एक्स्प्लोर
नागपुरात जुगारी काँग्रेस नगरसेवकाला दुसऱ्यांदा अटक
नागपुरातील मोतीबाग परिसरात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. यामध्ये 3 लाख 62 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
![नागपुरात जुगारी काँग्रेस नगरसेवकाला दुसऱ्यांदा अटक Nagpur Congress Corporator Ramesh Punekar Arrested While Gambling Latest Update नागपुरात जुगारी काँग्रेस नगरसेवकाला दुसऱ्यांदा अटक](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/10/22115527/Nagpur-Congress-Ramesh-Punekar-Jugar.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नागपूर : नागपूरमध्ये चक्क काँग्रेस नगरसेवकालाच जुगार खेळताना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. पोलिसांनी जुगार अडड्यावर टाकलेल्या छाप्यात नगरसेवक रमेश पुणेकर यांना अटक करण्यात आली.
नागपुरातील मोतीबाग परिसरात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. यामध्ये 3 लाख 62 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावेळी 20 जणांना अटक करण्यात आली असून जुगार खेळणाऱ्यांमध्ये काँग्रेस नगरसेवक रमेश पुणेकर यांचाही समावेश होता.
विशेष म्हणजे पुणेकर यांना दुसऱ्यांदा बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. आता या नगरसेवकावर पक्ष काय कारवाई करतो, याकडे नागपूरकरांचं लक्ष लागलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
क्रीडा
आरोग्य
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)