एक्स्प्लोर

Hostel Admission : अर्धे सत्र आटोपल्यावर वसतिगृहात प्रवेश ; समाज कल्याण विभागाचा अजब कारभार

सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य अंतर्गत राज्यभरात सुमारे 450 वसतिगृहे (Hostels) चालवली जातात. या वसतिगृहांमध्ये विविध अभ्यासक्रमांचे आणि वयोगटातील 50 हजारांहून अधिक विद्यार्थी राहून शिक्षण घेतात.

Nagpur News : चालू शैक्षणिक वर्षाचे अर्धे सत्र संपल्यानंतर आता हिवाळी सत्राच्या (Winter Exams) परीक्षांचा टप्पाही सुरू होत आहे. बोर्डाच्या परीक्षाही फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. पण, आतापर्यंत सामाजिक न्याय विभागाच्या (Department of Social Justice) वसतिगृहात विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकला नव्हता. त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. अनेक पत्र आणि निवेदन दिल्यानंतर झोपेतून जागे झालेल्या विभागाने प्रवेशाची यादी जाहीर केली. आतापर्यंत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपली व्यवस्था करावी लागली, यासाठी पालकांना मोठा आर्थिक भुर्दंडही सोसावा लागला. शिवाय विद्यार्थ्यांना विविध भत्त्यांच्या लाभापासूनही वंचित राहावे लागले.

सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य अंतर्गत राज्यभरात सुमारे 450 वसतिगृहे (Hostels) चालवली जातात. या वसतिगृहांमध्ये विविध अभ्यासक्रमांचे आणि वयोगटातील 50 हजारांहून अधिक विद्यार्थी राहून शिक्षण घेतात. त्यात आठवी ते पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा समावेश आहे. जिल्हा समाजकल्याण विभाग आणि उपायुक्त कार्यालयात दरवर्षी हजारो विद्यार्थी प्रवेशासाठी अर्ज करतात. अनुसूचित जातीसह अन्य प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. या सत्रासाठी विद्यार्थ्यांनी जूनमध्ये अर्ज केले होते. साधारणत: सप्टेंबरपर्यंत प्रवेश यादी जाहीर (Admission List) केली जाते, यंदा मात्र आतापर्यंत यादीच जाहीर न झाल्याने लोकप्रतिनिधींकडे तक्रारी वाढत होत्या. हिवाळी अधिवेशनादरम्यान सरकारला याच विषयावर घेरण्याचीही तयारी होती. त्यामुळेच विभागाने घाईघाईने वसतिगृहात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर केली.

  • 450 राज्यभरात वसतिगृह
  • 50 हजारहून अधिक विद्यार्थ्यांचा प्रवेश 

800 विद्यार्थ्यांची निराशा 

चालू शैक्षणिक सत्राचा (academic session) सुमारे अर्धा कालावधी लोटला आहे. अकरावीच्या विद्यार्थ्यांचे सत्र जवळपास संपले आहे. आयटीआयच्या (ITI) विद्यार्थ्यांनाही आता प्रवेश मिळून काहीच उपयोग नाही. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासाठी विभागाकडून भत्ता मिळतो. पारंपारिक अभ्यासक्रम करणाऱ्यांना दरमहा 800 रुपये तर वैद्यकीय, अभियांत्रिकी करणाऱ्यांना अधिक अनुदान मिळते, मात्र वसतिगृहात प्रवेश न मिळाल्याने विद्यार्थ्यांना या भत्त्यापासून वंचित रहावे लागले. शासनाच्या अर्थसंकल्पात या संदर्भात निधी दिला जातो. एससी, एसटी प्रवर्गाबरोबरच ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रवेशासाठी 5-5 टक्के जागा आहेत. यामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 568 विद्यार्थ्यांनी अर्ज केले तर 21 मुले व 11 मुलींना वसतिगृह मिळाले आहे. 256 विद्यार्थ्यांनी बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी अर्ज केले होते. यापैकी 1 मुलगी आणि एका मुलाला वसतिगृह मिळाले. म्हणजे अर्ज केल्यानंतर वसतिगृह मिळण्याची अपेक्षा असलेल्या सुमारे 800 विद्यार्थ्यांची निराशा झाली.

ही बातमी देखील वाचा

Maharashtra Politics: कामाख्या देवीचं दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 10 October 2024 : 04 PM : ABP MajhaABP Majha Headlines : 4 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सGovinda Gun Fire : कोलकात्याला जाण्यासाठी बॅगेत बंदूक भरताना मिसफायरShinde Group Dasara Melava : शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीमध्ये होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Govinda Gun Fire: गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
Embed widget