एक्स्प्लोर
Advertisement
नांदेड-वाघाळा महापालिकेसाठी मतदान, 578 उमेदवार रिंगणात
या निवडणुकीत 578 उमेदवार आपलं नशिब आजमवणार आहेत. महापालिकेच्या एकूण 20 प्रभागांतील 81 जागांसाठी मतदान होईल.
नांदेड : काँग्रेससाठी प्रतिष्ठेच्या बनलेल्या नांदेड-वाघाळा महापालिकेच्या 81 जागांसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीत 578 उमेदवार आपलं नशिब आजमवणार आहेत. प्रभाग क्रमांक 2 मध्ये प्रायोगिक तत्वावर व्हीव्हीपॅटचा (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल) वापर केला जाणार आहे.
महापालिकेच्या एकूण 20 प्रभागांतील 81 जागांसाठी मतदान होईल. एकूण 891 उमेदवारांनी वैध नामनिर्देशनपत्र दाखल केली होती. त्यातील 313 उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतल्याने प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात आता 578 उमेदवार आहेत. व्हीव्हीपॅटचा वापर होत असलेल्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये 26 उमेदवार आहेत. आज सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. 12 ऑक्टोबर 2017 रोजी मतमोजणी होईल.
एकूण 20 पैकी 19 प्रभाग चार सदस्यांचे आहेत. एक प्रभाग 5 सदस्यांचा आहे. एकूण 3 लाख 96 हजार 872 मतदार असून त्यांच्यासाठी 550 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रभाग क्र. 2 वगळता अन्य सर्व प्रभागांतील एका मतदान केंद्रावर सरासरी 734 मतदार असतील.
व्हीव्हीपॅटचा वापर होत असलेल्या प्रभाग क्र.2 मध्ये मतदारांची एकूण संख्या 20 हजार 307 इतकी आहे. त्यांच्यासाठी 37 मतदान केंद्रांची व्यवस्था केली आहे. या प्रभागात एका मतदान केंद्रावर सरासरी 550 मतदार असतील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
कोल्हापूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement