रंग वापरतात.
प्रफुल पिल्लेवार कोण आहे?
प्रफुल पिल्लेवार हा देसाईगंज-वडसा येथील रहिवासी असून तो देसाईगंज पोलिस स्टेशनमध्ये एसपीओ, ऑफिस बॉय, खबऱ्या म्हणून कार्यरत होता. मात्र दीड वर्षांपूर्वी त्याला पोलिस स्टेशनच्या अंतर्गत वादामुळे चौकशी करुन काढण्यात आलं. तो आता सामान्य जीवन जगत आहे.
पोलीस अधीक्षकांनी हे मजकूर प्रथमदर्शी बनावट वाटत असल्याचं म्हटलं आहे. मात्र या विषयी तपास सुरु असून लवकरच याची माहिती बाहेर येईल, असं सांगितलं. त्यामुळे या गूढ मजकूराचा अर्थ लवकरच लागेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नवी मुंबई
व्यापार-उद्योग
यवतमाळ
क्रिकेट
Advertisement
Advertisement
























