एक्स्प्लोर

Shivsena Shinde Group Candidate For Rajya Sabha Election 2026: एक नाव निश्चित होताच, दुसऱ्याने इच्छा व्यक्त केली; राज्यसभेसाठी शिवसेना शिंदेंकडून 5 नावांची चर्चा, दोन महिलांचा समावेश

Shivsena Shinde Group Candidate For Rajya Sabha Election 2026: निवडणूक आयोगाने 10 राज्यांमधील 37 राज्यसभेच्या जागांसाठी निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. या 37 जागांसाठी 16 मार्च रोजी निवडणुका होणार आहेत.

Shivsena Shinde Group Candidate For Rajya Sabha Election 2026: निवडणूक आयोगाने 10 राज्यांमधील 37 राज्यसभेच्या जागांसाठी निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. या 37 जागांसाठी 16 मार्च रोजी निवडणुका होणार आहेत. रिक्त जागांपैकी 12 जागांवर एनडीए आहे, तर 25 जागांवर विरोधी पक्षांचा समावेश आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक (7) जागा आहेत, त्यानंतर तामिळनाडू (6) आणि पश्चिम बंगाल आणि बिहार (प्रत्येकी 5) आहेत. (Rajya Sabha Election 2026)

महाराष्ट्रातील शरद पवार, रामदास आठवले, कनिमोझी, तिरुची शिवा आणि राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, प्रियांका चतुर्वेदी यांचा कार्यकाळ 2 एप्रिल रोजी संपत आहे. 16 मार्च रोजी मतदान होईल आणि त्याच दिवशी संध्याकाळी पाच वाजता मतमोजणी होईल. महाराष्ट्रातील 7 जागांसाठी होणारी ही निवडणूक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. विधानसभेतील पक्षीय संख्याबळाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याचदरम्यान, एक महत्वाची माहिती समोर आली आहे. (Maharashtra Rajya Sabha Election 2026)

राज्यसभेसाठी शिवसेना शिंदे गटाकडून 5 नावांची चर्चा- (Shivsena Shinde Group Rajya Sabha)

शिवसेना शिंदे गटाकडून माजी खासदार राहुल शेवाळे यांचं नाव राज्यसभेसाठी जवळपास निश्चित मानलं जात आहे. तर राहुल शेवाळे यांचं नाव निश्चित झालं असलं तरी पक्षातून ज्योती वाघमारे, शायना एनसी, संजय निरुपम यांचीही नावं चर्चेत आहे. तर पक्षातील ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर यांनीही राज्यसभेवर जाण्याची इच्छा पक्षश्रेष्ठीकडे दर्शवली आहे.

शिवसेना शिंदे गटाकडून आता राज्यसभेसाठी कुणाची वर्णी लागणार? (Shivsena Shinde Group Rajya Sabha)

उपमुख्यमंत्री एशिवसेना शिंदे गटाकडून आता राज्यसभेसाठी कुणाची वर्णीकनाथ शिंदे हे आज याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे, निर्णय घेण्यापूर्वी पक्षातील वरिष्ठ नेत्यांसोबतही चर्चा करतील अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाकडून आता राज्यसभेसाठी कुणाची वर्णी लागते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. दरम्यान, राज्यसभेवर शिवसेना शिंदे गटाचा एक खासदार निवडून येऊ शकतो. यासोबतच शिंदे गटाकडे 20 अतिरिक्त मतेही असतील.

राज्यसभेसाठी 16 मार्च रोजी मतदान- (Rajya Sabha Election 2026)

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, अर्ज भरण्याची अंतिम तारीख 5 मार्च निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर 6 मार्च रोजी अर्जांची छाननी केली जाईल. उमेदवारांना माघार घेण्यासाठी 9 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मतदानाची प्रक्रिया 16 मार्च रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत पार पडणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार असून निकाल त्यानंतर जाहीर केले जातील.

महाराष्ट्रातून निवृत्त होणारे राज्यसभा सदस्य- (Retiring Rajya Sabha members from Maharashtra)

  1. शरद पवार (श.प. गट)
  2. रामदास आठवले (रिपाई) 
  3. फौजिया खान (श.प. गट)
  4. रजनी पाटील (काँग्रेस)
  5. प्रियांका चतुर्वेदी (ठाकरे सेना)
  6. धैर्यशील पाटील (पेण- भाजप)
  7. भागवत कराड (भाजप)

राज्यसभा निवडणुकीचे वेळापत्रक (Rajya Sabha Election 2026)

  1. 5 मार्च – उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत
  2. 6 मार्च – अर्जांची छाननी
  3. 9 मार्च – उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख
  4. 16 मार्च – सकाळी 9 ते सायं. 4 मतदान; सायं. 5 नंतर मतमोजणी

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Rajya Sabha Election 2026: भाजपचे 3 खासदार हमखास जिंकणार, राज्यसभा निवडणूक कशी होणार, समीकरण काय?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
Maharashtra Breaking LIVE Updates: पुणे महापालिकेचे तब्बल 13 हजार कोटींचे अंदाजपत्रक
Maharashtra Breaking LIVE Updates: पुणे महापालिकेचे तब्बल 13 हजार कोटींचे अंदाजपत्रक
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?
Eknath Shinde Vidhan Parishad : T 20 World Cup मध्ये टीम इंडियाचा विजय, शिंदेंकडून अभिनंदन प्रस्ताव
Vijay Wadettiwar on Budget : महाराष्ट्र कंगाल झालाय,केवळ रस्ते बांधण्यासाठी बजेट आहे का?
Gold Silver Price Drop Iran Israel War : सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण;इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम
Nashik Crime : Dr. Manisha Jejurkar प्रकरणी पतीचे विवाहबाह्य संबंध होते, माहेरच्यांचे गंभीर आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandara : शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
मुंबईतून स्वीकृत नगरसेवकपदी नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
मुंबईतून स्वीकृत नगरसेवकपदी नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीत आग, मोठ्या स्फोटानंतर धुराचे लोट; कामगार सैरावैरा धावले
अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीत आग, मोठ्या स्फोटानंतर धुराचे लोट; कामगार सैरावैरा धावले
Share Market Crash : युद्धामुळे शेअर बाजारात हाहाकार! Sensex  1, 352 अंकांनी गडगडला, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटी पाण्यात
युद्धामुळे शेअर बाजारात हाहाकार! Sensex  1, 352 अंकांनी गडगडला, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटी पाण्यात
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
Embed widget