एक्स्प्लोर
मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला 29 मे पासून सुरुवात, अशी असणार प्रवेशप्रक्रिया
मुंबई विद्यापीठाची प्रवेशप्रक्रिया अत्यंत सुलभ आणि विद्यार्थ्यांसाठी अधिक सोयीची आहे. पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाकडे प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे.
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा बारावीचा निकाल 85.88 टक्के लागला आहे. मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीची प्रक्रिया 29 मे 2019 पासून सुरु होत आहे.
प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया 29 मे ते 10 जून 2019 असणार आहे. अॅडमिशन फॉर्मच्या अर्जाची प्रिंट आऊट घेऊन महाविद्यालयात सादर करण्याची तारीख 7 ते 13 जून पर्यंत असणार आहे. हे अर्ज दुपारी 12 वाजेपर्यंत सादर करायचे आहेत. तसेच इन हाऊस अॅडमिशन आणि अल्पसंख्याक कोट्याचा प्रवेश या कालावधीत करता येणार आहे. यानंतर टप्प्य़ा टप्प्यांनी मेरीट लिस्ट जाहीर होणार आहे.
मुंबई विद्यापीठाची प्रवेशप्रक्रिया अत्यंत सुलभ आणि विद्यार्थ्यांसाठी अधिक सोयीची आहे. पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाकडे प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे.
HSC Result 2019 | बारावीचा निकाल जाहीर; कोकण विभाग अव्वल, मुलींची बाजी | ABP Majha
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम mum.digitaluniversity.ac या संकेतस्थळावरील ( Mumbai University Pre Admission online Registration 2019-20) या लिंकवर क्लिक करावे. अर्ज भरताना अडचणी आल्यास विद्यार्थ्यांना 02066834821 या हेल्पलाईनवर संपर्क करता येणार आहे.
प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक
अर्ज विक्री - 29 मे 2019 ते 7 जून 2019 पर्यंत (कार्यालयीन दिवस)
प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया - 29 मे 2019 ते 10 जून 2019
महाविद्यालयात अर्ज सादर करण्याची तारीख - 07 जून 2019 ते 13 जून 2019
मेरीट लिस्ट
पहिली मेरीट लिस्ट - 13 जून 2019 ( संध्याकाळी 5 वाजता)
कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे - 14 ते १७ जून 2019 (संध्याकाळी 4.30 वाजेपर्यंत)
द्वितीय मेरीट लिस्ट - 17 जून 2019 (संध्याकाळी 5.00 वाजता)
कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे - 18 ते 20 जून 2019 (संध्याकाळी 5 वाजेपर्यंत)
तृतीय आणि शेवटची मेरीट लिस्ट - 20 जून 2019 (संध्याकाळी 5 वाजता)
कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे - 21 ते 24 जून 2018 (संध्याकाळी 5 वाजेपर्यंत)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
Advertisement